Read in
मंगळवार 22 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 22 जून चंद्ररास तूळ 08:59 पर्यंत व नंतर वृश्चिक.
चंद्र नक्षत्र विशाखा 14:22 पर्यंत व नंतर अनुराधा.
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने
नक्षत्रीय फलादेश देत आहे.गुरूवार 24 जून रोजी वटपौर्णिमा असल्याने आज मंगळवारपासून त्रिदिनात्मक सावित्री व्रताचा आरंभ होत आहे.
मेष :– वैवाहिक जीवनातील घडामोडींच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्यास सासूरवाडीकडून दणका बसण्याचा
धोका आहे. सासूरवाडीकडून सशर्त अटींवर व्यवसायात आवश्यक तेवढी आर्थिक मदत मिळेल. सरकारी नियमांचा
ससेमिरा मागे लागेल.वृषभ :–नोकरीतील तुमच्याकडून झालेली दिरंगाई , तसेच व्यवसायातील न भरलेल्या टँक्स बद्धल विचारणा
करणारी नोटीस येईल. कोणताही वशिला लावायचा प्रयत्न केल्यास अडचणी वाढतील.मिथुन :–नोकरीतील अडचणीत वाढ झाल्याने नोकरीविषयी आत्मियता राहणार नाही. आजोळकडील ओळखींच्या
माध्यमातून अडचणींतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तुमची बाजू
मांडण्यास आता संधी मिळणार नाही तरी आता फँक्ट अँक्सेप्ट करावी हे उत्तम.कर्क :–आज व उद्या आईवडीलांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. जमिन व घर याबाबतच्या कोर्टात
चाललेला वाद विवाद कोर्टाच्या बाहेर समंजसपणे मिटण्याचे मार्ग सापडतील. नवीन घराचे पझेशन मिळण्याचे
ठरेल.सिंह :– आर्थिक कोंडी दूर झाली असूनही नियोजनातील चुकांमुळे आज आर्थिक चणचण जाणवेल. व्यावसायिकांना
गुंतवणूकीच्या जून्या व्यवहारांवर चांगला लाभ होईल. तरूणांनी जुगार सदृश्य व्यवहार टाळावे.कन्या :–नोकरीत तुमच्यावर आलेले बदलीचे सावट तुम्हाला लाभदायक ठरेल. जोडीदाराच्या नावाने नव्याने केलेली
गुंतवणूक लाभदायक राहील. दवाखान्यातून डिसचार्ज मिळण्यात आज कोणतीही अडचण राहणार नाही.तूळ :–मित्राच्या मदतीने व्यवसायातील नवीन योजना सुरू कराल. आजपर्यंतची नोकरीतील तुमचा
कामाबाबतचा असलेला आदर व सन्मान वाढेल. पतीपत्नीच्या व्यवसायात अचानक वृद्धी होणारे प्रसंग येतील व
प्रतिष्ठेची वाढ होईल.वृश्र्चिक :–स्मृतीभंशाचा त्रास असलेल्यांना घराबाहेर सोडू नका. विवाहित महिलांनी कुटुंबाकरता घेतलेल्या कष्टाची
जाणीव इतरांना झाल्याचे पाहून महिलांना कृतकृत्य झाल्याचे जाणवेल. शिक्षक व प्रोफेसर मंडळींकडून मोठ्या
प्रोजेक्टची आखणी होईल.धनु :–पतीपत्नी दोघांच्या सहविचाराने नवीन घराचे बुकींग कराल. विवाहेच्छूना विचार जूळणारा जोडीदार
मिळाल्याने आनंद होईल. मोठ्या प्रमाणातील होर्डींगच्या कामातील व्यवहारावर संदर्भिय खात्याकडून आँब्जेक्शन
घेतले जाईल.मकर :–लहान मुलांच्या अपचनाच्या तसेच उलटी जुलाबाच्या तक्रारी निघतील. पूर्वी उधार दिलेल्या रकमेच्या
विश्र्वासावर बसू नका. महिलांना स्वकष्टार्जित धनाचा अडचणीं करीता वापर करण्याची इच्छा होईल.कुंभ :– इतरांच्या सांगण्यावरून घेतलेला निर्णय फायदेशीर असल्याचे मुलांना पटेल. कालपर्यंत ज्यांच्याबरोबर
तुमचे चांगले पटत होते त्यांच्या वागण्यामुळे तुमच्या मनात कटुता निर्माण होईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या
मनातील विचार ओळखून त्यांची इच्छा पूर्ण करावी.मीन :–प्रवासातील जून्या ओळखीची सरकारी कार्यालयात भेट होईल. वैवाहिक जीवनात गोड बातमी मिळेल.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूर गावी किंवा परदेशी जाण्याची संधी मिळेल. या सप्ताहात फारशी आर्थिक चिंता
राहणार नाही.
||शुभं–भवतु ||