daily horoscope

बुधवार 23 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

बुधवार 23 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

बुधवार 23 जून चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 11:47.पर्यंत व नंतर ज्येष्ठा.

वरील दोन्ही राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.
मेष :– नोकरीतील तुम्हाला न पटणार्‍यां गोष्टीं कराव्या लागल्यामुळे मनात बंडखोरीची भावना निर्माण होईल.
ज्येष्ठांकडून कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडत्या गोष्टींची पूर्तता लवकरच करणार असल्याचे आश्र्वासन मिळेल.

वृषभ :–स्पर्धात्मक कार्यक्षेत्रात काम करणार्यांना त्यांचे मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. लेखक, कवी
यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल. महिलांनी कुठल्याही परिस्थितीत भावनांचा अतिरेक होऊ देऊ नये.

मिथुन :–जमीनीच्या व्यवहारातील मिळणारी दलाली सहजपणाने मिळणार नाही तरी प्रथम कबूल करून घ्या.
नोकरीत वास्तवापेक्षा भविष्यातील लाभाचे अमिष दाखवले जाईल. तरूणांना त्यांच्या मनाविरुद्ध असलेले मत
स्विकारावे लागेल.

कर्क :–प्रकृतीकडे केलेले दुर्लक्ष फारच महागात पडणार आहे. दवाखान्यात अँडमिट केलेल्यांच्या प्रकृतीत आराम पडू
लागेल. राजकीय मंडळीना गुप्तशत्रूंच्या हालचालीवर लक्ष ठेवावे लागेल. सरकारी क्षेत्रातील मंडळीना अचानक
कामाच्या दिरंगाईबाबत स्पष्टीकरण द्यावे लागेल.

सिंह :–सामाजिक कार्यात तुम्ही केलेल्या कामामुळे मानसन्मानाचे मानकरी व्हाल. आईच्या माहेरकडील मंडळींची
भेट घडणार आहे. तरूणांना आपल्या कार्यक्षेत्रात स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळेल.

कन्या :–अधिक आर्थिक प्राप्तीसाठी दुसर्यांच्या सांगण्यावरून अचानक व्यवसायात बदल करू नका. उधार उसनवार
दिलेले पैसे परत मिळण्याचे निरोप येथील. अहंपणाने ताणून धरल्याने नातेसंबंधात बिघाड निर्माण होईल.

तूळ :–मोठ्या मार्केटमधे काम करणार्यांना नवनवीन उद्योगांची माहिती मिळेल. बोलण्यात स्पष्टता न ठेवल्याने
गैरसमज होणार आहेत. व्यवसायातील घडामोडींवर लक्ष केंद्रित करताना कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका.

वृश्र्चिक :–मनातील इच्छा प्रबळ झाल्याने काम पूर्ण करण्याची जिद्ध निर्माण होईल. विद्यार्थी एका विशिष्ट
विषयाच्या अभ्यासाच्या प्रवेशासाठी हट्ट धरतील. मुलींच्याकडे प्रत्येक प्रश्राला प्रतिप्रश्न असल्याने कोणताच प्रश्र्न
सुटणार नाही.

धनु :– आज शारिरीक दुर्बल असलेल्यांना मित्रमंडळींच्या सहकार्याने मानसिक बळ वाढेल. इतरांच्या चुका
काढण्यापेक्षा स्वत:च्या कामातील प्रगतीकडे जास्त लक्ष द्या. कलाकार मंडळीना पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रवेश
मिळण्याचे मार्ग मोकळे होतील.

मकर :–जवळच्या नातेवाईकांबरोबर मतभेदाचे प्रसंग येतील पण नातेसंबंध बिघडू देऊ नका. वेळेचा सदुपयोग
केल्याने नियोजनात नसलेल्या कामाची पण चांगली सुरूवात होईल. सर्वच गोष्टी तुम्हाला पटत नसल्या तरी सतत
विरोध करू नका.

कुंभ :–तुमच्या पुढाकाराने व कुटुंबियांच्या वतीने शेजारील मंडळीना जिवदान मिळेल. नोकरदारांना वैयक्तिक
डाँक्युमेंटची गरज भासेल पण वेळेवर सापडणार नाहीत. मुलांच्या आर्थिक व्यवहारावर लक्ष न दिल्याने त्याचेकडून
निरूपयोगी खरेदी होईल.

मीन :–तुमचे अंदाज आज अजिबात चुकणार नाहीत. व्यावसायिक कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केल्यामुळे
मार्केटमधील तुमची प्रतिष्ठा वाढेल. परदेशी वस्तूच्या हव्यासापोटी डबल पैसे घालवाल.

||शुभंभवतु ||

 

daily horoscope

मंगळवार 22 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

मंगळवार 22 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

मंगळवार 22 जून चंद्ररास तूळ 08:59 पर्यंत व नंतर वृश्चिक.

चंद्र नक्षत्र विशाखा 14:22 पर्यंत व नंतर अनुराधा.
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने
नक्षत्रीय फलादेश देत आहे.

गुरूवार 24 जून रोजी वटपौर्णिमा असल्याने आज मंगळवारपासून त्रिदिनात्मक सावित्री व्रताचा आरंभ होत आहे.

मेष :– वैवाहिक जीवनातील घडामोडींच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्यास सासूरवाडीकडून दणका बसण्याचा
धोका आहे. सासूरवाडीकडून सशर्त अटींवर व्यवसायात आवश्यक तेवढी आर्थिक मदत मिळेल. सरकारी नियमांचा
ससेमिरा मागे लागेल.

वृषभ :–नोकरीतील तुमच्याकडून झालेली दिरंगाई , तसेच व्यवसायातील न भरलेल्या टँक्स बद्धल विचारणा
करणारी नोटीस येईल. कोणताही वशिला लावायचा प्रयत्न केल्यास अडचणी वाढतील.

मिथुन :–नोकरीतील अडचणीत वाढ झाल्याने नोकरीविषयी आत्मियता राहणार नाही. आजोळकडील ओळखींच्या
माध्यमातून अडचणींतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तुमची बाजू
मांडण्यास आता संधी मिळणार नाही तरी आता फँक्ट अँक्सेप्ट करावी हे उत्तम.

कर्क :–आज व उद्या आईवडीलांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. जमिन व घर याबाबतच्या कोर्टात
चाललेला वाद विवाद कोर्टाच्या बाहेर समंजसपणे मिटण्याचे मार्ग सापडतील. नवीन घराचे पझेशन मिळण्याचे
ठरेल.

सिंह :– आर्थिक कोंडी दूर झाली असूनही नियोजनातील चुकांमुळे आज आर्थिक चणचण जाणवेल. व्यावसायिकांना
गुंतवणूकीच्या जून्या व्यवहारांवर चांगला लाभ होईल. तरूणांनी जुगार सदृश्य व्यवहार टाळावे.

कन्या :–नोकरीत तुमच्यावर आलेले बदलीचे सावट तुम्हाला लाभदायक ठरेल. जोडीदाराच्या नावाने नव्याने केलेली
गुंतवणूक लाभदायक राहील. दवाखान्यातून डिसचार्ज मिळण्यात आज कोणतीही अडचण राहणार नाही.

तूळ :–मित्राच्या मदतीने व्यवसायातील नवीन योजना सुरू कराल. आजपर्यंतची नोकरीतील तुमचा
कामाबाबतचा असलेला आदर व सन्मान वाढेल. पतीपत्नीच्या व्यवसायात अचानक वृद्धी होणारे प्रसंग येतील व
प्रतिष्ठेची वाढ होईल.

वृश्र्चिक :–स्मृतीभंशाचा त्रास असलेल्यांना घराबाहेर सोडू नका. विवाहित महिलांनी कुटुंबाकरता घेतलेल्या कष्टाची
जाणीव इतरांना झाल्याचे पाहून महिलांना कृतकृत्य झाल्याचे जाणवेल. शिक्षक व प्रोफेसर मंडळींकडून मोठ्या
प्रोजेक्टची आखणी होईल.

