Rसोमवार 28 जून 2021 चे दैनिक राशीभविष्यead in
रविवार 18 जुलै 2021 ते शनिवार 24 जुलै 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.
रविवार 18 जुलै चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र स्वाती 24:07 पर्यंत व नंतर विशाखा. सोमवार 19 चंद्ररास तूळ 16:53
पर्यंत व नंतर वृश्चिक. चंद्रनक्षत्र विशाखा 22:26 पर्यंत व नंतर अनुराधा. मंगळवार 20 चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र
अनुराधा 20:32 पर्यंत व नंतर ज्येष्ठा. बुधवार वृश्र्चिक 18:29 पर्यंत व नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 18:29 पर्यंत व नंतर मूळ.
गुरूवार 22 चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 16:25 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा. शुक्रवार 23 जुलै धनु 19:57 पर्यंत व नंतर
मकर. चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 14 :25 पर्यंत व नंतर उत्तराषाढा. शनिवार चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तराषाढा 12:40
पर्यंत व नंतर श्रवण.
मंगळवार 20 जुलै आषाढी एकादशी. पंढरपूर यात्रा. चातुर्मास्यारंभ.
बुधवार 21 प्रदोष, वामन पूजन, शाकगोपद्मव्रतारंभ, पुर्नयात्रा, बकरी ईद.
मेष :–या सप्ताहात तुम्हाला तिर्थ क्षेत्र भेटीची ओढ लागेल. कुटुंबात नातेवाईक व मित्रमैत्रिणींच्या सहवासात संत पुरूषांचे
महात्म्य यांवर चर्चा होतील. पूर्वपुण्याईने गुरूपदेश मिळेल व प्रार्थना, पूजा करण्याची ओढ लागेल. सेवाभावी वृत्तीत वाढ होऊन
तुमच्या हातून दानधर्म होईल. राजकारणातील मंडळीनी आपल्या अभ्यासाशिवाय बोलू नये इतरांकडून विरोध होऊन नामुष्कीची
वेळ येईल. डाँक्टर, सर्जन यांना गुंतागुंतीच्या मानसिक ताण द्णारंया शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. नोकरीतील तुमच्या
सर्व प्रश्र्नांना उत्तरे आहेत हे लक्षात घ्या. आईवडीलांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. संततीच्या प्रतिक्षेतील दांपत्यास
आय व्ही एफ सारख्या ट्रिटमेंटचा आधार घ्यावा लागेल. अधिकाराचा वापर करताना प्रत्येकाला जागरूक रहावे लागेल.
वृषभ :–ज्यांच्या मनात, डोक्यात निवडणूकीचे वारे आहेत अशांनी सध्यातरी गप्प बसावे हेच चांगले. व करायचेच असेल तर
वकील मंडळींची मदत घ्यावी, सल्ला घ्यावा. एखादा प्रवास खंडीत झाला असेल तर पुन्हा नव्याने सुरू करण्याच्या भानगडीत पडू
नये. त्यातून कांहीही साध्य होणार नाही. व्यवसायासाठी कर्जाचा विचार करत असाल तर या सप्ताहात कर्जप्रकरणास सुरूवात
करायला हरकत नाही. व्यवसायातील इम्रजन्सीसाठी उधार पैशाचीही सहजपणे सोय होणार आहे. पुरूष मंडळीना
सासूरवाडीकडून मोठी मदत मिळेल. तर महिलांना सासरच्या नात्यातून आर्थिक सोय होईल. अध्यात्मिक क्षेत्रातील ज्ञानी
मंडळीना भजन किर्तनाचा आनंद घेता येणार आहे.
मिथुन :–लहान मुलांच्या प्रकृतीच्या बाबतीत अतिशय जागरूक रहावे लागेल. अपत्यप्राप्तीच्या प्रतिक्षेतील दांपत्यास आ नंदाती
बातमी कळणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील उच्चशिक्षिताना मानाच्या स्थानावर, पदावर प्रमोशन होईल व सर्वांकडून कौतुक होईल.
कुटुंबातील पारंपरिक पद्धतीने करण्यात येणार्या पूजा करण्याचे ठरेल. उच्चशिक्षण निमित्ताने परदेशी जाण्याचा निर्णयात इतरांच्या
हस्तक्षेपामुळे सर्व निर्णय बदलले जातील. महिलांना मेनोपाँजचा व मासिक धर्माचा त्रास झाल्याने महिला गळून जातील.
