daily horoscope

गुरूवार 15 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

गुरूवार 15 जुलै चंद्ररास सिंह 09:38 पर्यंत व नंतर कन्या. चंद्रनक्षत्र उत्तरा फाल्गुनी 27:20 पर्यंत व नंतर हस्त. वरील राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत.
मेष:–नोकरीतील अडचणींवर मात करून संततीच्या प्रश्र्नांना ही तितकेच महत्व द्यावे लागेल. प्रेमाच्या व्यक्तींबरोबर वाद
घालण्यापेक्षा त्यांना समजून घेतल्यास नातेसंबंध बिघडणार नाहीत. स्वत:च्या आजारावर स्वत:च इलाज करू नका.

वृषभ :–नोकरीतील कोर्ट कचेरीच्याकामांची जबाबदारी तुम्हाला स्विकारावी लागेल. इतरांच्या चुका आपल्या अंगावर घेतल्याने
मानसिक त्रास संभवतो. लहान मुलांना घरात किंवा घराबाहेरही पाण्याच्या ठिकाणी खेळू देऊ नका. आजोबांच्या प्रकृतीची
काळजी वाढेल.

मिथुन:–वैवाहिक जीवनातील आनंद आणि नोकरीतील समाधान याची बरोबरी करू नका. आज करायला लागणार्‍या कष्टांना
नाराजीचा सूर लावू नका. कुटुंबाकरीता तुम्ही करत असलेल्या कर्तव्यातच आनंद लपलेला आहे तो शोधण्याचा प्रयत्न केल्यास
अमाप आनंद मिळेल.

कर्क :–अचानक मौल्यवान वस्तूची खरेदी करण्याचे बेत ठरतील. तुमची पैसे सुरक्षित ठेवण्याची जागा बदलावी लागेल. कानावर
विश्र्वास ठेवण्यापेक्षा डोळ्यांवर विश्र्वास ठेवा. राजकीय व्यक्तींना आपल्याच लोकांकडून त्रास होईल.

सिंह :–डोके दुखण्याच्या त्रासाने हैराण व्हाल. तुमच्या स्वभावातील छुपा राग बाहेर येईल व त्याचा जोडीदारावर जास्त
परिणाम होईल. नवीन नोकरी लागण्याच्या प्रयत्नांत सध्याच्या कामाकडे हलगर्जीपणा करू का. डाँक्टरांचा सल्ला घेतल्याने
मोठ्या संकटातून सुटल्याचा अनुभव येईल.

कन्या :–आज तुम्हाला प्रसंगावधानाने वागावे लागणार आहे. काम करताना अचानक झोप येईल किंवा नैराश्य वाटेल.
व्यवसायासाठी घातलेल्या भांडवलात नव्याने भर टाकावी लागणार असल्याचे जाणवेल. वडीलांच्या सुखासाठी त्याच्या
आवडीच्या वस्तूंची खरेदी कराल.

तूळ :–सर्व व्यवस्थित चालू असताना अचानक कुटुंबात वादाची ठिणगी पडेल. नव्या घराच्या प्रतिक्षेतील महिलांना नवीन
घराच्या व्यवहाराची माहिती मिळेल. बँकेतील रखडलेल्या कामासाठी वेगळा वेळ काढाल तरच तीकामे होणार आहेत. लहान
भावंडाला समजून घ्यावे लागेल.

वृश्र्चिक :–समाजाचे मतपरिवर्तन करण्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाणार आहे. नोकरीतील कामाच्या प्रेशरमुळे
मानसिक व शारिरीक थकवा येईल. महिलां कुटुंबात तडजोडीच्या बाबतीत पुढे राहतील. जवळच्या नात्यातून नाराजीचा सूर
येईल.

धनु :–नोकरीत वरिष्ठांबरोबरचे व तरूणांनी ज्येष्ठांबरोबर अतिशय अदबीने वागावे. आज तुमच्या गैर वागण्याचा वडीलांना त्रास
होईल. जवळच्या व्यक्तीकडून अनपेक्षित पणे मोठी महत्वाची व मोलाची मदत मिळेल. संततीच्या अभ्यासातील प्रगतीमुळे मन
सुखावून जाईल.

मकर :–आज तुम्ही मसाल्याचे जळजळीत पदार्थ खाण्याचे टाळावे. पित्तप्रकृतीच्या तरूणांनी तर आज चहावर सुद्धा नियंत्रण
ठेवावे. आरोग्याच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट विचाराने करावी. व्यसनापासून दूर राहण्यासाठी निछ्चय करावा.

कुंभ :–जवळच्या नात्यांमधे “अतिपरिचयात अवज्ञा ‘’ याचा अनुभव येईल. सकाळपेक्षा दुपारनंतरचा वेळ आज महत्वाची कामे
करण्याकरीता वापरल्यास कामे यशस्वी होतील. महिलांना अचानक पाठदुखीचा त्रास सोसावा लागेल.

मीन :–काल रात्री पडलेल्या स्वप्नांचा अर्थ लावत बसू नका. घरातील तरूणांनी वयस्कर मंडळीच्या बाबतीतील जबाबदारी
वेळेवर फार पाडावी. आज विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाची, अवघड विषयाची अचानक भिती वाटू लागेल. व्यासायिकांना
कर्जाचे प्रश्र्न चैन पडू देणार नाहीत.

| शुभं-भवतु ||

 

daily horoscope

बुधवार 14 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

बुधवार 14 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य

बुधवार 14 जुलै चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 27:42 पर्यंत व नंतर उत्तरा फाल्गुनी. वरील दोन्ही राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आज तुमचे व तुमच्या मुलांच्या विचारात एकवाक्यता येईल. ज्या गोष्टी तुम्हाला मुलांकडून करून घ्यायच्या आहेत त्या
आजच त्यांच्याबरोबर बोलून घ्या. आज नोकरी व्यवसायातही बरीचशी कामे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करणे सोपे जाणार
आहे.

वृषभ :–आईच्या मनातील विचार तुम्ही न विचारातही ओळखाल. राजकारणातील मंडळीना उगीचच आपले अधिकार
वापरण्याची तीव्र इच्छा होईल. दुसर्‍यांच्या सांगण्यावरून घेतलेले निर्णय नंतर अडचणीत आणतील तरी आज कोणाच्याही
सल्ल्याने वागू नका.

मिथुन :–अध्यात्मिक प्रगतीच्या बाबतीत तुम्हाला आज चांगले समाधान मिळेल. तुमच्या वैयक्तिक महत्वाच्या कामासाठी
कुटुंबातील सर्वाची मदत मिळेल. महिलांना आज घरी व नोकरीत दोन्ही ठिकाणी कामाचा बोजा वाढणार आहे.

कर्क :–लहान मुले जेवत असताना त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागेल. घास अडकून ठसका लागण्याची शक्यता आहे. महिलांना
सासरच्या नात्यातून आनंदाची बातमी कळेल. नोकरीत आजपर्यंत गुप्त ठेवलेल्या गोष्टी वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय उघड करता
येणार नाहीत.

सिंह :–सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्याना अचानक तुमच्याकडे नेतृत्व सोपवले जाईल. महिलांना ओटीपोट दुखण्याचा खूपच
त्रास होईल. महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळीना इतरांना ट्रेनिंग देण्याची जबाबदारी सोपवली जाईल. तुमच्या विचारांचा
फार मोठा पगडा इतरांवर पडेल.

कन्या :–पूर्वीच्या गुंतवणूकीतून आज मोठे नुकसान झाल्यास मनाला त्रास होऊ देऊ नका.दत्तक पुत्राच्या व मुलीच्या बाबतीत
महत्वाचा निर्णय घेताना मनाची अचानक द्विधा स्थिती निर्माण होईल. भागिदाराच्या बाबतीत तुम्हाला आज तुमचा हट्ट
चालवता येणार नाही.

तूळ:–प्रथमच नव्याने वाहन विकत घेणार्यांचा आजचा आनंद आभाळाएवढा राहील. कुटुंबातील ज्येष्ठांना आज अभिमान
वाटणार्‍या गोष्टी घडतील. आज कोठेही बाहेरच्या प्रवासाचे ठरवले असल्यासतो बेत रद्ध करावा लागेल. शेजार्यांबरोबर आज
एकत्र जेवणाचा बेत होईल.

वृश्र्चिक :–प्रथम संततीचे प्रश्र्न नात्याबाहेरील ज्येष्ठांच्या सल्ल्याने सुटणार आहेत. व्यवसायातील बँकेच्या कर्जाबाबत जागरूक
रहावे लागेल. तरूण मंडळींना छातीत जळजळ होण्याचा त्रास जाणवेल. अँसिडिटी म्हणून सोडून न देता डाँक्टरांचा सल्ला घ्या.

धनु :–घरातील वायरींग एकदा तपासून घ्या अचानक शाँर्टसर्किटचा किंवा शाँक बसण्याचा धोका आहे. कलाकार मंडळीना
नव्याने कलाक्षेत्रात आपले नांव कमवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. नोकरीत सहकारी वर्गाकडून चांगले सहकार्य
मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

मकर :–घरातील बाथरूम, टायलेट च्या आऊट लेटबाबत मोठी अडचण निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी आपल्याला अवघड
जाणार्‍या विषयासाठी वेगळे मार्गदर्शन घेतल्यास नंतर अडचण निर्माण होणार नाही. कोणत्याही प्रकारची आज गुंतवणूक करू
नका.

कुंभ :–पतीपत्नीच्या व्यवसायात अचानक वृद्धी होणारे प्रसंग येतील व प्रतिष्ठेची वाढ होईल. व्यवसाय बंद करण्याच्या विचारावर
पुनर्विचार केल्यास मार्ग सापडेल. सकारात्मक विचारांच्या प्रभावाने तुम्हाला मित्रमंडळींकडून आर्थिक मदत मिळेल.

मीन :– आज कोणत्याही प्रकारच्या जुगारात अडकू नका. गुंतवणूकीचा विचारही आज अडचणीत आणणारा ठरेल. बोलण्यातील
स्पष्टपणामुळे आज नोकरीच्या ठिकाणी व मित्रमंडळीतही गैरसमज न होता सर्व गोष्टी स्पष्ट होतील.

| शुभं-भवतु ||

 

daily horoscope

मंगळवार 13 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

मंगळवार 13 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य

मंगळवार 13 जुलै चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 27:40 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी. वरील दोन्ही राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत
आहे.
आज विनायक चतुर्थी अंगारक योग.
मेष :–अकारण क्रोध व अति उत्साहामुळे वेळ वाया जाणार आहे. प्रमोशनच्या बाबतीत स्वत : कोणतेही प्रयत्न करू नका.
कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. लहान मुलांच्या बाललीला अनुभवण्यात ज्येष्ठांचा वेळ आनंदात जाईल.

वृषभ :–अकस्मात खर्चात वाढ झाल्याने आर्थिक नियोजन ढासळेल. नोकरी व्यवसायात महिला व पुरूष सर्वांचीच
तारेवरची कसरत राहील. वाहन खरेदीच्या विषयाला सध्या पुढे ढकलावे लागेल.

मिथुन :– अचूक नियोजन व परिश्रमाच्या जिद्धीने कठीण कामेही मार्गी लागतील. कुटुंबात आजारपणाची शक्यता राहील
व त्यांना आंतरिक सुरक्षा वाटणार नाही. आर्थिक व्यवहारातील पारदर्शकपणा तुम्हाला दोषारोपातून मुक्त करेल.

कर्क :–वरिष्ठांच्या नाराजीमुळे मानसिक ताण वाढेल. वयस्कर मंडळीनी आरोग्याची तपासणी करून घ्यावी. अचानक
प्रियजनांच्या गाठीभेटी होतील. नोकरीतील मित्रांच्या सहकार्याने कुटुंबातील अडचणी कमी होतील.

सिंह :–व्यवसायातील तणावामुळे कुटुंबाकडे लक्ष देण्यास आज वेळ मिळणार नाही. तुमच्याकडून केलेले दान गुप्त
राखण्याची काहीच गरज नाही. नोकरीत तुमच्या बोलण्याचा परिणाम त्रासदायक होईल. महिलांनी गुडघ्याच्या तक्रारीवर
आराम करावा.

कन्या :–इतरांचे चांगले करण्यासाठी तुम्ही करत असलेली धडपड कारणी लागेल. नोकरीतील तुमच्या प्रयत्नाचा वेग
पाहून सहकार्‍यांना आश्चर्य वाटेल. आज तुमच्या पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींबरोबर मैत्री होईल.

तूळ :– जवळच्या व्यक्तींकडून तुमच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखविले जातील. व्यवसायवृद्धीसाठी
दीर्घकालीन योजना आखण्यासाठी तज्ञांचे सहकार्य घ्याल. विद्यार्थी उत्तम यशाकरीताचा संकल्प करतील.

वृश्र्चिक :–तुमच्या लहरी व हट्टी स्वभावामुळे तुम्हाला त्रास होणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या रोजच्या प्रगतीची नोंद
ठेवल्यास पुढील यशाचा अंदाज येईल. स्वत:च्या कामाबद्दल व्यावहारिक दृष्टीकोन ठेवावा.

धनु :–स्वत:च्या कामाबद्दल असलेला आत्मविश्वास तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहे. कलाकारांना आपली कला
दाखवण्याची चांगली संधी मिळेल. लेखक व कवी मंडळीना त्यांच्या प्रक्षोभक कवितांमुळे वाचकांचा रोष सहन करावा
लागेल.

मकर :–न्यायालयातील कामकाजात कोणत्याही मध्यस्थांवर अवलंबून राहू नका. सध्याच्या कोरोनाच्या काळात तुमचे
सुरू असलेले प्रवास बंद करणे हिताचे ठरेल. तुमची फार दिवसापासूनची राहिलेली इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचे
संकेत मिळतील.

कुंभ :–स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण करण्याची इच्छा फलद्रूप होत असल्याचे जाणवेल. व्यवसायात नवनवीन
कल्पनाना वाव दिल्यास तुमचा प्रभाव वाढेल. कोणत्याही गोष्टीचा आस्वाद घेताना त्याचा अतिरेक होत नसल्याचे तपासा.

मीन :–कोणत्याही गोष्टींवर थेट बोलणे टाळल्यास समोरील व्यक्ती दुखावणार नाही. व्यवसाय व्यापारातील
परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याकरता फार प्रयत्न करावा लागेल. मोठेपणाच्या कल्पनेत अडकू नका.

| शुभं-भवतु ||

 

daily horoscope

सोमवार 12 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

सोमवार 12 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार 12 जुलै चंद्ररास कर्क 27:13 पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 27 :13 पर्यंत व नंतर मघा. वरील दोन्ही
राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.
मेष :–आज आईच्या आशिर्वादाची किंमत कळेल व कधीही सहजपणे न होणारे काम होऊन जाईल. नोकरीत मात्र
तुम्हालाच नोकरी बदलाची इच्छा होईल. दुसर्‍यांच्या सांगण्यावरून घेतलेले निर्णय नंतर अडचणीत आणतील तरी
स्वत:च विचार करा.

वृषभ :–व्यवसायातील लाभ मनाला समाधान देईल. महत्वाच्या कामाला झालेल्या विलंबामुळे काही प्रमाणात नुकसान
सोसावे लागेल. घरातील बाथरूम मध्ये चालताना सर्वानीच काळजी घ्यावी पाय घसरून पडण्याचा धोका आहे.

मिथुन :–आज अति प्रमाणात होणार्‍या धावपळीमुळे दिवसाच्या शेवटी अतिशय दमायला होईल. जवळच्या
मित्रमैत्रिणीमुळे कांही अप्रत्यक्ष लाभ होतील. महिलांना आपल्या आवडत्या विषयावर बोलण्याची संधी मिळेल.

कर्क :– तुमच्या नोकरीच्या ठिकाणी विशेष तज्ञांची व्हिजीट होईल व त्यावेळी तुम्हाला बुद्धीची चुणूक दाखवता येईल.
कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या विचाराने घरातील बर्‍याच दिवसापासून रेंगाळलेल्या प्रश्र्नांवर उपाय सापडेल.

सिंह :–नोकरी व्यवसायातील धावपळ, वाढलेले आर्थिक प्राँब्लेम यामधे आजतरी कांहीही बदल होणार नाही. जवळच्या
नातेवाईकांकडून एखाद्या कार्यक्रमाचे आमंत्रण येणार आहे.

कन्या :–आईवडिलांकडून मुलींना प्रेमाची भेट मिळेल. मुलांनी आपल्या आर्थिक व्यवहारावर बारीक लक्ष दिल्यास चांगले
नियंत्रण आणता येईल. नोकरीत वरिष्ठांच्या बदललेल्या अपेक्षा पूर्ण करता येणार आहेत.

तूळ :– मित्र व किंवा नातेवाईकांच्या मदतीने व्यवहारातील क्लिष्ट कामेही मार्गस्थ कराल. कुटुंबातील व सामाजिक
क्षेत्रातील धार्मिक कार्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल. नातेवाईकांकडून आनंदाच्या बातम्या कळतील.

वृश्र्चिक :–नोकरीत कामाचा पसारा वाढेल. महत्वाच्या गाठीभेटीसाठी प्रतिष्ठीत व उच्चपदस्थांबरोबरील चर्चेसाठी जावे
लागेल. कामातील वाढलेल्या व्यग्रतेमुळे मानसिक ताण निर्माण होईल. कुटुंबातील चिंतेच्या कारणाचे मूळ सापडेल.

धनु :–व्यवसायातून अचानक धन व सुखाची प्राप्ती होईल. सहल व मनोरंजनासाठी वेळ काढण्याची इच्छा निर्माण होईल.
भागिदाराच्या सहाय्याने परिस्थितीवर व व्यवसायातील अडचणींवर मात करता येणार आहे.

मकर :–तुमच्या आवडीच्या छंदाला वेळ देता येणार आहे. कुटुंबातील प्रियजनांसाठी त्यांच्या आवडत्या वस्तूंची खरेदी
करता येणार आहे. घरातील आवराआवर करताना जून्या हरवलेल्या मौल्यवान गोष्टी सापडतील व महिलांना त्याचा
आनंद होईल.

कुंभ :–स्वप्रयत्नाने नोकरी मिळवाल. अतिउत्साहाच्या भरात काम बिघडवू नका. आर्थिक व्यवहारात पारदर्शकपणा
ठेवावा लागेल. कुटुंबातील महत्वाच्या निर्णयातील मुद्धे ज्येष्ठांच्या विचाराशिवाय पक्के करू नका.

मीन :–कुटुंबातील व जवळच्या नात्यातील मानापमानाच्या मुद्ध्यावर आता तुम्हीच पडदा टाका. आज तुमच्या मनातील
रेंगाळलेल्या कामाला सुरूवात करण्यास योग्य दिवस आहे. मनोरंजन व चैनीच्या वस्तूंवर खर्च कराल.

| शुभं-भवतु ||

 

daily horoscope

रविवार 11 जुलै 2021 ते शनिवार 17 जुलै 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

Rसोमवार 28 जून 2021 चे दैनिक राशीभविष्यead in

रविवार 11 जुलै 2021 ते शनिवार 17 जुलै 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

रविवार 17 जुलै चंद्ररास कर्क दिवसरात्र व व चंद्रनक्षत्र पुष्य 26:21 पर्यंत व नंतर आश्लेषा. सोमवार 12 जुलै चंद्ररास कर्क 27:13
पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 27:13 पर्यंत व नंतर मघा. मंगळवार 13 जुलै चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा
27:40 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी. बुधवार 14 जुलै चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 27 :42 पर्यंत व नंतर
उत्तरा फाल्गुनी. गुरूवार 15 जुलै चंद्ररास सिंह 09:38 पर्यंत व नंतर कन्या. चंद्रनक्षत्र उत्तरा फाल्गुनी 27 :20 पर्यंत व नंतर हस्त.
शुक्रवार 16 जुलै चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र हस्त 26:36 पर्यंत व नंतर चित्रा. शनिवार 17 जुलै चंद्ररास कन्या 14:06
पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र चित्रा 25 :31 पर्यंत व नंतर स्वाती. वरील प्रमाणे राशी नक्षत्रांचा विचार करून व रोजच्या
पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मंगळवार 13 जुलै विनायक चतुर्थी अंगारक योग.
शुक्रवार 16 जुलै रविचा कर्क राशीत प्रवेश 16:52.
शनिवार 17 जुलै शुक्राचा सिंह राशीत प्रवेश 09:25.

मेष :–स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्यांना हा सप्ताह अतिशय उत्साहाचा व स्फूर्तिदायक असणार आहे. कोणतेही काम तुम्ही
धडाडीने व पूर्ण ताकदीने करणार आहात. नोकरीत हाताखालील लोकांचे पूर्ण सहकार्य घेऊन दिलेले टार्गेट पूर्ण करून दाखवाल.
ज्योतिषी, खगोलशास्त्राचा अभ्यास करणार्यांना हा सप्ताह सखोल अभ्यासाचा व महत्वपूर्ण जाईल. तुमच्या कार्यशक्तीचा तुम्ही
पूर्णपणे वापर करणार आहात. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना लहानसा प्रवास करावा लागेल. सरकारी क्षेत्रातील मंडळीना
अचानक मानहानीला सामोरे जावे लागेल. कोणताही आर्थिक व्यवहार करताना कोणतीही जोखीम न घेता लेखी व्यवहार करा.

वृषभ :–कुटुंबातील खर्चाचे प्रमाण अचानक वाढल्याने आर्थिक नियोजनावर परिणाम होईल. नोकरीच्या ठिकाणी इतरांच्या
बाबतीत निर्माण झालेल्या संशयाच्या वातावरणामुळे तुम्हाला मानसिक त्रास होईल. उत्तम कार्यशक्ती असूनही काम पूर्ण होणार
नाही. जून्या गावी असलेल्या घराची डागडुजी करावी लागणार आहे. तुमच्या कामाच्या घाई मुळे कौटुंबिक महत्वाची जबाबदारी
इतरांवर सोपवाल. आजी आजोबांना आपल्या नातवंडाविषयी फार मोठ्या अभिमानाचे प्रसंग अनुभवता येणार आहेत.
व्यवसायातील सध्याच्या परिस्थीतीनुसार लाभाचे प्रसंग वारंवार येणार आहेत.
मिथुन :– जवळच्या नातेवाईकांकडून तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल खिल्ली उडवली जाईल. वैवाहिक जोडीदाराची निवड
करताना फक्त स्वत:च्या जबाबदारीवर न करता ज्येष्ठांचा सल्ला घ्या. या सप्ताहात कोणावरही हुकमत न गाजवता तुम्हाला कामे
करून घेता येणार आहेत. व्यवसायातील घडामोडींवर अती चर्चा करूनही कोणताच निर्णय घेणार नाही. कुटुंबातील ज्येष्ठ
व्यक्तीची काळजी घेण्यास प्राधान्य द्यावे लागेल. सरकारी खात्यातील अडकलेल्या कामांसाठी खूप वेळ द्यावा लागणार आहे.
सप्ताहाच्या शेवटी कामातील बोजा मुळे नैराश्य आल्याचे जाणवेल.

कर्क :–सप्ताहाच्या सुरूवातीलाच तुम्ही अती भावूक व्हाल. महिलांना माहेरच्या नात्याकडील मंडळींची काळजी लागेल पण
सासरच्या जबाबदारी पुढे तुम्हाला काहीच करता येणार नाही. वडिलोपार्जित वारसाहक्काच्या जमिनीबाबतचे प्रश्र्न
सोडवण्यासाठी नात्याबाहेरील व्यक्तीची मदत घेतल्यास प्रश्र्न व्यवस्थित सुटेल. तरूणांच्या वागणूकी वरून घरात सर्वात ज्येष्ठ
व्यक्तीकडून नाराजीचे सुर निघतील. विवाहाच्या प्रतिक्षेतील मुलामुलींनी परिचयातील मुलामुलींचा विचार केल्यास योग्य योग
जुळून येण्याचे संकेत मिळतील. सरकारी नोकरदारांना अधिकार्यांकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल्याने तुमची काम करण्याची
उमेद वाढेल.