धनु :–पतीपत्नी दोघांच्या सहविचाराने नवीन घराचे बुकींग कराल. विवाहेच्छूना विचार जूळणारा जोडीदार
मिळाल्याने आनंद होईल. मोठ्या प्रमाणातील होर्डींगच्या कामातील व्यवहारावर संदर्भिय खात्याकडून आँब्जेक्शन
घेतले जाईल.

मकर :–लहान मुलांच्या अपचनाच्या तसेच उलटी जुलाबाच्या तक्रारी निघतील. पूर्वी उधार दिलेल्या रकमेच्या
विश्र्वासावर बसू नका. महिलांना स्वकष्टार्जित धनाचा अडचणीं करीता वापर करण्याची इच्छा होईल.

कुंभ :– इतरांच्या सांगण्यावरून घेतलेला निर्णय फायदेशीर असल्याचे मुलांना पटेल. कालपर्यंत ज्यांच्याबरोबर
तुमचे चांगले पटत होते त्यांच्या वागण्यामुळे तुमच्या मनात कटुता निर्माण होईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या
मनातील विचार ओळखून त्यांची इच्छा पूर्ण करावी.

मीन :–प्रवासातील जून्या ओळखीची सरकारी कार्यालयात भेट होईल. वैवाहिक जीवनात गोड बातमी मिळेल.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूर गावी किंवा परदेशी जाण्याची संधी मिळेल. या सप्ताहात फारशी आर्थिक चिंता
राहणार नाही.

||शुभंभवतु ||

 

daily horoscope

सोमवार 21 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

सोमवार 21 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार 21 जून चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र स्वाती 16:45 पर्यंत व नंतर विशाखा.

वरील राशी नक्षत्रांचा
विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज रवी आर्द्रा नक्षत्रात 29:37 ला प्रवेश करत आहे.
ज्येष्ठ शुक्ल पक्षातील एकादशी ही निर्जला एकादशी या नावाने ओळखली जाते.
मेष :– मोठ्या लोकांच्या ओळखीने करावयाची कामे आज आठवड्याच्या सुरवातीलाच नियोजनात घेतल्यास या
सप्ताहात कामे बर्‍यापैकी होतील. वैयक्तिक जीवनात मान सन्मान मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रातील तुमचे अंदाज
अचूक निघतील.

वृषभ :–नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे, नियोजनाचे खूपच कौतुक होणार आहे. तरूण मंडळीना आपल्या
छंदाचा, कलेचा वापर व्यवसायाच्या दृष्टीकोनातून करता येणार आहे. तरी मोठ्यांचा सल्ला घ्यावा.

मिथुन :–स्वत:चा कोणत्याही प्रकारचा उद्योग असला तरी त्यात तुम्हाला चांगले यश मिळून आर्थिक प्राप्ती पण
चांगली होणार आहे. तरूणांच्या जीवनात आजपासूनचे पुढील दोन दिवस चांगल्या घडामोडींचे राहणार आहेत.

कर्क :–नोकरीतील अपेक्षित बदलाचे स्वप्न पूर्ण होण्याचे संकेत मिळतील. आईच्या इच्छेनुसार गावाकडील
घराबाबतचे निर्णय घेतला जाईल व बांधकामाची चर्चा सुरू होईल. दैनंदिन जीवनात आज समाधान मिळेल.

सिंह :–जवळच्याच नातेवाईकांबरोबर वैचारिक मतभेदांमुळे मानसिक नाराजी येईल. मुलांच्या वागणूकीवरून
कुटुंबात वादळ निर्माण होईल. नोकरी विषयक जून्या मुलाखतीच्या वेळी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे जाणवेल.

कन्या :–गेले वर्षभर ज्या आर्थिक अडचणीतून जात आहात त्यात बदल होणार असल्याचे संकेत मिळतील. पूर्वी
झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मित्रांच्या मदतीने तयार नवा उद्योद मिळेल. अजिबात पाय मागे घेऊ नका.

तूळ :–कुटुंबातील आरोग्याच्या तक्रारी कमी होऊ लागतील. कलाकारांना अचानक कार्यक्रम मिळाल्याने आर्थिक
बाजू सावरू लागणार असल्याने कुटुंबात आनंद निर्माण होईल. मुलांकडून आवश्यक ती मदत मिळेल.

