Rसोमवार 28 जून 2021 चे दैनिक राशीभविष्यead in
मंगळवार 29 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 29 जून चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र शततारका 25:01 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा.
वरील राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.मेष :–आज तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळणार आहे. महिलांना आपल्या जून्या छंदाकडे, आवडीच्या
विषयाकडे वळायचय तर नक्कीच आज सुरूवात करा. आर्थिक व्यवहारही आज महत्वाचे व लाभदायक ठरतील.
अविवाहितानी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.वृषभ :–आज प्रथम संततीची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या बाबतीत मनाला समाधान देणार्या घटना घडतील.
नोकरीच्या प्रतिक्षेतील मंडळीना आपल्या मनासारखी नोकरी मिळणार असल्याचा सुगावा लागेल. घरगुती खानावळीच्या
बाबतीत मेहनत वाढेल.मिथुन :–नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन केल्याचे लक्षांत येईल. हाँटेल व्यवसायातील कर्मचार्यांनी आपली जबाबदारी
चोखपणे न पाळल्याने मोठा आरोप येईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींकडून लहानांसाठी अभ्यासाच्या विषयात शिकवले
जाणार आहे.कर्क :–जरी नोकरीतील जबाबदारीत आज वाढ झाली तरी त्याचबरोबर प्रतिष्ठेत ही वाढ होईल व सन्मान वाढेल. वयस्कर
मंडळींच्या बाबतीत नैराश्य दूर करणार्या घटना घडतील. कुटुंबात नवीन पाहुण्याचे आगमन होणार असल्याची गोड
बातमी मिळेल.सिंह :–हातातील शिल्लक बचतीकडे न वळवता कर्ज फेडण्याचे नियोजन कराल. अभ्यासू वृत्तीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या
अभ्यासाचे योग्य प्रकारे नियोजन केल्यास या वर्षी उत्तम यश मिळेल. सरकारी नोकरदारानी आज कामात जराही चूक करू
नये.कन्या :–व्यावसायिकांना व्यवसायातील अडचणींवर उपाय म्हणून नोकर कपात करावी लागेल. व्यापारात व
राजकारणातही हितशत्रूंकडून त्रास संभवतो. उसने दिलेल्या पैशासाठी विसंबून राहू नका. तरूणांना अर्धवट राहिलेले
शिक्षण पूर्ण करावेसे वाटेल.तूळ :–कुटुंबात धार्मिक कार्याचे आयोजन होईल. वरिष्ठांच्या मर्जीकरीता व नोकरी टिकवण्याकरीता कामातील चिकाटी
वाढवावी लागेल. ट्रेडिंग च्या व्यवसायातील फायदा अचंबित करणारा ठरेल. अचानक एखाद्या कर्जाची फेड कराल.वृश्र्चिक :–मित्रमंडळींबरोबर वेळ अगदी आनंदात व सुखासमाधानात जाईल. सरकारी योजनांतून मिळणारे लाभ अजूनही
मिळण्यात वेळ लागेल तरी त्यावर अवलंबून राहू नका. आर्थिक परिस्थिती चांगली झाल्याने महिलांना एखादा छंद
जोपासण्याची संधी मिळेल.धनु :–निवृत्त झालेल्यांचे मिळणार्या पैशाकडे लक्ष लागून राहील. आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेतल्यास पुढील
धोका टळेल. नोकरीत सुखद अनुभव देणार्या घटना घडतील. तरूणांना अध्यात्मिक विषयाची गोडी वाढेल. नव्याने
गुंतवणूक करताना पूर्ण विचाराने करा.मकर :–प्रेमाच्या व्यवहारात कुटुंबियांकडून विरोध होईल. पती पत्नीच्या एकत्रित व्यवसायात एकमत होणार नसल्याने
आज निर्णय घेण्याबाबत चर्चा करू नका. आईपासून दूर असलेल्यांना आज आईची प्रकर्षाने आठवण येईल. सामाजिक
कार्यकर्त्यानी स्पर्धात्मक कामाच्या मागे लागू नये.कुंभ :–वाहन घेणे किंवा विकणे याबाबतचा कोणताच व्यवहार आज करू नये. गँरेजमधील कर्मचार्यांना आज एखाद्या
चमत्कारीक व्यक्तीचा अनुभव येईल. पुरूषांच्या ब्युटी पार्लर या व्यवसायाची नव्याने चांगली सुरूवात कराल.मीन :–बालसंगोपन केंद्र किंवा बालसुधार केंद्रासाठी तुम्हाला अचानक आज मदत करण्याची संधी मिळेल. लेखक व कवी
यांना त्यांच्या चाहत्यांकडून कौतुकाचे व सन्मानाचे अभिप्राय येथील. विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती वाढवण्यासाठी प्रयोग करावे
लागतील.
||शुभं–भवतु ||