श्री गुरुमाऊली मायादेवी वझे

कै. कालिंदी व कै.वासुदेव डोंगरकर

हितचिंतक. बाबा (घनश्याम) कोठावळे सौभाग्य वधुवर सुचक डोंबिवली

देव-वाणी ज्योतिषालय

||  श्रीगुरूमाऊली प्रसन्न. || 

नमस्कार,  बंधु भगिनींनो.  

 

 मी अनुराधा कोगेकर, निवृत्त प्राचार्या.

  • कृष्णमूर्ती पद्धतीचा गाढा अभ्यास
  • वयाच्या १४ व्या वर्षी पहिल्या कुंडलीचे वाचन केले.
  • गेल्या ५३ वर्षापासून हजारो कुंडल्यांचा अचूक अभ्यास.
  • महादशा- अंतर्दशा- सूक्ष्मदशा- प्राणदशा यांच्या सहाय्याने अपेक्षित घटनेचा अचूक कालावधी काढून दिला जातो.
  • अडचणींतून मार्ग काढण्याचे उपायही सूचवले जातात…
  • बालआरोग्य, गूढ आजार, शिक्षणातील अडथळे, विवाह, वैवाहिक जीवनातील अडचणी, घटस्फोट, संतती व संतती दोष,
  • नोकरी व व्यवसायातील चढउतार, गुंतवणूक
  • वधुवर ग्रहमिलन व त्यांच्या आयुष्यातील धोके
  • मंगळदोष व त्याचे आयुष्यावर होणारे परिणाम, त्यांची कारणे व उपाय इत्यादींवर अचूक मार्गदर्शन.
  • वर्तमानपत्रात दैनंदिन व साप्ताहिक राशी भविष्य लेखन.
  • दिवाळी अंकात राजकीय व राशी भविष्य.
  • व्याख्याने व परिसंवाद:- मंगळाची भीती कशाला??
  • वधु-वरांच्या कुंडलीतील मंगळाचे गौडबंगाल.
  • टी. व्ही. वर वार्षिक राशी भविष्याचा कार्यक्रम
  • समुपदेशन:- विवाह पूर्व  व विवाह नंतरचे समुपदेशन
  • कौटुंबिक समस्या निवारण. 
  • वास्तूशास्त्र व वास्तू दोषावर तोडगे 
  • रत्नाच्या सहाय्याने समस्या निवारण

आजच्या आपल्या धकाधकीच्या व मोस्ट बिझी शेड्युल्डमुळे आपल्याला वाचायला वेळ मिळत नाही. माझ्या करिअरमध्ये मला असे लक्षात आले की, आजच्या पिढीच्या हातात रिकामा वेळच राहात नाही. तरूण वयापर्यंत शिक्षण, त्यानंतर करिअर व अर्थार्जनाची धडपड आणि कुटुंब यातच अडकल्यामुळे त्यांना वाचनास व चिंतनास वेळ मिळत नाही.

मला माझ्या आयुष्यात अनेक गुरू मिळाले व त्यांनी मला खूप मोलाचे ज्ञान दिले. तेच ज्ञान तुम्हा सर्वांना सहजपणे मिळावे या हेतूने हे सर्व लिहीत आहे.

तुम्ही पण जमेल तेव्हा वाचावे व तुम्हाला कसे वाटले किंवा अजून काय काय पाहिजे ते कळवावे. मला मिळालेली ज्ञानाची शिदोरी तुमच्यापर्यंत  पोहोचवण्याचे काम करून मला माझ्या गुरूवर्यांप्रती उपकृत होऊ दे. मला गुरूंकडून मिळालेले व मला कळलेले ज्ञान जसेच्या तसे तुमच्यासमोर मांडत आहे. अजाणतेपणी काही चुका झाल्यास वा राहून गेल्यास क्षमा असावी.         

कृष्णमूर्ती अभ्यासक व आपल्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न यांच्यासाठी मी  आपल्यासमोर काही माहिती घेऊन येत आहे. तसेच मी अभ्यासलेले विषयः-

  1. कृष्णमूर्ती पद्धती.
  2. उपनिषदे                
  3. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद.
  4. श्री दासबोध.
  5. श्रीसुक्ताचा अर्थ व महत्त्व.
  6. श्री अथर्वशीर्षाचा अर्थ.                        
  7. बालक-पालक व्यक्तिमत्व व परस्परसंबंध.
  8. प्राणिक हिलिंग.

100% Privacy

Guaranteed Answer

Proven Remedies

Vastu Solutions