daily horoscope

शुक्रवार 02 जूलै 2021 चे दैनिक राशीभविष्य

Rसोमवार 28 जून 2021 चे दैनिक राशीभविष्यead in

शुक्रवार 02 जूलै 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 02 जूलै चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र रेवती अहोरात्र.

वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या
पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–प्रकृती अस्वास्थ्यामूळे आज तुम्हाला काही करावेसे वाटणार नाही. रोजच्याच कामातील अचानक गुंतागुंत
वाढल्याचे जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी आज नेहमीपेक्षा कामाचा भारही जास्त जाणवेल. दिवसभर सकारात्मक
राहण्याचा प्रयत्न करा.

वृषभ :–कुटुंबात अचानक मित्रमंडळींचे येणे होऊन सहजच गेट टुगेदरचा फिल येईल. तरूणांची चैन करण्याची प्रवृत्ती
वाढेल. महिलांना उद्योगासाठी बँकेचे कर्ज काढण्याची कल्पना सुचेल. गेल्यावर्षापासूनचे रेंगाळलेले काम पूर्ण
करण्यासाठी सहकार्‍यांची मदत मिळेल.

मिथुन :–संततीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नोकरीतील बाकी येणे हातात पडल्यामुळे सुखवस्तू, किंवा
चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मोह होईल. सरकारी कामातून मिळणारे उत्पन्नही लवकरच मिळणार
असल्याचे संकेत मिळतील.

कर्क :–नवीन जागेच्या शोधतील महिलांना बजेटमधील जागेची माहिती कळेल. पूर्वीच बुकींग केलेल्यांना घर पूर्ण
होत आल्याचे कळेल. कुटुंबात गावाकडून आजीआजोबांचे येणे होईल. भूतकाळातील घटनांवर सध्याचा प्रसंग
पडताळू नका.

सिंह :–ज्येष्ठांनी आहार व आराम यांकडे विशेष लक्ष द्यावे. तरूणांनी व्यायामाचा अतिरेक करू नये. वयस्कर
मंडळींच्या विचारांमधे सुसंगती राहणार नाही तरी त्यांना समजून घ्यावे लागेल. गरज नसताना प्रवास करू नये.

कन्या :–तरूण वर्गाने व्यसनापासून दूर राहण्यासाठी सकारात्मक विचार करावा. व्यावसायिक क्षेत्रातील अंदाजावर
कोणतीही गणिते व व्यवहार ठरवू नका. मित्रमंडळीमधे तुमच्याविषयी अतिशय आदराची भावना निर्माण होईल.

तूळ :–नव्याने आलेल्या नोकरीच्या संधीने हुरळून जाऊ नका. पूर्ण माहिती घेऊनच पहिली नोकरी सोडा. घराचे
सँनिटायझेशन करून घेतले जाईल. लहान मुलांच्या कलेला चांगला वाव मिळेल. महिलांनी आँन लाईनच्या
माध्यमाचा व्यवसायात वापर करावा.

वृश्र्चिक :–वडिलोपार्जित इस्टेटीबाबत आता पक्का निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या
विचाराने निर्णय घ्या. आर्थिक स्थिरता आल्याने मानसिक स्वास्थ्य वाढेल. विशेषत: ज्येष्ठांच्या आवडीच्या
गोष्टींची खरेदी कराल.

धनु :–मित्रमैत्रिणींकडून प्रेरणा घेतल्याने नवीन व अवघड विषयाचा अभ्यास करण्याची मानसिक तयारी होईल.
अचानक खर्चाच्या बाबींमधे वाढ होऊन खरेदीचा मनावर ताबा राहणार नाही. महिलांनाही काटकसरीचा विसर पडेल.

मकर :–कुटुंबप्रमुखांनी कोणतेच निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नयेत. स्वत:च्या व्यवसायातील अडचणी
इतरांना सांगू नका. बाहेरगावी असलेल्या मुलांबरोबर त्यांच्या अडचणींवर चर्चा करावी लागेल. नव्याने करत
असलेल्या कलाक्षेत्रातील कामात चांगली प्रगती होईल.

कुंभ :–आज तुम्हाला प्रसंगावधानाने वागावे लागणार आहे. नोकरीच्या ठीकाणीही कामात अचानक आलेल्या
अडचणीला तोंड द्यावे लागेल. तरूण मंडळींचा सहवास ज्येष्ठांना हवाहवासा वाटेल. चुकीच्या मैत्रीच्या संबंधातून
मानसिक त्रास निर्माण होईल.

मीन :–नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आज तुमच्या स्वभावातील लहरीपणा इतका वाढेल की क्षुल्लक घटनांवरून
वाद निर्माण होईल. आपल्या नियोजित कामावर लक्ष केंद्रित केल्यास अपेक्षित साध्य साधता येईल.

||शुभंभवतु ||

 

daily horoscope

गुरूवार 01 जूलै 2021 चे दैनिक राशीभविष्य

Rसोमवार 28 जून 2021 चे दैनिक राशीभविष्यead in

गुरूवार 01 जूलै 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 01 जूलै 2021 चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 27:48 पर्यंत व नंतर रेवती.

वरील राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.

मेष :–आज मानसिक त्रास होणार्‍या घटनांपासून स्वत:हूनच दूर रहा. मुलांकडून नकळतपणे तुमचे मन दुखावले
जाणार आहे. नोकरीत जून्या सहकार्‍यांची भेट झाल्याने मनास उर्जा मिळेल. महिलांनी सकारात्मक विचाराने
वागल्यास अवघड कामही सोपे वाटेल.

वृषभ :–सकाळपासूनच कामाची होणारी धांदल दुपारपर्यंतही तशीच चालणार आहे. तरूण मुलांच्या मनातील
विचाराचा जराही थांगपत्ता लागणार नाही. नोकरीव्यतिरिक्त राहिलेल्या वेळेत एखादा उद्योग करण्याचे नियोजन
कराल.

मिथुन :–नव्याने आर्थिक गुंतवणूक करायला आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे. उद्योग, जोडधंद्यातून
होणारी आर्थिक प्राप्ती आचंबित करणारी ठरेल. तरूणांना एखादा व्यावसायिक कोर्स करण्याची इच्छा निर्माण होईल.

कर्क :–महिलांना मेनोपाँजचा तसेच मासिक पाळीचा अतिशय त्रास होईल. स्वेच्छा निवृत्तीच्या विचारात असल्यास
विशेष लाभ होणार नसल्यास घेऊ नका. इथून पुढे नोकरीतील वातावरण समाधानकारक असणार आहे.

सिंह :–डळमळीत झालेली आर्थिक स्थिती अचानक सुधारण्याचे संकेत मिळतील. नवीन नोकरीच्या शोधात
असणार्‍यांना नवीन चांगली संधी मिळेल. नातेवाईकांबरोबरचे बिघडलेले संबंध नव्याने प्रस्थापित कराल.

कन्या :–धार्मिक कार्यासाठी नातेवाईक एकत्र आल्याने कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. संततीच्या कलाने
घेतल्यास वादाचे प्रसंग टळतील व समजूत काढणेही सोपे जाईल. नोकरीत निष्कारण कष्ट व दगदग वाढणार आहे.

तूळ :–कुटुंबात जोडीदाराचा लहरीपणा वाढेल त्यामुळे आज मौन धारण करावे लागेल. कुटुंबात नवदांपत्याकडून गोड
बातमी कळेल. अस्थमा, किंवा श्वासांचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.

वृश्र्चिक :– कमी श्रमाने आज जास्त लाभ होणार आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक लाभदायक राहील. वयस्कर
मंडळीनी औषधाचे वेळापत्रक नीट सांभाळावे. आज महिलांना, तरूणींना मनातील इच्छापूर्तीचा आनंद मिळेल.

धनु :–आर्थिक बाजू सुधारल्यामुळे मुलांच्या आवडीच्या गोष्टींची खरेदी कराल. पतीपत्नीच्या विचारातील तफावत
वाद निर्माण करेल. नात्यातील धार्मिक विधी उपस्थित राहण्याचा आग्रह तुम्हाला मोडता येणार नाही.

मकर :–तरूणांच्या आरोग्यात चांगली सुधारणा होईल. कुटुंबात स्वास्थ्य निर्माण होईल. परदेशी जाऊ इच्छिणार्यांनी
आता विचार करायला हरकत नाही. उधारीवर कोणत्याही वस्तूंची खरेदी करू नका. आज ठरवलेल्या साध्या साध्या
गोष्टीतही विलंब होईल.

कुंभ :–जूनी येणी परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. हातातील पैशांचा वापर काटकसरीने केल्यास मानसिक त्रास
होणार नाही. कोणत्याही प्रकारची लाँटरी किंवा कोणत्याही शेअर्समध्ये आज पैसे गुंतवू नयेत नुकसान संभवते.

मीन :–नोकरीत कोणतीही जोखीम घेऊ नका. आर्थिक बाजू समाधानकारक झाल्याने कुटुंबात सुखवस्तू ची खरेदी
कराल. वडीलांकडून मानसिक आनंद देणार्‍या घटना घडतील. मुद्धाम वडिलांच्या इच्छेकरीता वेळ काढून आज
धार्मिक विधी पार पाडाल.

||शुभंभवतु ||

 

daily horoscope

बुधवार 30 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Rसोमवार 28 जून 2021 चे दैनिक राशीभविष्यead in

बुधवार 30 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 30 जून चंद्ररास कुंभ 19:42 पर्यंत व नंतर मीन.
 

चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा 26:02 पर्यंत व नंतर उत्तरा भाद्रपदा.
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने
नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–नात्यातील बिघडलेल्या नातेसंबंधात तुम्हाला मध्यस्थी करावी लागेल. समोर आलेल्या प्रसंगात तुम्हालाही
मार्ग काढणे काहीसे अवघड जाणार आहे. नोकरीत प्रमोशनच्या बाबतीत स्वतहून कोणतेही भाष्य करू नका.

वृषभ :–हातातील असलेल्या गोष्टीत जास्त रस घेतल्यास आनंदाचे क्षण अनुभवता येथील. आर्थिक व्यवहार
करताना कोणतीही जोखीम घेऊ नका. डाँक्टर मंडळीना आपल्या नियोजित कामापेक्षा जास्त दगदग होईल.
महिलांची लहान सहान कारणावरून मानसिक चिडचिड होईल.

मिथुन :–वयस्कर मंडळींना पाय घसरून पडण्याची भिती आहे तरी काळजी घ्यावी लागेल. तुमच्या बोलण्यातील
चतुरपणामुळे तुमचा प्रभाव पडेल. सरकारी कामातील दुर्लक्षित राहिलेल्या कामाकडे आज लक्ष दिल्यास दंड टळेल.

कर्क :–नियोजन करूनच केलेल्या कामातील प्रगती समाधानकारक राहील. ज्येष्ठांच्षा वागण्या बोलण्यातून
इतरांचा गैरसमज होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. नोकरीतील तुमच्या जबाबदारीतील कामाकडे जराही
दुर्लक्ष करू नका.

सिंह :–आपण आता कोणाबरोबर मैत्री करायची व कोणाबरोबर नाही याचा संभ्रम दूर होईल. कोणत्याही प्रलोभनाला
बळी न पडता नियमात बसणारी कामेच करा. नोकरीतील कामाचा ताणतणाव वाढल्याने ब्लडप्रेशरचा त्रास
संभवतो.

कन्या :–उच्चशिक्षणासाठीचे परदेशी जाण्याचे मनसुबे आता दृष्टीपथात येथील. मित्रपरिवाराबरोबर आज कोणताही
आर्थिक व्यवहार करू नका. कुटुंबातील वातावरणातील ताण तणाव आज तुमच्या हस्तक्षेपाने कमी होणार आहे.

तूळ :–नैतिक मुल्ये जपून घेतलेले निर्णय एकदम अचूक ठरतील. नोकरीतील प्रोजेक्टमधे नव्या प्रयोगांना
वरिष्ठांची परवानगी मिळेल. महिलांना नेत्रविकाराचा त्रास संभवतो. घरातील व्यवहारात सकारात्मक पवित्रा घ्यावा
लागेल.

वृश्र्चिक :–कोणत्याही निर्णयात घाई करू नका. आपल्या वागण्या बोलण्यातून इतरांबद्धलचा राग व्यक्त होईल.
लहान मुलांना आज त्याच्या अडमुठ्या वागण्याला समजून घ्यावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत रागावर नियंत्रण
ठेवावे लागेल.

धनु :–आज तुम्ही तुमच्या हातातील कामाबाबत आत्मविश्वास वाढवला तर नक्कीच यशाचा मार्ग दिसेल लहानश्या
अपयशाने खचून जाऊ नका. व्यवसायातील उधारी वसूल करण्याकरीता मानसिक त्रास संभवतो.

मकर :–कुटुंबातील प्रश्र्न चर्चेने सुटतात याचे उत्तम उदाहरण घालून द्याल. मोहाला व लोभाला बळी पडून नसती
आफत ओढवून घ्याल. तरूणांनी आपल्या मनातील विचार योग्य तर्‍हेने इतरांसमोर मांडावेत.

कुंभ :–कोणत्याही गोष्टीची चिंता करून काम सुटणार नाही हे लक्षांत घेऊन प्रथम कामाला लागा. वैवाहिक जीवनात
समंजसपणे वागल्यास अडचणी न वाढता योग्य मार्ग निघेल. राजकीय मंडळीनी कोणतेही डावपेच आखू नयेत.

मीन :–व्यावहारिक तडजोडीला महत्व दिल्यास कामातील गुंतागुंत कमी होईल. लहान मुलांच्या हाताला अग्नी
पासून इजा होण्याचा धोका आहे. वयस्कर मंडळीना आज त्याच्या मनासारखा आनंद मिळणार आहे.

||शुभंभवतु ||

 

daily horoscope

मंगळवार 29 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Rसोमवार 28 जून 2021 चे दैनिक राशीभविष्यead in

मंगळवार 29 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 29 जून चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र शततारका 25:01 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा.
 

वरील राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–आज तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळणार आहे. महिलांना आपल्या जून्या छंदाकडे, आवडीच्या
विषयाकडे वळायचय तर नक्कीच आज सुरूवात करा. आर्थिक व्यवहारही आज महत्वाचे व लाभदायक ठरतील.
अविवाहितानी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.

वृषभ :–आज प्रथम संततीची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या बाबतीत मनाला समाधान देणार्‍या घटना घडतील.
नोकरीच्या प्रतिक्षेतील मंडळीना आपल्या मनासारखी नोकरी मिळणार असल्याचा सुगावा लागेल. घरगुती खानावळीच्या
बाबतीत मेहनत वाढेल.

मिथुन :–नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन केल्याचे लक्षांत येईल. हाँटेल व्यवसायातील कर्मचार्‍यांनी आपली जबाबदारी
चोखपणे न पाळल्याने मोठा आरोप येईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींकडून लहानांसाठी अभ्यासाच्या विषयात शिकवले
जाणार आहे.

कर्क :–जरी नोकरीतील जबाबदारीत आज वाढ झाली तरी त्याचबरोबर प्रतिष्ठेत ही वाढ होईल व सन्मान वाढेल. वयस्कर
मंडळींच्या बाबतीत नैराश्य दूर करणार्‍या घटना घडतील. कुटुंबात नवीन पाहुण्याचे आगमन होणार असल्याची गोड
बातमी मिळेल.

सिंह :–हातातील शिल्लक बचतीकडे न वळवता कर्ज फेडण्याचे नियोजन कराल. अभ्यासू वृत्तीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या
अभ्यासाचे योग्य प्रकारे नियोजन केल्यास या वर्षी उत्तम यश मिळेल. सरकारी नोकरदारानी आज कामात जराही चूक करू
नये.

कन्या :–व्यावसायिकांना व्यवसायातील अडचणींवर उपाय म्हणून नोकर कपात करावी लागेल. व्यापारात व
राजकारणातही हितशत्रूंकडून त्रास संभवतो. उसने दिलेल्या पैशासाठी विसंबून राहू नका. तरूणांना अर्धवट राहिलेले
शिक्षण पूर्ण करावेसे वाटेल.

तूळ :–कुटुंबात धार्मिक कार्याचे आयोजन होईल. वरिष्ठांच्या मर्जीकरीता व नोकरी टिकवण्याकरीता कामातील चिकाटी
वाढवावी लागेल. ट्रेडिंग च्या व्यवसायातील फायदा अचंबित करणारा ठरेल. अचानक एखाद्या कर्जाची फेड कराल.

वृश्र्चिक :–मित्रमंडळींबरोबर वेळ अगदी आनंदात व सुखासमाधानात जाईल. सरकारी योजनांतून मिळणारे लाभ अजूनही
मिळण्यात वेळ लागेल तरी त्यावर अवलंबून राहू नका. आर्थिक परिस्थिती चांगली झाल्याने महिलांना एखादा छंद
जोपासण्याची संधी मिळेल.

धनु :–निवृत्त झालेल्यांचे मिळणार्‍या पैशाकडे लक्ष लागून राहील. आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेतल्यास पुढील
धोका टळेल. नोकरीत सुखद अनुभव देणार्‍या घटना घडतील. तरूणांना अध्यात्मिक विषयाची गोडी वाढेल. नव्याने
गुंतवणूक करताना पूर्ण विचाराने करा.

मकर :–प्रेमाच्या व्यवहारात कुटुंबियांकडून विरोध होईल. पती पत्नीच्या एकत्रित व्यवसायात एकमत होणार नसल्याने
आज निर्णय घेण्याबाबत चर्चा करू नका. आईपासून दूर असलेल्यांना आज आईची प्रकर्षाने आठवण येईल. सामाजिक
कार्यकर्त्यानी स्पर्धात्मक कामाच्या मागे लागू नये.

कुंभ :–वाहन घेणे किंवा विकणे याबाबतचा कोणताच व्यवहार आज करू नये. गँरेजमधील कर्मचार्‍यांना आज एखाद्या
चमत्कारीक व्यक्तीचा अनुभव येईल. पुरूषांच्या ब्युटी पार्लर या व्यवसायाची नव्याने चांगली सुरूवात कराल.

मीन :–बालसंगोपन केंद्र किंवा बालसुधार केंद्रासाठी तुम्हाला अचानक आज मदत करण्याची संधी मिळेल. लेखक व कवी
यांना त्यांच्या चाहत्यांकडून कौतुकाचे व सन्मानाचे अभिप्राय येथील. विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती वाढवण्यासाठी प्रयोग करावे
लागतील.

||शुभंभवतु ||

 

daily horoscope

सोमवार 28 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Rसोमवार 28 जून 2021 चे दैनिक राशीभविष्यead in

सोमवार 28 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 28 जून चंद्ररास मकर 12: 59 पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र धनिष्ठा

 

24.48 पर्यंत व नंतर शततारका .
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने
नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–आपण प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचे कसे फळ मिळते याचे जिवंत उदाहरण इतरांना दाखवाल. लहान
भावंडाचे बरेच दिवसापासून अडकलेले काम तुमच्या प्रयत्नाने मार्गी झाल्याचे कळेल व कुटुंबातील सर्वानाच आनंद
होईल.

वृषभ :–संततीच्या प्रकृतीची काळजी वाढवणार्‍या घटनांचा त्रास होईल. चोराने चोरून नेलेल्या वस्तूंचा सुगावा
लागेल. तुम्ही केलेल्या नियोजनात कालावधीपेक्षा आर्थिक बाबींना महत्व न दिल्याने नुकसान संभवते.

मिथुन :–व्यवसायाचे स्वरूप बदलता बदलता डायरेक्ट व्यवसायातही नवीन बदल करावा असे वाटेल. मित्राला
दिलेला शब्द पाळल्याने सर्वत्र कौतुक होईल. सामाजिक पातळीवरील तुमच्या शब्दाला असलेली किंमत बघून
सर्वजण आश्र्चर्य चकीत होतील.

कर्क :–फँक्टरी कींवा व्यवसायाच्या जागेत बदल करण्याची तीव्र इच्छा होईल. उच्चपदावरील ओळखीचा तुम्च्या
अडलेल्या कामासाठी अचानक उपयोग करून घेता येणार आहे. आज बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील.

सिंह :–घराबाबतच्या समस्यांवर मित्रांच्या मदतीने अचूक उपाय निघतील. नोकरीतील बदलाला किंवा
व्यवसायातील समस्यांना विचार करूनच सामोरे जा. मित्रमैत्रिणींच्या विचारांचा पगडा निदान आज तरी नको.

कन्या :–कौटुंबिक पाठींब्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. नोकरीत आज अचानक दगदग वाढणार आहे.
ऐकीव बातमीवर विश्र्वास ठेवून आपल्या कोणत्याही निर्णयात बदल करू नका. वैवाहिक जीवनातील मतभेदांवर
पडदा टाकणे तुमच्या हातात आहे.

तूळ :–आज तुमच्या स्वभावातील लहरीपणा इतका वाढेल की कोणत्याच बाबतीत तुम्ही निर्णय घेऊ शकणार
नाही. आज अनिच्छेने कोणत्याही गोष्टी करू नका. कुटुंबातील गैरसमज कमी करण्याचा तुमचा प्रयत्न फसणार
आहे.

वृश्र्चिक :- आपला आनंद कशात आहे हे समजून विचार करावा लागेल. नात्यातील व्यवहारात लगेच आपले मत
व्यक्त करू नका. नोकरीतील कामाचा ताणतणाव वाढल्याने ब्लडप्रेशरचा त्रास जाणवेल. मित्रमंडळीना आर्थिक मदत
करावी लागेल.

धनु :–नात्यातील व्यवहारात समझोत्याची बोलणी करण्यासाठी मध्यस्थी करावी लागेल. नव्याने करत असलेल्या
सामाजिक क्षेत्रात तुमच्या कामातील प्रामाणिकपणाबद्धल सर्वांकडून कौतुक होईल. आर्थिक नियोजनास महत्व
द्यावे लागेल.

मकर :–आज पित्तविकाराचा व डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कोणत्याही व्यवहारातील इतरांकडून झालेल्या
विरोधाबद्धल लगेच नाराज न होता त्यावर उपाय शोधा. महिलांनी अती हळवे होऊ न देता आपल्या भावनांवर
नियंत्रण ठेवावे.

कुंभ :–आज तुमच्या बाबतीत सर्वच घटना तुमचा आनंद वाढवणार्‍या ठरतील. आर्थिक व्यवहारात कागदपत्रे
वाचल्याशिवाय कशावरही सही करू नका. कुटुंबातील खर्चामुळे आर्थिक नियोजन कोलमडेल. नातेवाईकांसाठी
लहानसा प्रवास करावा लागेल.

मीन :–आज मिळणार्‍या आर्थिक प्राप्तीमधे इतरांचाही वाटा आहे हे विसरू नका. राजकीय मंडळीनी विरोधकांच्या
डावपेचांकडे दुर्लक्ष केल्यामुळे विरोधकांची ताकद जास्त वाढणार आहे तरी दखल घ्यावी लागेल. कुटुंबातील ज्येष्ठ
व्यक्तीसाठी अचानक मनात आले म्हणून मौल्यवान वस्तूची खरेदी कराल.

||शुभंभवतु ||

 

weekly-horoscope-2020

रविवार 04 जुलै 2021 ते शनिवार 10 जुलै 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

Read in

रविवार 04 जुलै 2021 ते शनिवार 10 जुलै 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
रविवार 04 जुलै चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 09:04 पर्यंत व नंतर भरणी.
Read More

daily horoscope

शनिवार 26 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शनिवार 26 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार 26 जून चंद्ररास धनु 09:55 पर्यंत व नंतर मकर..

 

चंद्रनक्षत्र उत्तराषाढा 26:36 पर्यंत व नंतर श्रवण. वरील
राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय
फलादेश देत आहे.

मेष :– व्यवसायात परिचयातील तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन मगच पुढील निर्णय घ्यावा. तरूणांनी कोणत्याही
प्रलोभनाला बळी न पडता आपली कामे प्रामाणिकपणे कशी होतील यासाठी प्रयत्न करावा. नियमावर बोट ठेवून
दुसर्‍यांच्या चुका दाखवू नयेत.

वृषभ :–पतीपत्नीमधील वाद मिटविण्यासाठी मनातील नाराजी काढून तडजोडीचे धोरण ठेवल्यास सर्व काही ठीक
होईल. सामाजिक कार्यातील तुमचा सहभाग इतरांच्या आत्मविश्वासात वाढ करेल. औषधांच्या दुकानातील मंडळीनी
गिर्हाईकांना औषधे देताना जागरूक रहावे.

मिथुन :–जवळच्या नात्यातील वाईट बातमीमुळे मनस्थिती इतकी बिघडेल की तुम्हाला आजारी असल्याचे
जाणवेल. आईच्या माहेरकडील मंडळींची भेट झाल्याने मनास उर्जा मिळेल. सकारात्मक विचार करून परिस्थितीवर
मात कराल.

कर्क :–सरकारी नियमातील ढिलाईमुळे दंड भरावा लागणार आहे. आर्थिक नियोजनातील चुकांमुळे कामात गोंधळ
निर्माण होईल. कुणाच्याही भरवशावर न राहता स्वकर्तृत्वावर विश्र्वास ठेवून कामाला सुरूवात करा.

सिंह :–आजचा दिवस आळसात जाण्याची चिन्हे सकाळपासूनच दिसतील. महत्वाच्या कामासाठी जाताना तज्ञ
व्यक्तीला बरोबर घ्या. वयस्कर मंडळीना आजचा दिवस मानसन्मानाचा राहील व त्यांना आंतरिक आनंद होईल.

कन्या :– दवाखान्यात अँडमिट करण्यापासून लागणारे सर्व व्यवहार शेजारच्यांसाठी किंवा मित्रांसाठी करावे
लागतील. महिलांचे मन कमकुवत झाल्याने आज त्या कोणताच मानसिक त्रास सहन करू शकणार नाहीत.

तूळ :–आज तुमची तर्कशक्ती अफाट चालेल पण त्याचबरोबर कांही अंदाज साफ चुकतील. ज्यांना जूनाट त्वचारोग
आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी. लहान मुलांना व वयस्कर मंडळीना युरीन इन्फेक्शनचा त्रास संभवतो.

वृश्र्चिक :–आज लोक तुमच्याकडे आपणहून आकर्षित होतील व बोलायला येतील. आज कोणतेही काम मनाविरुद्ध
केल्यास तुम्हाला मानसिक त्रास होणार आहे. महिला आधुनिक जीवनशैलीचा आनंद घेतील.

धनु :–ज्यांचे शिक्षण अपूर्ण राहीले आहे त्यांना पुन्हा शिक्षण सुरू करण्याची इच्छा होईल. महिलांना संगीत व फँशन
या विषयांची ओढ लागेल. तुमच्या मनातील आनंदाच्या गोष्टी तुम्हाला इतरांना कधी सांगतो याची घाई होईल.

मकर :–महिलांना एखाद्या घटनेची भिती वाटल्याने मानसिक त्रास होऊन ताप येईल. राजकीय मंडळीना त्याच्या
कार्यक्षेत्रातील सुसंधी मिळणार असल्याचे संकेत मिळतील. घरगुती उद्योगातून आज चांगली आर्थिक प्राप्ती होईल.

कुंभ :–महत्वाच्या घेतलेल्या निर्णयामुळे कामे मार्गी लागत असल्याचे अनुभवास येईल. नोकरीत वरिष्ठांकडून
अपेक्षित सहकार्य मिळाल्याने कामास हुरूप येईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींसाठी त्याच्या आवडीच्या वस्तूंची खरेदी
कराल.

मीन :–स्वत:च्या प्रकृतीपेक्षा जास्त महत्वाचे काहीही नसते याचा विचार करा. आजूबाजूचे वातावरण हलके फुलके
ठेवण्याचा प्रयत्न करा. इतरांच्या समस्या सोडवताना तुम्हाला अतिशय जागरूक रहावे लागेल.

||शुभंभवतु ||

 

daily horoscope

शुक्रवार 25 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शुक्रवार 25 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार 25 जून चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 06:39 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा.

 

वरील राशी नक्षत्रांचा विचार
करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आजचा दिवस तुमच्या दृष्टीने अपेक्षापूर्तीचा राहणार आहे. व्यवसायातील नव्याने सुरू केलेल्या योजनांवर
लोक अचंबित होतील व त्यांचा चांगला प्रतिसाद राहील. ज्येष्ठांना आपल्या जून्या ओळखींची उजळणी करावीशी
वाटेल.

वृषभ :–स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कष्टांची पराकाष्ठा कराल व अपेक्षित साध्यही होईल. आज अपचनाच्या
विकाराचा त्रास संभवतो. ज्येष्ठांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे व पाण्याची शुद्धता पाळावी.

मिथुन :–तुम्हाला आज सकाळपासूनच प्रत्येक कामात अनुत्साह वाटेल . कांही अनपेक्षित कौटुंबिक समस्यांमुळे
त्रास संभवतो. आपल्या वागण्या बोलण्यातून इतरांचा गैरसमज होणार नाही याची दक्षता घ्या.

कर्क :–तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेला बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. वयोवृद्ध महिलांकडून
नवविवाहितांना अतिशय मोलाच्या टिप्स मिळतील. नोकरी व्यवसायात अतिशय सावधपणे व्यवहार करावे
लागतील.

सिंह :–तुम्ही तुमच्या अंगी असलेल्या चतुरपणामुळे अडचणीतून ही योग्य प्रकारे मार्ग काढाल. समोर आलेल्या
प्रत्येक अडचणींची जबाबदारी तुमच्यावर नाहीय हे लक्षांत घ्या. आज आर्थिक स्थिती चांगली होईल.

कन्या :–लहान मुलांना भितीदायक प्राणी कींवा किड्यांची भिती राहील. मुले अंधाराला घाबरतील तरी काळजी घ्यावी
लागेल. नको त्या गोष्टींची चिंता करण्यामुळे काय करावे याचा निर्णय घेता येणार नाही.

तूळ :– घराच्या कुलुपाची किल्ली हलवल्यामुळे गोधळ निर्माण होईल. नात्यातील कांही जवळच्याच व्यक्तींचा त्रास
होईल. सरकारी कामात जास्तीत तास्त सतर्कता बाळगल्यास नुकसानी भिती राहणार नाही.

वृश्र्चिक :–स्वत:चे महत्व टिकवण्यासाठी उगाच जीवाचा आटापिटा करू नका. कुटुंबातील महत्वाच्या निर्णयात
तरूणांचे मत विचारात घेतल्यास त्यातील छुप्या धोक्यांची कल्पना येईल. कौटुंबिक जीवनात आनंद निर्माण
करण्याचे तंत्र सापडेल.

धनु :–विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयामुळे पुढील काम सोपे होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयातील
उच्चशिक्षण घेण्याचा मार्ग सापडेल. सकारात्मक विचार केल्यास अपेक्षित इच्छा पूर्ण होतील.

मकर :–तुम्हाला तुमचे विचार योग्य प्रकारे मांडण्याची संधी मिळेल. लेखक व कवी मंडळीना त्यांच्या सामाजिक
आशयाच्या लेखनाबाबत सर्वांकडून कौतुक होईल. राजकीय मंडळीनी इतरांच्या भरवशावर राहून कोणतेही
आश्वासन देऊ नये.

कुंभ :–इतरांशी असलेले वैचारिक मतभेद मिटवण्याची हीच योग्य वेळ आहे याचा विचार करा. आजारातून
उठलेल्यानी ओव्हरकाँन्फीडन्समधे जाऊ नये. आवश्यक ती विश्रांती घ्यावी. सरकारी नियमांचे उल्लंघन होणार नाही
याची काळजी घ्या.

मीन :–कोणतेही घेतलेले निर्णय पूर्ण विचारानेच घ्या. नोकरी व्यवसायातील तुमच्या जबाबदारीतील कामाला
योग्य वेळ न दिल्यास नुकसान होईल. शिक्षण अपूर्ण राहिलेल्यांना सुद्धा योग्यतेप्रमाणे नोकरीची संधी मिळेल.

||शुभंभवतु ||

 

daily horoscope

गुरूवार 24 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

गुरूवार 24 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

गुरूवार 24 जून चंद्ररास वृश्र्चिक 09:10 पर्यंत व नंतर धनु.

 

चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 09:10 पर्यंत व नंतर मूळ. वरील
दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय
फलादेश देत आहे.
मेष :– नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्याचे विचार मनात येतील. न्यायालयातील वाद न्यायालयाच्या बाहेर
सुटणार असल्याचे लक्षात येईल तरी त्यानुसार प्रयत्न करावेत. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कितीही कष्ट
करण्याची मनाची तयारी होईल.

वृषभ :–ओळखीच्या व ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्याने केलेला व्यवसायातील बदल लाभदायक ठरणार आहे. कुटुंबात
अचानक नवीन घर घेण्याचे विचार सुरू होतील. घरगुती उद्योगातून होत असलेली आर्थिक प्रगती कौतुकास्पद
राहील.

मिथुन :– आई व मुलगी यांना एकमेकांपासून लांब राहणे अवघड असल्याचे जाणवेल. परदेशातील मुलांना घराची
ओढ अतोनात जाणवेल. कलाक्षेत्रातील कलाकार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या कला सादर करण्याचे
नियोजन कराल.

कर्क :–सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण न करता झपाट्याने काम सुरू कराल. आजपर्यंत तुमच्या मनातील इच्छा
प्रत्यक्षात पूर्ण होण्याकरीता घेतलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसेल.

सिंह:–नोकरीच्या ठिकाणच्या प्रत्येक अडचणी, समस्या तुम्हीच सोडवल्या पाहिजेत ह्या भ्रमातून बाहेर या.
महत्वाची खरेदी करताना अती चोखंदळपणा करू नका. नात्यातील विवाह ठरवण्यासाठीच्या व्यवहाराकरीता तुमची
मदत घेतली जाणार आहे.

कन्या :–आज तुमच्या बोलण्या वागण्यातील चातुर्य तुमच्या कामी येईल. परदेशाशी संबंधित व्यवहारात आलेल्या
अडचणी चुटकीसरशी सोडवाल. लहान मुलांच्या डोक्याला मार लागण्याची शक्यता आहे तरी काळजी घ्यावी लागेल.

तूळ :–कुटुंबात जोडीदाराचा लहरीपणा वाढेल त्यामुळे कोणत्याच विषयाच्या निर्णयावर येऊ नका. अचानक सोने
खरेदीचे बेत ठरतील व तुमचे काहीही चालणार नाही. बालवयातील मुलांचा हट्ट डोके भंडावून सोडेल.

वृश्र्चिक :–नुसती चिंता करण्यामुळे काहीच साध्य होत नाही हे लक्षात असू द्या. नोकरीतील वरीष्ठांबरोबर
बोलताना अहंकाराला दूर ठेवल्यास त्यांचे तुमच्याबद्धलचे मत खराब होणार नाही. आजचा दिवस संमीश्र
अनुभवाचा राहील.

धनु :–विद्यार्थ्यांना शाळा व शिकवणी क्लासचे वेध लागतील. लहान शाळकरी मुलांनी सायकल चालवताना
संभाळून चालवावी. नात्यातील काही व्यक्तींच्या त्रासाने मनस्थिती हळवी होईल व मोकळेपणाने रडावेसे वाटेल.

मकर :– मनाला न पटलेल्या गोष्टीही सकारात्मक विचाराने करायला लागाल. बोलण्यावर नियंत्रण ठेवल्यास
तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. नोकरीच्या ठिकाणी स्वत:च्या वैयक्तिक बाबींवर चर्चा करू नका.

