Read in
शनिवार 10 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 10 जुलै चंद्ररास मिथुन 18:37 पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु 25:01 पर्यंत व नंतर पुष्य. वरील दोन्ही
राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.
मेष :– एखाद्या पुस्तक प्रकाशनासाठी जाण्याचा बहुमान मिळेल. महिलांना कौटुंबिक अडचणीवर मात करता येणार आहे.
घरातील सदस्यांना तुमच्याकडून आश्र्चर्य चकित करणार्या घटना घडतील. लहान मुलांच्या प्रकृतीत अपेक्षेप्रमाणे
सुधारणा होऊ लागेल.
वृषभ :- नोकरीच्या ठिकाणी तुमच्या हाताखालील व्यक्तीकडून तुम्हाला सन्मानाने वागवले जाईल. वडीलार्जित वारसा
हक्का विषयी तुम्ही तुमचे मत परखडपणे मांडणे योग्य राहील. आरोग्याच्या दृष्टीने तरूणांनी कोणत्याही व्यसनांचा
आधार घेऊ नये.
मिथुन :–तुम्हाला विचार करण्याच्या पद्धतीत बदल करण्यासाठी तज्ञांकडून सुचवले जाईल. नोकरीतील कामाच्या
ताणतणावाला अती महत्व दिल्यामुळे प्रकृतीस्वास्थ्य बिघडणार आहे. महिलांना स्वयंपाकघरातील कामाचा कंटाळा
येईल.
कर्क :–डाँक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेला निर्णय फायदेशीर नसल्याचे जाणवेल. कुटुंबातील आर्थिक गणिते कोलमडून
जातील. लहान मुलांकडून तुमचा मोबाईल बिघडेल. तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक तो आहारात बदल
करावा लागेल.
सिंह :–आईच्या बँगेतील चोरकप्प्यात ठेवलेल्या पैशांचा हिशोब लागणार नाही. मोठ्या भावंडांबरोबरील चर्चेतून तात्विक
मतभेद होतील. ठरलेल्या विवाहाच्या बाबतीत अचानक नकारात्मक गोष्टी निर्माण होतील. कोणालाही शब्द देताना प्रथम
पूर्ण विचार करा.
कन्या :–ज्येष्ठ संततीच्या मानसिक आरोग्याच्या तक्रारीत वाढ होईल. वडिलांबरोबर केलेल्या चर्चेमुळे बर्याचशा
गोष्टीना सकारात्मक वळण मिळेल. वयस्कर मंडळींच्या पाय व मांड्या दुखतील. दत्तक संततीकडून प्रेमळ चौकशी होईल.
तूळ :–परगावी असलेल्या संततीबाबात आईला चिंता वाटेल. व्यवसायासाठी घातलेल्या भांडवलात नुकसान झाल्याने
मोठा प्रश्र्न उभा राहील. राजकीयदृष्टय़ा आज तुमच्या मदतीला तुमचे मित्रमंडळी धावून येतील.
वृश्र्चिक :–महिलांना व लहान मुलांना कान दुखण्याचा त्रास संभवतो. घरातील नोकर चाकर यांना आर्थिक मदत देण्याचे
ठरवाल. वैवाहिक जोडीदाराला मनापासून समजून घेतल्यास दोघांमधील ताणतणाव कमी होईल.
धनु :–व्यसनापासून व इतर प्रलोभनापासून दूर राहिल्यास तुमच्या व्यक्तीमत्वाचा बदल होईल. नोकरीच्या ठिकाणी
तुमच्या लाँजिकल विचारामुळे कंपनीला आर्थिक लाभ करून द्याल. कुटुंबात एकमेकांच्या प्रेमळ सहवासाने वातावरण
आनंदी राहील.
मकर :–नोकरीत वरिष्ठांना दिलेला शब्द तुम्ही पाळल्यामुळे तुमच्यावर वरिष्ठ खूष होतील. घरगुती व्यवसायात केलेला
बदल व्यवसाय वाढीस उपयोगी पडेल. कुटुंबातील आजारी बहिणीसाठी भावाने केलेली मेहनत उपयोगी पडल्याने
कुटुंबात आनंद निर्माण होईल.
कुंभ :–तुम्ही दिलेल्या आश्र्वासनातून विद्यार्थ्यांचे बळ व हिम्मत वाढल्याचे जाणवेल. आर्थिक गरजेकरीता कोणाचीही
मदत न घेता वेळ निभावून न्याल. महिलांवरील गृहकर्तव्याच्या जबाबदारीत वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या
जागरूकपणामुळे व्यवहारातील अफरातफर सापडेल.
मीन :–घरातील आजारपणाकडे दुर्लक्ष करू नका. रखडलेल्या व्यवहारावर लक्ष केंद्रीत केल्यास कामे मार्गी लागणे अवघड
जाणार नाहीत. नात्यातील कटुता टाळण्यासाठी वागण्या बोलण्यात पारदर्शकता ठेवावी लागेल.
| शुभं-भवतु ||