वृश्र्चिक :–कामगार वर्गाला आरोग्याचे प्रश्र्न मानसिक त्रास देणारे ठरतील. वयस्कर मंडळींसाठी त्यांच्या
आरोग्यासाठी मोठा खर्च करावा लागेल. घरातील मानापमानाच्या प्रश्र्नांवर पडदा न टाकल्यास मानसिक स्वास्थ्य
हरवेल.

धनु :–नव्याने नोकरीच्या शोधतील कामगारांना चांगली नोकरीची संधी उपलब्ध होईल. राजकीय क्षेत्रातील तुमचे
सहकारी अचानक तुमच्या बाबतीत घुमजाव करतील. तुमचा आत्मविश्वास हेच तुमचे बळ राहील हे लक्षांत ठेवा.

मकर :–कुटुंबातील व्यक्तींच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्याचा त्रास सोसावा लागेल. महिलांनी आपले
व्यक्तिमत्वात बदल करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा. गुंतवणूकीबाबतचे तुमचे अंदाज अचूक निघतील.
कामातील घेतलेला निर्णय फायदेशीर असल्याचे मुलांना पटेल

कुंभ :–कुटुंबात ज्येष्ठ मंडळीकडून अचानक अशांतता निर्माण होईल. कलाकारांना आपले स्वप्न साकार होणार
असल्याचे संकेत मिळतील. गुरूतुल्य व्यक्तीकडून व्यवसायाबाबतच्या महत्वाच्या टीप्स मिळतील.

मीन :–सप्ताहाची सुरूवात आनंदी घटनेने व मनपसंत खरेदीने होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारांवर
आत्मचिंतन करण्याची गरज आहे. बँकेच्या व्यवहाराबाबतची चर्चा परक्या समोर करू नये. कुटुंबात नवीन पाहुणा
येणार असल्याची गोड बातमी मिळेल.

||शुभंभवतु ||

 

weekly-horoscope-2020

रविवार 20 जून 2021 ते शनिवार 26 जून 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

Read in

रविवार 20 जून 2021 ते शनिवार 26 जून 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

रविवार 20 जून चंद्ररास कन्या 07:41 पर्यंत व नंतर तूळ.

Read More

daily horoscope

शनिवार 19 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शनिवार 19 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार 19 जून चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्रनक्षत्र हस्त 20:27 पर्यंत व नंतर चित्रा.

वरील राशी नक्षत्रांचा विचार
करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–देवस्थानच्या कारभाराची, हिशोबाची किंवा इतरजी जबाबदारी असेल ती तुमच्याकडून प्रामाणिकपणे पार
पाडली जाईल. उत्कृष्ट काम करण्याच्या सवयीमुळे तुमचा इतरांवर प्रभाव पडेल. वडीलांच्या मार्गदर्शनामुळे
कामातील नवनवीन युक्त्या सापडतील.

वृषभ :–विवाहेच्छूंना परिचयातून विवाह जमण्याचे संकेत मिळतील. कोणत्याही रखडलेल्या कामात तुम्ही लक्ष
घातलेत तर काम लवकरच फत्ते होऊन जाईल. कलाकार व गायक मंडळीना आपल्या कलेमुळे प्रसिद्धी मिळत
असल्याचे जाणवेल.

मिथुन :–कोणत्याही व्यवहारात दक्षता बाळगल्यास गडबड घोटाळ्याचा धोका राहणार नाही. शिक्षण क्षेत्रात काम
करणार्यांना नवीन संधी निर्माण होणार आहे तरी त्याचा फायदा घ्या. विचार न करता खर्च करण्याच्या सवयीमुळे
खूप मोठी आर्थिक तंगी निर्माण होईल.

कर्क :–नोकरीतील वाद, मतभेद हे तेथेच मिटवायचे असतात याचा मोठा अनुभव येईल. विवाहेच्छू मुलींनी आपल्या
अपेक्षांना आवर घातल्यास विवाहाचा मार्ग मोकळा होईल. बँकेतील व्यवहार आंधळेपणाने दुसर्यांवर सोपवू नका.

