Read in
रविवार 13 जून 2021 ते शनिवार 19 जून 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
रविवार 13 जून चंद्ररास मिथुन 12:31 पर्यंत व नंतर कर्क.
Read in
शनिवार 12 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 12 जून चंद्ररास मिथुन. दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा 16:56.पर्यंत व नंतर पुनर्वसु.
वरील राशी नक्षत्रांचा
विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आज तुमची समयसूचकता एकदम कारणी लागेल आणि तुमच्या धाडसाने प्रसंगातून अलगद बाहेर पडाल.
व्यावसायिक कामात होणार्या बिघाडावर योग्य उपाय सापडेल. बर्याच दिवसापासून रखडलेले तुमचे घर लवकरच
ताब्यात येणार असल्याचा निरोप येईल.वृषभ :–नोकरीत बदली किंवा कामातील बदल स्विकारावा लागेल. तुमचे कोणतेही तंत्र उपयोगी पडणार नाही.
व्यवसाय व मार्केटींगचा उद्धोगाची आलेख अचानक उंचावत जात असल्याचे लक्षात येईल.मिथुन. :–कुटुंबाकरता व जवळच्या नातेवाईकांकरीता आर्थिक बोजा उचलावा लागेल. घरातील दुरूस्तीची कामे आता
परत पुढे ढकलली जातील. शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणार्यांना आर्थिक बाबतीत आवश्यक ती मदत मिळेल.कर्क :–विचार न करता खरेदी केल्यामुळे अनावश्यक खर्च वाढतील. नोकरीत तुमच्या कामावर, कामाच्या पद्धतीवर
वरीष्ठ खूष होतील. नव्याने गुंतवणूक करता असाल तर स्वत:च्या विचाराने निर्णय घेऊ नका.सिंह :–तुम्हाला तुमच्या आवडत्या क्षेत्रात काम करता येणार असल्याचे चित्र स्पष्ट होईल. लहान सहान कारणावरून
ही आज तुम्हाला आनंद मिळणार आहे. कोणत्याही अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास करू नका.कन्या :–वडीलांच्या मध्यस्थीने मित्राच्या आईला दवाखान्यात अँडमिट करणे सोपे जाईल. सार्वजनिक जीवनात
वादळ उठणार नाही याची काळजी घ्या. जमीनीची रेंगाळलेली कामे तातडीने हातात न घेतल्यास त्यामधील गुंता
वाढेल.तूळ :–गर्भवती महिलांनी प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घेताना नवीनच किडनीचा
प्राँब्लेमही त्रास देऊ शकेल. तरूणांना आपल्या नोकरीच्या ठिकाणी मनासारख्या घटना घडतील.वृश्र्चिक :–नोकरीत अचानक वेतनात वृद्धी झाल्याचे कळेल. शिक्षक मंडळीना आजचा दिवस मानसन्मानाचा
आजचा राहणार आहे. विद्यार्थ्यांनी गेले वर्षभर घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे लक्षात येईल. तरूणांचे व्यवहार
संशयात अडकतील.धनु :–तरूणांनी वाईट संगतीपासून व व्यसनापासून दूर रहावे. आईच्या प्रकृतीची काळजी वाढेल व प्रसंगी
दवाखान्यात उपचारासाठी दाखल करावे लागेल. आज फक्त कामाकडे लक्ष दिल्यास काम शिल्लकच राहणार नाही.मकर :–घरगुती व्यवसायात आर्थिक आवक चांगली राहील व नव्याने गुंतवणूक करावी वाटेल. जून्या मित्रांची भेट
घडेल व सर्वानाच त्यातून आनंद मिळेल. वडिलांच्या नोकरीतील मागील बाकी असलेले येणे मिळण्याचे कळेल.कुंभ :–आज रागावर नियंत्रण ठेवल्यास कामात कोणत्याही प्रकारचा बिघाड होणार नाही. आजचा दिवस तुम्हाला
डबल ताकदीने व धडाडीने काम करण्यास सांगत आहे. उत्तम कार्यशक्ती मुळे रेंगाळलेल्या प्रोजेक्टला मार्गी
लावण्याचे आश्वासन द्याल.मीन :–आज त्रासदायक व्यक्तीच्या आसपासही फिरकू नका. कुटुंबातील महत्वाच्या निर्णयात तरूणांचे मत
विचारात घेतल्यास सर्व कामाचे स्वरूपच बदलून जाईल. कलाकार मंडळीना आपल्या कलेचे सादरीकरण करण्याची
महत्वाची संधी मिळेल.
||शुभं–भवतु ||
Read in
शुक्रवार 11 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 11 जून चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 14:30 पर्यंत व नंतर आर्द्रा.
वरील राशीचा व दोन्ही
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.
मेष :– कालपर्यंत ज्यांच्याबरोबर तुमचे चांगले पटत होते त्यांच्या वागण्यामुळे तुमच्या मनात कटुता निर्माण होईल.
वाहन विक्री खरेदीच्या व्यवसायात चांगली आर्थिक प्राप्ती होईल. दूर गावी असलेल्या आईला भेटण्यासाठी जाण्याचे
ठरवाल.वृषभ :–गायक मंडळीना मैफिलीत गाणे सादर करता येणार आहे. तुमच्या घराण्यातील श्री गुरूमाऊलीच्या कृपा
आशिर्वादाने ज्येष्ठ व्यक्तींवरील संकट दूर होईल. आईची इच्छापूर्ती कराल व त्यातून समाधान मिळेल.मिथुन :–स्वकष्टार्जित धनाचा इतरांसाठी मोठ्या प्रमाणात वापर करावा लागेल. लहान भावंडाच्या मनातील इच्छा
प्रत्यक्षात पूर्ण होण्याकरीता तुमच्या प्रयत्नाना यश येईल. राजकीय क्षेत्रातील मंडळीना अचानक कामाचा तणाव
निर्माण होईल.कर्क :–अचानक तुम्हाला तुमच्यातील आत्मविश्वास कमी झाल्याचे जाणवेल. शिक्षकांना नवीन प्रशिक्षण करण्याची
संधी मिळेल. तरूणांना अचानक अँपेडिक्सचा त्रास होऊ लागेल. कोणाशीही आज स्पर्धा करू नका.सिंह :– तुमच्या नोकरीच्या ठिकाणी महत्वाच्या कामात तुम्हाला सल्ला विचारला जाईल. आजारी व हाँस्पिटलमधे
अँडमिट असलेल्यांना आज डिसचार्ज मिळेल. विद्यार्थ्यांना अवघड विषयातील झालेल्या प्रगतीमुळे समाधान वाटेल.कन्या :–व्यवसायातील तुमच्या कर्तृत्वामुळे तुमचा सन्मान वाढेल. नोकरीतील कर्मचार्यांचे घरापासून लांबच्या
ठिकाणी बदली होणार असल्याचे कळेल. दुसर्यांच्या ताब्यात असलेल्या तुमच्या जागेवरचा ताबा सोडणार नाहीत
तरी वेळीच योग्य ते पाऊल उचलावे लागेल.तूळ :–एकाच वेळी दोन दगडावर पाय ठेवण्याने विनाकारण नुकसान करून घ्याल. अचानक होणार्या लाभापेक्षा
संथपणे होणार्या प्राप्तीला जास्त महत्व द्यावे लागेल . मनातील योजना कागदावर आणण्यापूर्वी पुन: एकदा
विचार करा.वृश्र्चिक :–ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याच्याकडूनच तुमची फसगत झाल्याचे उशीरा लक्षात येईल. सामाजिक
स्तरावर तुमच्या प्रतिष्ठेला बाधा येईल असे वागू नका. कुटुंबात वादग्रस्त विषयावरील चर्चेने मानसिक शांतता
बिघडेल.धनु :–ऐनवेळी सासुरवाडीकडून मिळणार्या मदतीवर अवलंबून राहिल्याने कामाचा खोळंबा होईल. सरकारी
अधिकार्यांना मुद्धामहून अडचणीत आणले जाईल. तरी जागरूक रहावे. मुलांच्या आर्थिक व्यवहारावर बारकाईने
लक्ष ठेवावे.मकर :–विवाहाच्या प्रस्तावाचा योग्य वेळेत विचार करा. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका.
मानसोपचार तज्ञांना अतिशय ताणतणावा सहन करावा लागेल. महिलांनी प्रत्येक गोष्ट शांततेने मिटवण्याचा
प्रयत्न करावा.कुंभ :–तरूणांना जून्या आजारावर मात केल्याचा आनंद होईल. घरगुती व्यवसायात नव्याने भांडवलाची गरज
निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी आपल्या इच्छेपेक्षा आपल्या क्षमता ओळखून विषय निवडावेत.मीन :–गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या घराचा लवकरच ताबा मिळणार असल्याची बातमी कळेल. वयस्कर
मंडळीना आर्थिक विवंचना जाणवेल. तुमच्या हातातील प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित केल्यास कामाचा आवाका कळेल व
भिती दूर होईल.
||शुभं–भवतु ||
Read in
गुरूवार 10 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 10 जून चंद्ररास वृषभ 25:09 पर्यंत व नंतर मिथुन.
चंद्रनक्षत्र रोहिणी 11:43 पर्यंत व नंतर मृगशीर्ष. वरील
दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय
फलादेश देत आहे.
1) आज शनैश्र्वर जयंती आहे. तरी ज्यांना शनीमहाराजांना प्रसन्न करून घ्यायचे आहे त्यांनी त्यांची उपासना
करावी. व पुढील मंत्र किमान २३ ञेळा म्हणावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी 108 वेळा करावा. प्रथम संकल्प
करावा.
सूर्य पुत्रो दीर्घ देहो विशालक्ष: शिवप्रिय 😐 मंदचार: प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि : ||
2) आज कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. पण ते भारतातून दिसणार नसल्याने काहीही काळजी करू नये.मेष :–राजकीय क्षेत्रातील मंडळीना अचानक फसवणूक प्रकरणात गोवले जाण्याच्या हालचाली सुरू होतील.
वयस्कर मंडळींच्या उजव्या डोळ्याचा मोतीबिंदू वाढला असेल तर त्वरीत डाँक्टरांचा सल्ला घ्या. आज तरूणांना
रोजच्यापेक्षा उत्साह कमी जाणवेल.वृषभ :–कुटुंबात पतीपत्नीमधे अचानक वाद होऊन नवीनच समस्या उभी राहील. डोकेदुखीचा, मायग्रेनचा त्रास
वाढेल. सेवाभावी काम करणार्या सेवकांना संस्थेकडून मान सन्मान मिळेल. महिलांना जवळच्या नातेवाईकांकडून
विचारपूस करण्याचे फोन येथील.मिथुन :–आज तुम्ही करत असलेल्या कामात, प्रोजेक्टमधे अडचणी निर्माण होतील. कोणीही मुद्धमहून करणार
नाही पण तुमचा पी . सी. ला किंवा साँफ्टवेअरला झालेल्या प्राँब्लेम मुळे सर्व गडबड होईल. प्रेझेंटेशनचा फियास्को
होईल.कर्क :–कोर्टकेसच्या गुंत्यातून तुम्ही लवकरच सुटणार असल्याचे लक्षात येईल. पतीपत्नी किंवा संततीबरोबर
झालेल्या दुराव्यात अचानक बदल होऊन प्रेमभावना निर्माण होईल व एकोपा होईल. लहान मुलांच्या हातातील
खेळण्याकडे विशेष लक्ष द्या.सिंह:–आज व्यवसायाबाबत च्या अडचणीत सुधारणा होणार्या गोष्टी घडतील व मानसिक समाधान मिळेल.
कुटुंबातील सर्वांचा हातभार लागल्याने महत्च्याच्या कामाला गती येईल. नोकरीतही प्रतिष्ठा वाढणार्या घटना
घडतील.कन्या :–सरकारी अधिकारी वर्गाला आपल्या कामातील त्रुटींकडे लक्ष् द्यावे लागेल तसेच त्यांच्या अधिकारात
अडचणी निर्माण होतील. नोकरी व व्यवसाय दोन्ही करणार्यांना आज तारेवरची कसरत करावी लागेल.तूळ :–उच्च शिक्षणासंदर्भातील कामात अचानक बदल करून नोकरीच्या संधीचा विचार कराल. पण सध्या
गुरूबरोबर होणारा नवपंचम योग शिक्षणाकडेच मन व वेळ व यशही मिळेल. कोणत्याच कामात दोलायमान होऊ
नका.वृश्र्चिक :–बर्याच दिवसापासून विम्याचे येणारे पैसे लवकरच मिळणार असल्याचे संकेत मिळतील. नव्याने विकत
घेतलेल्या किंमती वस्तूत बिघाड झाल्याने नुकसान भरपाई मिळणार असल्याचे कळेल. कुटुंबात आजी आजोबांना
तुमच्याकडून आनंद व समाधान मिळेल.धनु :–व्यवसायातील भागीदारीच्या व्यवहारात तुमच्या अडमोठी धोरणामुळे व्यत्यय येईल. तडकाफडकी निर्णय
घेऊ नका. विवाह ठरला असल्यास आज कोणत्याही विषयावर कोणतेही मत व्यक्त करू नका.मकर :–स्पर्धा परिक्षा किंवा इतर कोणत्याही स्पर्धेसाठी सध्या करत असलेली मेहनत पुरणार नाही.
वडीलधार्यांकडून मनातील शंकांचे निरसन करून घ्या. उगीत एकाच विचारावर चर्चा करून काहीच निष्पन्न होणार
नाही.कुंभ :–प्रेम प्रकरणात होणारे वाद सिरियसली घेऊन त्यावर विचार करा. नोकरीत बदलाची अपेक्षा करणार्याना
सहजपणे साध्य होणार आहे. वडिलांकडील नात्यातून काळजी लावणारा निरोप येईल.मीन :–शिक्षणात पडलेला खंड आता सुधारण्याची संधी निर्माण ङोईल. ज्येष्ठांना, प्रौढांना एखाद्या प्रशिक्षणआत
सामिल होण्याची संधी मिळेल. लेखकांना जूने थटलेले लेखनाचे पैसे प्राप्त होतील.
||शुभं–भवतु ||