daily horoscope

सोमवार 04 एप्रिल 2022 चे दैनंदिन राशी भविष्य

Read in

सोमवार  04 एप्रिल  2022 चे दैनंदिन राशी भविष्य.

सोमवार 04 एप्रिल चंद्ररास मेष 21.00 पर्यंत व नंतर वृषभ. चंद्रनक्षत्र भरणी 14.27 पर्यंत व नंतर कृत्तिका. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून  आजचे दैनंदिन राशी भविष्य देत आहे.

सोमवार  04 एप्रिल  2022 चे दैनंदिन राशी भविष्य.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
सोमवार 04 एप्रिल चंद्ररास मेष 21.00 पर्यंत व नंतर वृषभ. चंद्रनक्षत्र भरणी 14.27 पर्यंत व नंतर कृत्तिका. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून  आजचे दैनंदिन राशी भविष्य देत आहे.
 आज गौरी तृतीया  असून श्री राम दोलोत्सव आहे. सौभाग्यशयन व्रत आहे.
मेष :–तुमच्या चाणाक्ष व कुशाग्र बुद्धीने वेळेवर प्रश्नाचे उत्तर सापडेल.नात्यातील कुटुंबात निर्माण झालेल्या  समस्येवर योग्य तो उपाय सुचवाल.
वृषभ :– पोटदुखीचा, ओटीपोट दुखण्याचा त्रास संभवतो. लहान मुलांच्या व वयस्कर मंडळींच्या डोळ्यांची योग्य प्रकारे काळजी घ्यावी दुखापत होण्याचा धोका आहे.
मिथुन. :–नोकरीत बढतीच्या बाबतीत तुमच्या नावाचा विचार करण्यात येत असल्याची बातमी कानावर येईल. परिश्रमाने केलेल्या कामाचे पुरेपूर श्रेय तुम्हाला मिळणार आहे.
कर्क :–कोणतेही पेपर्स पूर्णपणे वाचल्याशिवय त्त्याच्यावर सही करू नका. नोकरीतील अडचणींसाठी आज तुम्हाला अतिशय संयमाने विचार करावा लागेल.
सिंह :– मनाचा पक्का निश्चय करूनच मगच इतरांसमोर  तुमचे मत व्यक्त करा. पूर्वीच्या अनुभवावर आजच्या प्रसंगाची तुलना करू नका.
कन्या :– समोरच्या चुकलेल्या व्यक्तीला मोठ्या मनाने क्षमा करा. कुटुंबात महत्वाच्या गोष्टीवर एकमत करण्याचा प्रयत्न करा.
तूळ :–इतरांच्या मानसिकतेपुढे आज तुमचे कोणतेच उपाय चालणार नाहीत. नोकरीत वरिष्ठना तुमचे म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न यशस्वी कराल.
वृश्चिक :– आजची सकाळ कुटु़ंबाबाबतच्या चिंता निर्माण करणारी राहील. आर्थिक खर्च व समाधान याचा मेळ घालण्याचा प्रयत्न करू नका.
धनु :– इतरांकडून घेण्यापेक्षा दुसर्यांना देण्यात समाधान मिळेल. आजचा दिवस तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढवणारा राहील.
मकर :–जवळच्या मित्रांविषयीची बातमी ऐकून पायाखालची वाळू सरकेल. मोठ्या कष्टाने मनातील भावनांना आवर घालाल.
कुंभ :– हातातीत प्रोजेक्टमुळे प्रतिष्ठा वाढल्याचे जाणवेल.  आईकडील नातेवाईकांकडून  आनंदाची बातमी कळेल.
मीन :– मनातील गोष्टी जोडीदाराला सांगून मन हलके करावे लागेल. व्यावसायिकांनी आर्थिक व्यवहारा बाबत  प्रत्येक नियमाचे पालन करावे.
||. शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *