daily horoscope

मंगळवार 05 एप्रिल 2022 चे दैनंदिन राशी भविष्य.

Read in

मंगळवार 05 एप्रिल 2022 चे दैनंदिन राशी भविष्य.

मंगळवार चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र कृतिका 16.50 पर्यंत व नंतर रोहिणी.

मंगळवार 05 एप्रिल 2022 चे दैनंदिन राशी भविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मंगळवार चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र कृतिका 16.50 पर्यंत व नंतर रोहिणी. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या वेळेनुसार आजचे कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज विनायक चतुर्थी ( अंगारक योग ) श्री गणेशल दवणा वाहणे.
मेष :–  अचानक मनात नसतानाही नातेवाईकांसाठी प्रवास करावा लागेल. मुलांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मोठा खर्च करावा लागेल.
वृषभ :–बर्याच दिवसापासून मनात ठरवलेला बेत आज तुम्हाला प्रत्यक्षात आणता येणार आहे. मित्रमैत्रिणींबरोबर जाऊन चैनीची वस्तू खरेदी कराल.
मिथुन :–नोकरदारांना आज वरीष्ठांकडून शाबासकी मिळेल.  जोडीदाराच्यरा प्तूरकृतीची काळजी मानसिक ताण वाढवेल.
कर्क :– सतत काम करणार्यांना  आज विश्रांतीची गरज भासेल. नव्याने नोकरीत रुजू झालेल्यांना आज कामाची जबाबदारी सोपवली जाईल.
सिंह :–महिलांना आपल्या वैभवाचे वर्णन करायला आवडेल. कुटुंबात मुलीच्या विवाहाच्या बाबतची बोलणी पुढे शकतील.
कन्या :–भाड्याच्या घराच्या शोधात असलेल्यांना ओळखीच्या माध्यामातून अपेक्षित  ठिकाणच्या घराची माहिती कळेल. महिलांच्या कष्टचे चीज झाल्याचे जाणवेल.
तूळ :–परदेशी असलेल्या मित्रांबरोबरचे बोलणे यशस्वी होईल. तरूणांना नोकरीत अति महत्वाच्या कमिटीमधे सामावून घेतले जाईल.
वश्चिक:–कोर्टामधील अडलेल्या कामात तुम्ही लुडबूड करू नका. पूर्वी दिलेल्या मुलाखतीतून तुमची निवड झाल्याचे आज कळवले जाईल.
धनु :–आईवडीलांबरोबर आनंदाचे क्षण अनुभवाल. घरातील ठरलेल्या समारंभाचे नियोजन करण्याचे काम तुमच्यावर सोपवले जाईल.
मकर :– लहान भावंडाला न पटणारी बाब तुमच्या सांगण्याने, समजावण्याने  पटेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला महत्व देणार्‍ या घटना घडतील.
कुंभ :–व्यवसायातील नवीन वर्षाच्या  नियोजनात तुम्हाला सामावून घेतले जाईल. शेअर मार्केट  गुंतवणूक करताना सल्ला घेतल्याशिवाय करू नका.
मीन :–भाडेकरूंच्या शोधात असलेल्यांना
ओळखीतून नवीन भाडेकरू मिळेल. कौटुंबिक वादातून  कांहीही निष्पन्न होत नसल्याचे पटेल.
 || शुभं-भवतु  ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *