ऋग्वेद
रचनेचा काळ ई. स. पूर्व ४००० च्या आसपासचा असावा. अखिल मानवजातीचा धर्मग्रंथ व भारतीय संस्कृतीचा वारसा असलेला ग्रंथ म्हणजेच ऋग्वेद. ह्या ग्रंथला संपूर्ण विश्वात श्रेष्ठत्व मिळाले आहे.
ब्रम्हाडातील विश्वाची, जीवसृष्टीची निर्मिती करणार्या परमेश्वराच्या अगाध शक्तीने मानव प्रभावित झाला व त्यावरून ऋषि मुनींना कवने स्तुतिस्तोम स्फुरली आहेत ही स्तुतिस्त्रोते म्हणजेच वेदवाणी होय. आपली भारतीय संस्कृती याच वेदवाणीच्या पायावर भक्कमपणे उभी आहे. भारतीय संस्कृती, भारतीय तत्वज्ञान, भारतीय इतिहास यांचे अधिष्ठान असलेला महान ग्रंथ म्हणजेच ऋग्वेद होय. सृष्टीच्या उत्पत्तिचे सूक्तही ऋग्वेदात आहे.
ऋग्वेदाच्या १० व्या मंडलात मृत्युनंतरच्या जीवनाबाबतचे विचार स्पष्ट केले आहेत.
ख्रिस्ती शतकाच्या १४ व्या शतकात ऋग्वेदाचे योग्य स्पष्टीकरण केलेलं आहे. जातीभेदचे तीव्र स्वरूप ऋग्वेदात अजिबात नाही. चातुवर्णाची कल्पना, नावे आहेत. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असा वर्णाचा उल्लेखही आहेत.
ऋग्वेदातील सुकते ही अतिप्राचीन असल्याने त्यात आध्यात्मिक जीवनाचे बीज आहे. पुराणातील देव देवतांचे उल्लेख आहेत. पितरांची देव म्हणून पूजा करणार्या कल्पनेचा उगमही ऋग्वेदात झाला आहे. ऋग्वेदात आध्यात्मिक, तत्त्वज्ञान, योग साधना, भक्तिसंप्रदाय, मंत्र विद्या, आचारधर्म, कृषि संस्कृती व युद्धं शस्त्र यावर अनेक सुभाषिते आहेत. ऋग्वेदात १० मंडले असून एकूण ऋचासंख्या १०५५२ आहे. ऋचाचे पद म्हणजे एक सूक्त. एका सुक्तात १० मंत्रे आहेत, अशा १०/२० सुक्ताचे एक मंडल होते. अशी १० मंडळे ऋग्वेदात आहेत.
मंडळाची अष्टकानुसार विभागणी केली तर प्रत्येक अष्टकात ८-८ असे ६४ अध्याय आहेत. म्हणून ६४ अध्याय व १०५५२ ऋचा अशी त्याची व्याप्ती आहे.
यजुर्वेद
यजुर्वेदाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा ग्रंथरूपात आहे. हा अमृतासारखा गोड व संपूर्ण सृष्टी मानव व चरा चराला हितकारक आहे. यज्ञ मंत्र यज्ञाचे कर्मकांड, नियम, शास्त्र शुद्ध विधी व उपासना यांची सांगोपांग माहिती यजुर्वेदा मध्ये आहे. जिवाच्या गर्भधानापासून ते अंतेष्टिपर्यंत सर्व संस्कार त्याची पद्धती याची सविस्तर माहिती आहे.
यजुर्वेदाचे दोन प्रमुख विभाग आहेत – १) शुक्ल २) कृष्ण
शुक्ल यजुर्वेदात एकूण ४० अध्याय व १९७५ मंत्र शुक्ल अतिशय शुद्ध व पवित्र मंत्राचा संग्रह आहे.
यजुर्वेदातील मंत्रातून –
तत्वज्ञान, अध्यात्म, मानसशास्त्र, पर्यावरण, शिल्पविद्या, यज्ञाचे अंनुष्ठान व त्याचे स्वरूप, सृष्टीची उत्पती, प्राण – अपान क्रिया, शोर्यलक्षणे, स्त्री – पुरुष, माता – पिता, संतती, परस्पर संबध व कर्तव्ये. आत्म्याचे कर्म, मन व आत्मा यांचा संबध ऋतुवर्ण, गणितविद्या, राजा – प्रजा धर्म, मनाचे लक्षण, शिक्षण, विद्या, अत्येष्टी कर्म, मृतशोक न करण्याचा उपदेश, सत्कर्म महात्म्य, मोह- शोक त्याग, ओंकाराचे महत्व असे अनेक विषयाचा अभ्यास येथे नमूद केला आहे. ब्रम्हाचे वर्णन करताना अनंतची बेरीज येथे रूपकाने दाखवली आहे. हे ही पूर्ण आहे व ते ही पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण बाहेर येते. पूर्णातून पूर्ण वजा केल्यावरही पूर्णच शिल्लक राहते.