कोणत्याही नोकरीतील कर्मचार्यांनी कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टचार, लाचलुचपतच्या भानगडीत पडू नये. विवाहाचा प्रस्ताव
मान्य झाल्याने तरूण वर्गास आनंद होईल.
कर्क :–निद्रानाशाचा त्रास असलेल्यांना या सप्ताहात छान व शांत झोपेचा आनंद घेता येणार आहे. मुंबईत नोकरी व्यवसायास
लोकलने जाणार्या तरूणांना फारशी दगदग होणार नाही. वैवाहिक जीवनात आनंदाचे व समाधानाचे क्षण अनुभवता येणार
आहेत. विवाहाच्या प्रतिक्षेतील तरूण तरूणींना सर्व गोष्टी मान्य असूनही वयातील अंतराच्या पाँईंट वर अडकून
राहतील.कारखान्यातील कामगार वर्गास मानसिक आनंद देणार्या घटना घडतील. कुटुंबात मुलींच्या मताला आईवडीलांचा
विरोध होणार आहे. तरी वातावरणातील तणाव जास्त वाढू देऊ नका. लहान मुलांना सर्दी तापाचा त्रास होईल.
सिंह :–या सप्ताहात तुम्हाला तुमचा मोबाईल फारच जपावा लागणार आहे. लहान मुलांच्या हाताला किंवा बोटांना दुखापत
होण्याचा धोका आहे. फुलझाडांची, बागकामाची हौस असलेल्यांना मनसोक्त बागकाम करता येणार आहे. मित्रमंडळी, कडून
वेगवेगळ्या महत्वाच्या सूचना मिळतील. पोलिस खात्यातील कर्मचार्यांना जुन्या शोध न लागलेल्या गुन्ह्याचा सुगावा लागेल.
एकत्र कुटुंबातील मंडळींचा ज्येष्ठांच्या वाढदिवसानिमित्त एकत्रित कार्यक्रम होईल व त्यात तुम्हाला गाणे म्हणण्यात बजावण्याचा
आनंद मिळेल. विज्ञान विभागाच्या प्राध्यापकांना स्वत:चे आँन लाईन क्लास सुरू करण्याची संधी मिळणार आहे.
कन्या :–नोकरीच्या ठिकाणी गरज नसताना कोणतीही माहिती इतरांना देऊ नका. पोलिसांनी आपल्या अधिकारातील गुप्त
प्रकरणांची चर्चा कोणाबरोबरही करू नये. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपले विचार व्यक्त करण्यास हरकत नाही. महत्वाच्या
कामातील गोपनियता न पाळल्याने वरिष्ठांकडून नोटीस मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रात लहान मुलांना चमकण्याची संधी मिळेल व
सर्वांकडून गोड कौतुक होईल. महिलांना आपल्या चेहर्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्याची इच्छा होईल.
पार्लरच्या उद्योगातून पुरष व महिलां सर्वानाच चांगलाी आर्थिक प्राप्ती होईल. विद्यार्थी काँलेजच्या प्रवेशासाठी उतावीळ होतील.
तूळ :–तुमच्या स्वभावातील आळशीपणा आज चांगलीच वाढ होऊन दिवसभर काम करावेसे वाटणार नाही. हौशी मंडळीना मात्र
आज काय काय करू आणि काय नको असे होईल. अती उत्साहाच्या भरात काम करायला सुरूवात कराल. राष्ट्रीय मालमत्तेच्या
संरक्षणाचे काम असलेल्यांना या सप्ताहात अतिरिक्त ताण जाणवेल. महिलाना डोकेदुखीचा, मायग्रेनचा त्रास जाणवेल. नवीन
नोकरीच्या शोधतील कामगारांना चांगली नोकरीची संधी उपलब्ध होईल. आय. टी. क्षेत्रातील उच्चशिक्षितांना नवीन वाढीव
काँन्ट्रक्टस् करण्याची संधी मिळेल. वयस्कर मंडळीना हा सप्ताह अतिशय आनंदाचा जाणार आहे.