सिंह :–अध्यात्मिक बैठक असणार्‍यांना ज्येष्ठ गुरूमाउलींचे मार्गदर्शन मिळेल. नोकरीतील नैराश्याची भावना कमी होउन
कामातील उत्साहात वाढ होईल. वडिलांबरोबर केलेल्या चर्चेमुळे बर्याचशा गोष्टींचा उलगडा होऊन नियोजित कामाला योग्य
दिशा मिळेल. तरूण मुलींना एकतर्फी प्रेमाचा त्रास जाणवेल तरी त्याबाबत मौन न बाळगता योग्य प्रकारची मदत घ्या. जून्या

घराचे नूतनीकरण करण्याची इच्छा होईल व त्या दिशेने प्रयत्नही होतील, महिलांकडून या कामास कडाडून विरोध होईल.
विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास वर्षाअखेरीस चांगले यश मिळेल. परदेशी नोकरीची मिळणारी संधी
तपासून घ्या खूप लाभदायक होणार आहे.

कन्या :–नोकरीत तुम्हाला अपेक्षित वेतनामधे वाढ होणार आहे पण त्यासाठी कोणतेही स्वत:हून प्रयत्न करू नका. कुटुंबातील
महत्वाच्या प्रश्र्नाला तरूणांकडून विरोध होईल पण पुनर्विचार साठी त्यांना वेळ द्या. सार्वजनिक जीवनात एकमेकाला मदत
करण्याचे आवाहन करून मोठ्या समाजकार्याला तुमचा हातभार लागणार आहे. व्यवसायात फार मोठी घडामोड होणार नसली
तरी तरी नुकसान नक्कीच होणार नाही आहे. भागिदाराच्या मह्णण्यालाही महत्व द्यावे लागेल. नोकरीतील तुमच्यावर सोपवलेल्या
कोर्टाच्या कामातून मुक्त होण्यासाठी वरिष्ठांकडे प्रयत्न कराने लागतील. प्रेमविवाहाचे विचार यशस्वी करण्यासाठी सकारात्मक
रहा.

तूळ :–सामाजिक व राजकीय दोन्ही क्षेत्रातील हितशत्रूना मागे टाकाल. नोकरीत बदली किंवा कामातील बदल स्विकारावा
लागेल तुम्हाला नाही म्हणता येणार नाही. पोलिस, होमगार्ड या क्षेत्रातील कर्मचार्‍यांना, अधिकार्यांना मिळालेल्या बदलीसाठी
होय म्हणावे लागेल. घरगुती व्यवसायाला अतिशय चांगला कालावधी असल्याने उद्योगात कांही महत्वाचे बदल करावे लागतील.
त्यासाठी तज्ञांचे, अनुभवींची मदत घ्या. त्यातील कष्टांचा विचार न करता पुढे गेलात तर चांगली आर्थिक प्राप्ती होईल. घरगुती
पार्लरच्या व्यवसायात अचानक वृद्धी होणारे प्रसंग येतील. कुटुंबातील हरवलेले मनस्वास्थ्य पुन: निर्माण होईल.

वृश्र्चिक :–वडिलोपार्जित व्यवसायात नफ्याचे प्रमाण वाढेल व डोक्यावर झालेला कर्जाचा डोंगर कमी करू शकणार आहात.
कोणत्याही निर्णयापर्यंत येताना एकतर्फी निर्णय न घेता वेळ निभावून न नेता पूर्ण विचाराने घ्या. सरकारी परवानग्या ची
अडकलेली कामे जून्या राजकीय ओळखीमुळे सोपी होतील. कोठेही तुम्हाला आर्थिक व्यवहार करावा लागणार नाही तरी
लाचलुचपत पासून दूर रहा. तुमच्या व्यक्तीमत्वातील धाडस व करारीपणात वाढ झाल्याने कामातील बेधडकपणा वाढेल. आजारी
उद्योगांना आवश्यक ती मदत मिळाल्यामुळे तुम्हाला तुमचा उद्योग सावरता येणार आहे. मुलीकडील ख्याली खुशाली कळल्याने
तुमच्या मनावरचे ओझे हलके होईल.

धनु :–तुमच्या व्यक्तीमत्वाच्या प्रभावामुळे तुमची योग्य पदावर निवड होईल. परदेशी असलेले व्यवसायिक संबंध दृढ होण्याचे
मार्ग सापडतील व तज्ञांची मदतही मिळेल. तुमच्या नकळत तुमच्या वडीलांकडून अनपेक्षित आर्थिक मदत होईल. पतीपत्नीच्या
एकत्रित व्यवसायात ओव्हर ड्राफ्ट घेण्याची वेळ येईल व मिळेलही. शाळकरी मुलांना आपल्या इच्छा दाबाव्या लागणार नाहीत.
तरूण वर्गास प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या जागेवर नियुक्ती केली जाईल. उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न आता फार
करावे लागणार नाहीत. सरकारी क्षेत्रातील स्वत:च्या बाबतीतील कामे स्वत: करायचा प्रयत्न केल्यास अपेक्षित वेळेत होतील.

मकर :–या सप्ताहाच्या सुरवातीलाच तुम्हाला तुमच्या आर्थिक बाबींकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. व्यवहारात अचानक
टाकलेल्या विश्र्वासामुळे फसवणूक होण्याचा धोका असल्याने कोणतीही महत्वाची माहिती घेतल्याशिवाय व्यवहार करू नका.
कुटुंबातील स्वत:च्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला जातीने लक्ष घालावे लागेल. मुलांना प्रवेशाबाबत,
शाखानिवडीबाबत त्याच्या शंका दूर करून त्यांना समजवावे लागेल. उत्तम नियोजनाचा परिणाम मुलांना दाखवून द्याल.
कलाकार मंडळीना आपल्या कलेला लोकांसमोर सादर करता येणार आहे. घरगुती उद्योगात प्रगती होईल.

कुंभ :–कुटुंबात आईवडीलांसाठी एखाद्या धार्मिक पुजेचे आयोजन कराल. तरूण तरूणींना प्रेमाच्या व्यवहारातील गैरसमज दूर
झाल्याने मनाला मोकळेपणा वाटेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाच्या पद्धतीवर आक्षेप घेतला जाईल व स्पष्टीकरण
मागण्यात येईल.पतीपत्नीना कुटुंबातील खर्चासाठी या सप्ताहात हात मोकळा सोडावा लागेल. आईवडीलांसाठी त्याच्या
आवडीच्या वस्तूसाठी मन मोठे करून खरेदी कराल. वारसा हक्काच्या जमिनीच्या किंवा घराच्या रेंगाळलेल्या कामात अडथळा
निर्माण केला जाईल तरी कायद्याची मदत घ्यावी लागेल. वयोवृद्ध मंडळीना सुख समाधानाचा अनुभव येईल.

मीन :–कोणताही व्यवहार करण्यापूर्वी व्यवहाराबाबतची माहिती करून घ्या अन्यथा नुकसान सहन करावे लागेल. प्रेमाच्या
अवास्तव कल्पना दूर करून वास्तवाचा विचार केल्यास नात्यात वितूष्ट येणार नाही याची दखल घ्या. जोडीदारकडून झालेल्या
चुकांचा बाऊ न करता मोकळ्या मनाने समजून घेतल्यास दोघांमधील ताणतणाव कमी होईल. घरगुती व्यवसायातील
एकमेकांच्या मदतीने अडचणी दूर होतील व उद्योग मार्गी लागेल. महिलांना फँशनेबल कपड्यांच्या उद्योगत भांडवल वाढवण्यास
हरकत नाही. घर बदलण्याच्या कामात कोणाचीही मदत होणार नाही व स्वत:लाच काम पूर्ण करावे लागेल.

मकर:- प्रत्येक अरेला कारे केल्याशिवाय मन शांत राहणार नाही. शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवराना त्यांचे मार्गदर्शन
वेबिनरच्या साहाय्याने करता येणार आहे. कुटुंबाच्या समधानासाठी लहानसा प्रवास घडेल. अभ्यासाचे योग्य नियोजन
ना केल्याने अडथळे निर्माण होतील.
कुंभ:- आध्यत्मिक गुरू आपल्या साधकांना मार्गदर्शन करतील. नियोजीत प्रवासाच्या रूपरेषेत बदल होईल. पाळीव प्राणी
आजारी पडल्याने दवाखान्यात न्यावे लागेल. प्रेमिकांकडून वैवाहिक जीवनाविषयी स्वप्ने रंगवली जातील. सरकारी
रेगाळलेल्या कामात महिला अधिकाऱ्यांची मदत होईल.
मीन:- प्रवासात त्रास संभवतो. आई भागीदार असलेल्या व्यवसायात आईचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. ठरलेल्या विवाहात
अडचणी निर्माण होतील. ऋषितुल्य गुरुवर्यांकडून मार्गदर्शन मिळेल. मित्र मंडळींबरोबर व्यावहारिक वाद निर्माण होईल.

||शुभंभवतु ||

 

daily horoscope

शनिवार 10 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शनिवार 10 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार 10 जुलै चंद्ररास मिथुन 18:37 पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु 25:01 पर्यंत व नंतर पुष्य. वरील दोन्ही
राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.

मेष :– एखाद्या पुस्तक प्रकाशनासाठी जाण्याचा बहुमान मिळेल. महिलांना कौटुंबिक अडचणीवर मात करता येणार आहे.
घरातील सदस्यांना तुमच्याकडून आश्र्चर्य चकित करणार्‍या घटना घडतील. लहान मुलांच्या प्रकृतीत अपेक्षेप्रमाणे
सुधारणा होऊ लागेल.