सामवेद
सामवेद हा चार वेदांपैकी तिसर्या क्रमांकाचा वेद आहे. साम म्हणजे गायन, मनाची शांती. साम वेदात ऋग्वेदातील ऋच्यांचे गायन कसे करावे याची माहिती आहे. याच साम वेदाला भारतीय संगीताच्या सप्त सुरांचा पाया असे संबोधले आहे. साम वेदाचे दोन मुख्य भाग आहेत. मुख्य आर्चिक व दूसरा गान होय. दोन्ही भागात मिळून एकूण मंत्र संख्या १८७५ आहे.
आर्चिक मध्ये – पूर्वार्चीक व उत्तरार्चिक असे दोन भाग आहेत. पूर्वार्चीक मध्ये – ६५० मंत्र व ते ही स्वरांकना सह एकत्रित आहेत. उत्तरार्चिकात २१ अध्याय ९ कांडात आहेत व एकूण मंत्र १२२५ आहेत. सामवेदातील आर्चिक व उत्तरार्चिक यांमधील शब्द हे केवळ साधनभूत आहेत. मुख्य हेतु म्हणजे गाण्याचे राग शिकवणे हाच आहे. हे राग आर्चिका वरून शिकल्यावर मगच तपशील म्हणावयाची स्तोत्रे पाठ करता येतात.
सामवेद हा जरी व्याप्तीने लहान असला तरी चारही वेदांचे सार यात आहे. वेदांमध्ये ॐ ला आत्यंतिक व आध्यात्मिक पातळीवर अत्युच्य महत्व आहे. ॐ कारामुळे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक शक्ति प्राप्त होते.
सामवेद हा व्यक्ति व निसर्ग यांना जोडणारा पुलच आहे. यातील मंत्र मानवाच्या उन्नती करता कारण आहेत. ईश्वराची उपासना – भक्ति मार्ग यासाठी भजन कीर्तना मुळे सामवेद हा परमेश्वरा जवळ नेणारा वेद आहे.
आरोह व अवरोह यांनी युक्त अशा मंत्राचे गायन म्हणजेच साम होय.
अथर्ववेद
अथर्ववेद हा शेवटचा वेद आहे. आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. अथर्ववेदातील बहुतांश मंत्र पद्य प्रकारात असून काही ग्रंथमय आहेत. बुद्धी, शौर्य, युद्धातील विजय, राज्याभिषेक, विवाह, आरोग्य, गर्भदान, शत्रूनाश यासाठी वापरायचे मंत्र आहेत. तसेच वशीकरण, राक्षस पिशाच यांच्यापासून होणार्या त्रासाचे निवारण करणारे मंत्रही आहेत.
अथर्व वेदातील विविध विषय दहा भागात विभागले आहेत –
भोषज्या कर्मे
आयुष्य कर्मे
अभिचार कर्मे
स्त्री कर्मे
सामनस्या कर्मे
राज कर्मे
ब्राम्हण माहात्म्य
पौष्टिक कर्मे
शांति कर्मे
विश्वोपत्ती व अध्यात्म
रहस्य विद्या, अध्यात्म ज्ञान, तांत्रिक शक्ति, संकल्प मंत्र, अभि मार्शण मात्र, आदेश मंत्र, मणिबंधन मंत्र, राजनैतिक जीवन, सामाजिक जीवन यांचे विवेचन केले आहे. ज्योतिषशास्त्रात तर प्रश्न ज्योतिषाला महत्व देऊन मुख्य १० प्रश्नांची प्रश्नावली केली आहे.
अथर्ववेद म्हणजे आणि यातील मंत्रांचे महत्व म्हणजे –
जो अज्ञात परमात्मा त्याला प्राप्त करणे व आपल्याला भोगावे लागणारे दु:ख करून सुखप्राप्ती मिळवणे. या अथर्ववेदाचा अभ्यास करताना आत्ता कलियुगातील अडी-अडचणींवर आपण मात करू याची खात्री वाटते म्हणून आपण आपल्या जीवनाच्या सुखं- दुखशी निगडीत काही महत्वाच्या मंत्रांचा अभ्यास करणार आहोत .