सिंह :–भागीदारीच्या व्यवसायातील नवीन योजना सुरू करण्यापूर्वी पुन: एकदा तपासून पहाव्यात. अडकलेली
सरकारी कामे स्वत: केल्यास ती लवकर होतील व व्यवस्थित व अचूक होतील. कुटुंबात एकत्र बसून सहविचाराने
निर्णय घ्या.

कन्या :–पतीपत्नीच्या एकत्रित उत्पन्नाचा दाखला दिला तर बँकेकडून कर्ज मिळणे सोपे होईल. सरकारी क्षेत्रातील
ज्येष्ठ निवृत्त अधिकार्यांचा तुमच्यावर मोठा प्रभाव पडेल व भारावून जाल. बदलत्या परिस्थितीचा विचार करून
निर्णय घ्या.

तूळ :–खर्चाचे नियोजन न केल्याने अचानक खर्च मर्यादेबाहेर होईल. आईवडीलांनी मुलांच्या आर्थिक व्यवहारावर
लक्ष ठेवल्यास वस्तुस्थितीची कल्पना येईल. उगाच अंदाज बांधत बसू नका.

वृश्र्चिक :– दुर्घटना टाळण्यासाठी आज घराबाहेर पडू नका. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आजच आळस
झटका. व्यवसायातील नवे पर्याय आर्थिक लाभ मिळवून देतील. कुटुंबात धार्मिक पूजेचे नियोजन कराल.

धनु :–दूर गेलेले नातेसंबंध सुधारण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न महत्वाचे ठरतील. कलागुणांना वाव मिळण्यासाठी
तुम्हाला स्वत:हून प्रयत्न करावे लागतील. वैयक्तिक पातळीवर कुटुंबात कौतुक होईल.

मकर :–तुमच्या अतीकाटकसरी स्वभावामुळे कुटुंबात वाद निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीवर
विश्र्वास ठेवून विषयांची निवड करावी. आज मित्रमंडळींच्या नादाने व्यसनाच्या आधीन जाल.

कुंभ :–वडील भावंडांबरोबरचे वाद व मतभेद समंजसपणाने संपवण्याचे मार्ग तुम्हाला अचानकपणे सापडतील.
महिलांच्या घरगुती उद्धोगाची चांगली वाढ होत असल्याचे जाणवेल. हातातील पैशांचा वापर काटकसरीने
केल्याचा आनंद मिळेल.

मीन :–प्रवासात सावधानता बाळगावी. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचे आईवडीलांच्या लक्षात
येईल. कलाकार मंडळीना एखादी मैफील गाजवता येणार आहे. मुलांच्या तल्लख बुद्धीला चँलेंज करू नका.

||शुभंभवतु ||

 

daily horoscope

शुकवार 18 .जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शुकवार 18 .जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार 18 जून चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा फाल्गुनी 21:36 पर्यंत व नंतर हस्त.

वरील राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.
मेष :–मुलांच्या संदर्भातील आनंददायक बातमीने खुष व्हाल. आईच्या आशिर्वादाने जमिनीचे व शेतीबाबतचे
अडकलेली कामे मार्गी लागतील. आज कोणालाही जामीन राहण्याचा विचारही करू नका.

वृषभ :–आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळीना अभ्यासाच्या सरावाची आवश्यकता आहे. पूर्वीची येणी मिळण्यासाठी चे
तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. महिलांना अचानक पाठदुखीचा व कंबरदुखीचा त्रास जाणवेल. कोणतीही नवीन खरेदी
करू नका.

मिथुन :–आजचा दिवस तुमच्यासाठी आईच्या आशिर्वादाचा राहील. कोणत्याही अडकलेल्या प्रकरणातून बाहेर
पडण्यासाठी मनाची शक्ती वापरावी लागेल. बँकेचे व्यवहार स्वत: करा इतरांकडून नकोत.