कुंभ :– आज सकाळपासून येणार्‍या सर्व बातम्या यशाच्या येतील. नोकरदारांची नवीन प्रोजेक्ट्स वरीष्ठ
पातळीवरून मंजूर होतील व तुमचे क्रेडीट वाढेल. वयस्कर मंडळींच्या स्वभावातील चिडचिडेपणा वाढेल.

मीन :–कुटुंबातील महत्वाच्या जबाबदार्‍या सहविचाराने सोडवण्याचा प्रयत्न केल्यास अडचणी वाढणार नाहीत.
लहान वयाच्या मुलावरील संस्कार शाळेची जबाबदारी कुशलतेने सांभाळाल. विचार न करता केलेल्या खरेदीने
आर्थिक बोजा उचलावा लागेल.

||शुभंभवतु ||

 

daily horoscope

बुधवार 23 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

बुधवार 23 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

बुधवार 23 जून चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 11:47.पर्यंत व नंतर ज्येष्ठा.

वरील दोन्ही राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.
मेष :– नोकरीतील तुम्हाला न पटणार्‍यां गोष्टीं कराव्या लागल्यामुळे मनात बंडखोरीची भावना निर्माण होईल.
ज्येष्ठांकडून कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडत्या गोष्टींची पूर्तता लवकरच करणार असल्याचे आश्र्वासन मिळेल.

वृषभ :–स्पर्धात्मक कार्यक्षेत्रात काम करणार्यांना त्यांचे मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. लेखक, कवी
यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल. महिलांनी कुठल्याही परिस्थितीत भावनांचा अतिरेक होऊ देऊ नये.

मिथुन :–जमीनीच्या व्यवहारातील मिळणारी दलाली सहजपणाने मिळणार नाही तरी प्रथम कबूल करून घ्या.
नोकरीत वास्तवापेक्षा भविष्यातील लाभाचे अमिष दाखवले जाईल. तरूणांना त्यांच्या मनाविरुद्ध असलेले मत
स्विकारावे लागेल.

कर्क :–प्रकृतीकडे केलेले दुर्लक्ष फारच महागात पडणार आहे. दवाखान्यात अँडमिट केलेल्यांच्या प्रकृतीत आराम पडू
लागेल. राजकीय मंडळीना गुप्तशत्रूंच्या हालचालीवर लक्ष ठेवावे लागेल. सरकारी क्षेत्रातील मंडळीना अचानक
कामाच्या दिरंगाईबाबत स्पष्टीकरण द्यावे लागेल.

सिंह :–सामाजिक कार्यात तुम्ही केलेल्या कामामुळे मानसन्मानाचे मानकरी व्हाल. आईच्या माहेरकडील मंडळींची
भेट घडणार आहे. तरूणांना आपल्या कार्यक्षेत्रात स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळेल.

कन्या :–अधिक आर्थिक प्राप्तीसाठी दुसर्यांच्या सांगण्यावरून अचानक व्यवसायात बदल करू नका. उधार उसनवार
दिलेले पैसे परत मिळण्याचे निरोप येथील. अहंपणाने ताणून धरल्याने नातेसंबंधात बिघाड निर्माण होईल.

तूळ :–मोठ्या मार्केटमधे काम करणार्यांना नवनवीन उद्योगांची माहिती मिळेल. बोलण्यात स्पष्टता न ठेवल्याने
गैरसमज होणार आहेत. व्यवसायातील घडामोडींवर लक्ष केंद्रित करताना कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका.

वृश्र्चिक :–मनातील इच्छा प्रबळ झाल्याने काम पूर्ण करण्याची जिद्ध निर्माण होईल. विद्यार्थी एका विशिष्ट
विषयाच्या अभ्यासाच्या प्रवेशासाठी हट्ट धरतील. मुलींच्याकडे प्रत्येक प्रश्राला प्रतिप्रश्न असल्याने कोणताच प्रश्र्न
सुटणार नाही.

धनु :– आज शारिरीक दुर्बल असलेल्यांना मित्रमंडळींच्या सहकार्याने मानसिक बळ वाढेल. इतरांच्या चुका
काढण्यापेक्षा स्वत:च्या कामातील प्रगतीकडे जास्त लक्ष द्या. कलाकार मंडळीना पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रवेश
मिळण्याचे मार्ग मोकळे होतील.

मकर :–जवळच्या नातेवाईकांबरोबर मतभेदाचे प्रसंग येतील पण नातेसंबंध बिघडू देऊ नका. वेळेचा सदुपयोग
केल्याने नियोजनात नसलेल्या कामाची पण चांगली सुरूवात होईल. सर्वच गोष्टी तुम्हाला पटत नसल्या तरी सतत
विरोध करू नका.

कुंभ :–तुमच्या पुढाकाराने व कुटुंबियांच्या वतीने शेजारील मंडळीना जिवदान मिळेल. नोकरदारांना वैयक्तिक
डाँक्युमेंटची गरज भासेल पण वेळेवर सापडणार नाहीत. मुलांच्या आर्थिक व्यवहारावर लक्ष न दिल्याने त्याचेकडून
निरूपयोगी खरेदी होईल.

मीन :–तुमचे अंदाज आज अजिबात चुकणार नाहीत. व्यावसायिक कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केल्यामुळे
मार्केटमधील तुमची प्रतिष्ठा वाढेल. परदेशी वस्तूच्या हव्यासापोटी डबल पैसे घालवाल.

||शुभंभवतु ||