वधुवर ग्रहमिलन

विवाहासाठी वधुवरांचे गुणमिलन पाहण्याची आपल्याकडे पद्धत आहे. गुण पाहताना यामध्ये  वर्ण – 1, वश्य-1, योनि-4 , ग्रहमैत्रि-5 , राशिकूट-7 , तारा-3, भुकूट-7, नाडी – 8. असे एकूण  36 गुण असतात.कृष्णमूर्ती पद्धतीत  गुणाबरोबर ग्रह, नक्षत्रे, ऊपनक्षत्रे  व 12 भावांचे भावारंभ, भावांची नक्षत्रे ऊपनक्षत्रे, तसेच  वधुवराना सध्या व पुढील महादशा कोणत्या भावांच्या आहेत हे बारकाईने पाहिले जाते.

त्यामुळे दोघांनाही एकत्र जगताना कालावधी कसा आहे याची स्पष्टपणे माहिती मिळते. एकास काळ अडचणीचा असेल तर दुसर्या तसा नसावा याची आपण काळजी घेतो. दोघांना अपघात, आजारपण, नसावे. आयुष्यमर्यादा महत्वाची ठरते. धर्म , अर्थ काम व मोक्ष या जीवनाच्या मुख्य कार्यांसाठी पतिपत्नीचे एकमेकास सहकार्य मिळणे महत्वाचे असते.

पत्नी ही ” कार्येषु मंत्री, भोज्येषु माता, आणि शयनेषु रंभा.” अशी असावी. म्हणूनच कुंडलीचे फक्त गुणमेलन न पाहता ग्रहमिलन तपासावे हे चांगल्या, समृद्ध, सुखी समाधानी आयुष्यासाठी महत्वाचे आहे.