कर्क :– ज्यांच्या पायांना चिखल्या होण्याची सवय आहे त्यांनी आपल्या पायांची विशेष काळजी घ्यावी. नोकरीत
तुम्हाला प्रमोशनची बातमी मिळेल. मित्रपरिवाराबरोबर आवडत्या विषयावर चर्चा होऊन आंतिरक उर्जा वाढेल.

सिंह :–घरगुती व्यवसायात नवीन पर्याय समोर येतील. आत्मविश्वास वाढून पर्यायांचा विचार कराल. नोकरदारांनी
नोकरीतील कामातील बदलाचा स्विकार केल्यास करिअर उत्तम होण्यास मदत होईल.

कन्या :–नोकरीतील वातावरण आव्हानात्मक वाटेल पण तुम्ही स्वत:ला कामात झोकून द्याल. कुटुंबातील
ज्येष्ठांकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल. कुळाचाराच्या, धार्मिक पूजेसाठी दोन दिवस घरात विधी चालेल.

तूळ :–वासाची अत्तरे, परफ्युम्स, उदबत्त्या यांच्या घरगुती व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रात
उल्लेखनीय केलेल्या कामासाठी समाजिक क्षेत्रातून कौतुक होईल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात असणार्‍यांनी आज
शांत रहावे.

वृश्र्चिक :–नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना पूर्वी दिलेल्या मुलाखतींमधून सिलेक्ट झाल्याचा निरोप येईल.
उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचा बेत सध्या रद्ध करावा. व्यावसायिक क्षेत्रातील अंदाज अचूक निघतील.

धनु :–तुमच्या नवीन गुंतवणूकीचा विचार सल्ला घेऊनच करा. कोणत्याही व्यक्तीवर क्षुल्लक कारणावरून
चिडचिड करू नका किंवा वादही निर्माण करू नका. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्याचा तुमचा फंडा जबरदस्त
राहील.

मकर :–घरांविषयीच्या न सुटणार्या प्रश्र्नांसाठी कायदेशीर सल्ला घ्यावा लागेल. व्यवसायातील कर्जमुक्तीसाठी
तुम्हाला नवीन योजना आखाव्यात लागतील. शाळकरी मुलांना आपल्या पूर्वनियोजित कामाचा आढावा घेऊनच
पुढील अभ्यासाचे नियोजन करावे लागेल.

कुंभ :–कुटुंबातील वृद्ध व्यक्तीची दिवसरात्र सेवा करण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. तरूणांचा त्यांच्या
व्यवसायाव्यतिरिक्त कांही नवीन उद्योग करायचा विचार असल्यास त्याची पूर्ण विचाराने सुरूवात करावी घाई करू
नये.

मीन :–आजचा दिवस अतिशय गतामान राहील. कामाची सांगड घालताना नाकी नऊ येतील. कोणतीही खरेदी
करताना आपण फसत नसल्याची खात्री करून घ्या. परदेशातील नोकरीचा प्रश्न विचारानेच सोडवा.

||शुभंभवतु ||

 

daily horoscope

गुरूवार 17 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

गुरूवार 17 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

गुरूवार 17 जून चंद्ररास सिंह 28:06 पर्यंत व नंतर कन्या.

चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 22:12 पर्यंत व नंतर उत्तरा
फाल्गुनी. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती
पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–तुमच्या अपेक्षेनुसार तुमची मुले शिक्षणाच्या बाबतीत तुमचा सल्ला मान्य करतील. तुम्ही पूर्वी हातउसने
दिलेले पैसे परत मिळण्याची मावळत चाललेली आशा पुन्हा जाणवू लागेल. सरकारी लायसन्स च्या बाबतीत योग्य
त्या अधिकार्याची भेट होईल.

वृषभ :–शाळकरी मुलांच्या मित्रांचे पालक तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येथील. कुटुंबात पाहुण्यांचे आगमन होणार
असल्याने घरातील वातावरण आनंदी राहील. कोणतीही आरोग्याची तक्रार जाणवल्यास लगेच डाँक्टरांचा सल्ला
घ्यावा.