वृषभ :- नोकरीच्या ठिकाणी तुमच्या हाताखालील व्यक्तीकडून तुम्हाला सन्मानाने वागवले जाईल. वडीलार्जित वारसा
हक्का विषयी तुम्ही तुमचे मत परखडपणे मांडणे योग्य राहील. आरोग्याच्या दृष्टीने तरूणांनी कोणत्याही व्यसनांचा
आधार घेऊ नये.

मिथुन :–तुम्हाला विचार करण्याच्या पद्धतीत बदल करण्यासाठी तज्ञांकडून सुचवले जाईल. नोकरीतील कामाच्या
ताणतणावाला अती महत्व दिल्यामुळे प्रकृतीस्वास्थ्य बिघडणार आहे. महिलांना स्वयंपाकघरातील कामाचा कंटाळा
येईल.

कर्क :–डाँक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेला निर्णय फायदेशीर नसल्याचे जाणवेल. कुटुंबातील आर्थिक गणिते कोलमडून
जातील. लहान मुलांकडून तुमचा मोबाईल बिघडेल. तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक तो आहारात बदल
करावा लागेल.

सिंह :–आईच्या बँगेतील चोरकप्प्यात ठेवलेल्या पैशांचा हिशोब लागणार नाही. मोठ्या भावंडांबरोबरील चर्चेतून तात्विक
मतभेद होतील. ठरलेल्या विवाहाच्या बाबतीत अचानक नकारात्मक गोष्टी निर्माण होतील. कोणालाही शब्द देताना प्रथम
पूर्ण विचार करा.

कन्या :–ज्येष्ठ संततीच्या मानसिक आरोग्याच्या तक्रारीत वाढ होईल. वडिलांबरोबर केलेल्या चर्चेमुळे बर्याचशा
गोष्टीना सकारात्मक वळण मिळेल. वयस्कर मंडळींच्या पाय व मांड्या दुखतील. दत्तक संततीकडून प्रेमळ चौकशी होईल.

तूळ :–परगावी असलेल्या संततीबाबात आईला चिंता वाटेल. व्यवसायासाठी घातलेल्या भांडवलात नुकसान झाल्याने
मोठा प्रश्र्न उभा राहील. राजकीयदृष्टय़ा आज तुमच्या मदतीला तुमचे मित्रमंडळी धावून येतील.

वृश्र्चिक :–महिलांना व लहान मुलांना कान दुखण्याचा त्रास संभवतो. घरातील नोकर चाकर यांना आर्थिक मदत देण्याचे
ठरवाल. वैवाहिक जोडीदाराला मनापासून समजून घेतल्यास दोघांमधील ताणतणाव कमी होईल.

धनु :–व्यसनापासून व इतर प्रलोभनापासून दूर राहिल्यास तुमच्या व्यक्तीमत्वाचा बदल होईल. नोकरीच्या ठिकाणी
तुमच्या लाँजिकल विचारामुळे कंपनीला आर्थिक लाभ करून द्याल. कुटुंबात एकमेकांच्या प्रेमळ सहवासाने वातावरण
आनंदी राहील.

मकर :–नोकरीत वरिष्ठांना दिलेला शब्द तुम्ही पाळल्यामुळे तुमच्यावर वरिष्ठ खूष होतील. घरगुती व्यवसायात केलेला
बदल व्यवसाय वाढीस उपयोगी पडेल. कुटुंबातील आजारी बहिणीसाठी भावाने केलेली मेहनत उपयोगी पडल्याने
कुटुंबात आनंद निर्माण होईल.

कुंभ :–तुम्ही दिलेल्या आश्र्वासनातून विद्यार्थ्यांचे बळ व हिम्मत वाढल्याचे जाणवेल. आर्थिक गरजेकरीता कोणाचीही
मदत न घेता वेळ निभावून न्याल. महिलांवरील गृहकर्तव्याच्या जबाबदारीत वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या
जागरूकपणामुळे व्यवहारातील अफरातफर सापडेल.

मीन :–घरातील आजारपणाकडे दुर्लक्ष करू नका. रखडलेल्या व्यवहारावर लक्ष केंद्रीत केल्यास कामे मार्गी लागणे अवघड
जाणार नाहीत. नात्यातील कटुता टाळण्यासाठी वागण्या बोलण्यात पारदर्शकता ठेवावी लागेल.

| शुभं-भवतु ||

 

daily horoscope

शुक्रवार 09 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शुक्रवार 09 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read More

daily horoscope

गुरूवार 08 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

गुरूवार 08 जुलै चंद्ररास वृषभ 07:40 पर्यंत व नंतर मिथुन.

Read More

daily horoscope

बुधवार 07 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

बुधवार 07 जुलै चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र रोहिणी 18:17 पर्यंत व नंतर मृगशीर्ष.

Read More

daily horoscope

मंगळवार 06 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

मंगळवार 06 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्यमंगळवार 06 जुलै चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र कृतिका 15:19 पर्यंत व नंतर रोहिणी.

Read More