मुलांचा सर्वांगीण विकास

कोणत्याही व्यक्तीकडे पाहिल्यावर ती व्यक्ति काशी दिसते, काशी बोलते, काशी बसते, उठते यासारख्या ठळकपणे दिसणार्‍या गोष्टीवरून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा आपण अंदाज घेतो. आणि मग आपण त्याला अमुक व्यक्तिमत्वाचा आहे असे लेबल लावतो. व्यक्तिमत्वाचे प्रकार तर बघा कोणकोणते आहेत ते – प्रभावी, प्रसन्न, अबोल, तापट, लोभस, करारी.

जीवन सफल, यशस्वी करण्याकरीत्ता मनुष्याला आवश्यक त्या गुण वैशिष्ट आवश्यक असतात. प्रत्येक लहान मुलाच्या अंगी सुप्त गुणांचा खजिना असतो. पण त्याच बरोबर त्यांच्यात काही कमतरता व अवगुण पण असतात. त्यांच्या योग्य प्रकारे विकसित होण्या करता पालकांनी व शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असते.

मुलांची विविध कौशल्ये, आत्मसात करण्यासाठी ती सर्वच कौशल्ये पालकांनी येण्याची गरज नसते पण पळक्च मलाच यातील काही माहीत नाहीचा पाढा वाचतात व मग मुले पण पालकांच्या कुवतीचा अंदाज घेतात. मुलांच्या या प्रवासात प्रमुख भूमिका आई वडिलांची असते. त्यानंतर आजी आजोबा नंतर भावंडे यानंतर शेजारी व सभोवतालचा समाज.

अगदी लहान वयाच्या मुलांना 5 वर्षाच्या आतील स्वछता, नीट-नीटकेपणा याचे धडे दिल्यास चांगल्या सवयी लागतात. ५ ते ७ वयाच्या मुलांच्या बंधन घालावे लागते. आक्रास्तळेपणावर बंधन घालणे, खोटे बोलण्यावर, मत्सर, स्वार्थीपणा, एकलकोंडेपणा, तर पुढील बाबींना प्रोत्साहन दिल्यास स्वभावाला शरीराला चांगले वळण लागते. शारीरिक सुरक्षितता, स्वछता स्वत:ची व परिसराची, घराची भावंडांना मदत करणे, वस्तु जागेवर ठेवणे .

१२ वर्षा नंतरच्या मुलांचं व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी पालकांना फारच जागरूक राहणे महत्वाचे आहेत. उदाहरण दाखल जसे आत्मप्रतिमा, महत्वाकांक्षा, निर्णयशक्ती, कार्यक्षमता, शारीरिक स्वास्थ, मानसिक आरोग्य व अशाचे प्रकारचे महत्वाचे २०-२२ मुद्दे तर आपल्याला विचारात घ्यावे लागतील