मिथुन :–सामाजिक कार्यातील तुमच्या सहभागाने लोकांना आछ्चर्य वाटेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास निष्फळ
ठरणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. साहित्यिक, लेखक व कलाकार मंडळींना त्यांच्या कार्याविषयीची
पोचपावती मिळेल.

कर्क :–आज तुमच्या मनातील विचार स्पष्टपणे व्यक्त करण्याची योग्य वेळ आलेली आहे हे लक्षांत घ्या. महिलांनी
अतीविश्र्वासाने केलेली मदत वाया जाणार नाही. स्पर्धात्मक गोष्टीत मनातील इच्छेच्या बळावर बाजी माराल.

सिंह :–आज तुमच्या स्वभावातील प्रेमळपणाचा अनुभव इतरांना येणार आहे. कुटुंबात सुना, जावई यांच्याबरोबर
सहभोजनाचा आनंद घ्याल. पतीपत्नीमधील मतभेद दूर होऊन प्रेमभावना वाढेल.

कन्या :– जवळच्या नात्यातील आजारी व्यक्तीस वेळेवर आराम न पडल्यास दवाखान्यात अँडमिट करावे लागेल व
त्याची जबाबदारी तुमच्यावर येईल. पोलीस खात्यातील वरीष्ठांना वादग्रस्त प्रकरणे अतिशय जागरूकपणे हाताळावी
लागतील.

तूळ :–महिलांकडून केलेले नवीन उपक्रमाचे आयोजन कौतुकास्पद ठरेल. बोलण्यातील कला व आवाजाच्या
कार्यशाळेची जबाबदारी तुमच्याकडून अगदी व्यवस्थितपणे फार पडेल. लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल.

वृश्र्चिक :–पोस्टाच्या बचत योजनेबाबतच्या प्रचार प्रसाराच्या जबाबदारीच्या कामावरील तुमची नियुक्ती समाधान
देईल . कुटुंबातील ज्येष्ठांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली गायनाची मैफल अप्रतिम आनंद देईल.

धनु :–सकाळपासूनच्या नियोजित कामातील तुमचा सहभाग तुम्ही उत्तम रितीने फार पाडाल. शेजारील ज्येष्ठांच्या
समाधानाकरीता त्यांची इच्छा पूर्ण करावी लागेल. आर्थिक गरजेकरीता कोणाचीही मदत न घेता वेळ निभावून
न्याल.

मकर :–संततीच्या प्रगतीच्या दृष्टीने तरूणांना आपल्या मनाला मुरड घालावी लागेल. सरकारी कागदपत्रांची फाईल
प्रवासात जीवापेक्षाही सांभाळावी लागेल. वृद्धाश्रमातील आर्थिक व्यवहारातील तुमच्या कामात पारदर्शकता ठेवावी
लागेल.

कुंभ :– शालेय विद्यार्थ्यांना शिकवणार्या शिक्षकांना आपले प्रशिक्षण आँन लाईन करता येणार आहे. बांधकाम
क्षेत्रातील कंत्राटदारांनी आर्थिक व्यवहार तपासून घ्यावेत नुकसानीची शक्यता आहे.

मीन :–मित्रांच्या मदतीने व्यवसायातील अडलेले काम मार्गी लागेल. किरकोळ विक्रेत्यांना, घरगुती लहान
उद्योगांना एकमेकांच्या ओळखीतून योग्य ती चालना मिळेल. मोकळेपणाने बोलल्यास व्यवसायवृद्धी चांगली
होईल.

||शुभंभवतु ||

 

daily horoscope

बुधवार 16 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

बुधवार 16 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

वरील दोन्ही राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.
मेष :–नोकरीच्या ठिकाणी तुमचे वरीष्ठ व सिनिअर्स यामधे वैचारिक वाद उफाळून येईल पण त्यात तुमच्या
मध्यस्थीने मार्गी लागेल. पोलीस व होमगार्ड क्षेत्रातील कर्मचार्‍यांवर, अधिकार्यांवर अचानक आरोप होतील.

वृषभ :–मनाविरुद्ध घटना घडताना पाहून मनाला अस्वस्थपणा येईल. सामाजिक स्तरावर तुमच्या मनातील
विचार, महत्वाच्या सूचना यांची चर्चा करण्यास संधी मिळेल व शासकीय स्तरावर त्याची दखल घेतली जाईल.