वृश्र्चिक :–लेखकांना लवकरच त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करता येणार आहे. महिलांना डाव्या डोळ्याला एखादा मार
लागण्याचाी शक्यता आहे तर लहान मुलांच्या डोळ्याना दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. बँक कर्मचार्यांना
नवीन कामाची जबाबदारी सोपवण्यात येईल. कुटुंबातील महिलांना ज्येष्ठांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या पक्वान्नांचे आयोजन
करावे लागेल. चुलत मावस भावंडामधील प्रेमाला भरते येईल व जुने रुसवे फुगवे संपुष्टात येथील. तरूणांना आपली विचार
करण्याची पद्धतच चुकीची असल्याचे पटेल. मोठा ब्रँड असलेल्या वर्तमानपत्राच्या संपादकांना आरोप सहन करावा लागेल.
धनु :–पतीपत्नीच्या व्यवसायातील कामाचा व्याप अचानक वाढेल व त्याच प्रमाणात आर्थिक लाभही होणार आहे. विवाहित
मुलींना वडिलांची काळजी मानसिक ताण वाढवणारी ठरेल. बोलण्यातील व ऐकण्यातली गोंधळामुळे गैरसमज होतील तरी प्रथम
नीटपणे समजून घ्या व मगच पुढील आखणी करा. या सप्ताहात तु हाला तुमच्या कलागुणांना वाव देता येणार आहे. गायक,
वादक यांना आँन लाईन कार्यक्रम करता येणार आहे. वयस्कर मंडळीना तसेच गर्भवती स्त्रियांना अचानक पाठ अखडण्याचा किंवा
प दुखण्याचा त्रास होईल. महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळीना इतरांना ट्रेनिंग देण्याची जबाबदारी सोपवली जाईल.
मकर :–व्यवसाय व्यापारात नवीन योजना सुरू करणार असल्याची घोषणा कराल. आर्थिक प्राप्ती चांगली झाल्यामुळे कुटुंबात
आनंदीआनंद साजरा होईल. परगावी गेलेल्या आईवडीलांच्या आठवणींमुळे मन व्याकुळ होईल. विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीवर
विश्र्वास ठेवून प्रयत्न वाढवल्यास नक्की यश खेचून आणाल. शासकिय परिक्षांच्या अभ्यासाची तयारी जोरात होण्यासाठी तज्ञ
शिक्षकांचे मार्गदर्शन मिळेल. किरकोळ घरगुती उद्योग करणार्यांना या सप्ताहात नवनवीन क्लायंट्स मिळतील. जाहिरात व
प्रसिद्धीच्या क्षेत्रातील तज्ञांकडून अतिशय उत्कृष्ठ कल्पना साकारतील.
कुंभ :–सार्वजनिक इमारतीच्या दुरूस्तीच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल. मोठ्या काँम्लेक्समधील पाण्याच्या
टाक्या चे निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारीही तुमच्यावरच येणार आहे. कुटुंबात अचानक नवीन महागडी चैनीची वस्तू
मोठ्या मुलांकडून खरेदी केली जाईल. पूर्वी घेतलेल्या घराचे पझेशन लवकरच मिळणार असल्याचे पत्र येईल. कुटुंबातील आजी
आजोबांच्या आवडीचा पदार्थ नातवंडाकडून केला जाईल. नोकरीत ज्यांचे काँन्ट्रक्टस् संपत आले आहे त्यांनी या सप्ताहाच्या शेवटी
वरिष्ठांना भेटून प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळेल. कालपर्यंतचे अनोळखी असलेल्यांची जूनी ओळख निघेल.
मीन :–पतिराजांकडून सोन्याचा दागिना गिफ्ट मिळेल. आईवडीलांच्या व्यवसायातून आज तुम्हाला प्रतिष्ठा लाभणार आहे. जुन्या
घराच्या व्यवहारातून नवीन जागा घेण्याचा विचार पक्का कराल. कुटुंबात मोठ्या मुलाच्या मताला महत्व द्यावे लागेल. हा सप्ताह
तुम्हाला लाभदायक असल्याने गुंतवणूक करण्यास हरकत नाही. तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यास बुधवार व गुरूवार
चांगले दिवस आहेत. महत्वाच्या कामातील केलेल्या दिरंगाईमुळे दंड भरावा लागेल. विवाहाच्या बाबतीत अतिशय जागरूकपणे
विचार करूनच मनाला पटल्यास निर्णय घ्या.