मिथुन :–आरोग्यविषयक चर्चासत्रात तुम्हा डाँक्टर व मानसोपचार तज्ञांचे विचार बहुमोल ठरतील. प्रवासाचा
कोणताही बेत सध्या ठरवू नका. मित्रमंडळीमधे एखादी समाजहितोपयोगी योजना कार्यान्वित करण्याचे ठरेल.

कर्क :–आज तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कार्यातून आनंद निर्माण होईल. शैक्षणिक क्षेत्रात मदत करण्याच्या
तुमच्या हेतुला लोक उचलून धरतील व त्यात सामिलही होतील. कुटुंबात नवीन मेंबरचे आगमन होणार असल्याचे
कळेल.

सिंह :–अँपेंडिक्सच्या रूग्णांना दवाखान्यात अँडमिट करावे लागेल. प्रेमाच्या अवास्तव कल्पना व्यवहारात चालत
नाहीत याचा प्रेमवीरांनी विचार करावा. नवीन घर घेण्याचा विचार तूर्त तरी करू नका.

कन्या :–धार्मिक कार्यासाठी मोठा खर्च होईल. वारसा हक्का बाबतची अपूर्ण राहिलेल्या कामाना प्रथम प्राधान्य द्या.
नोकरीतील तुमच्यावर न सोपवलेली जबाबदारीही तुम्हाला पार पाडावी लागेल.

तूळ :–व्यवसायात हाताखालील कर्मचार्‍यांची चांगली साथ मिळेल. लहान मुलीं आपल्या इच्छा पूर्ण करून
घेण्यासाठी हट्टाला पेटतील. अचानक महिलां भावनावश होतील व मनाची व्याकुळता वाढेल. दूर गावी असलेल्या
मुलांच्या आठवणीने दु:खी होतील.

वृश्र्चिक :–मित्रमंडळींबरोबरच्या गप्पात खिशातील रकमेपेक्षा दहापट खर्च कराल. हाँस्पिटलमधील कर्मचार्‍यांनी
तुमच्यावर असलेली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडल्याने सर्वत्र कौतुक होईल. आरामाची आवश्यकता
वाढेल.

धनु :–विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण तणाव वाढेल. मुलांनी आपली क्षमता ओळखून अवघड विषयाकरीता वेगळ्या
शिक्षकांची सोय करावी. कोर्टातील कर्मचार्‍यांना जनतेच्या क्षोभास सहन करावे लागेल.

मकर :–आज तुम्हाला एखादा कडक निर्णय घ्यावा लागेल जो तुमच्या मनालाही पटणार नाही. पूर्ण विचाराने व
चर्चेने घेतलेले निर्णय योग्य राहतील. आजारपणातून बरे वाटलेल्यांना फार मोठ्या संकटातून वाचलो आहोत ही
भावना राहील.

कुंभ :–नोकरीतील आनंदी वातावरणाचे सर्व क्रेडीट तुम्हालाच मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रातील महिलांना आपल्या
कामाच्या वेळात किंवा कामात कोणतीही सुट घ्यावी असे वाटणार नाही. कुटुंबात अचानक आईच्या माहेरील पाहुणे
येतील.

मीन :–संततीबाबतच्या तुमच्या अपेक्षा पूर्ण होणार असल्याची खात्री पटेल. ज्येष्ठ मंडळीना शालेय जीवनातील
मित्रमंडळींबरोबर संपर्क साधले जातील. आज व उद्या मोबाईल हरवण्याचा धोका आहे. तरूण ड्रायव्हर्सनी वाहनांची
वेगमर्यादा पाळावी.

||शुभंभवतु ||

 

daily horoscope

मंगळवार 15 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

मंगळवार 15 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

मंगळवार 15 जून चंद्ररास कर्क 21:41 पर्यंत व नंतर सिंह.

तसेच चंद्रनक्षत्र आश्लेषा 21:41 पर्यंत व नंतर मघा.
वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय
फलादेश देत आहे.

मेष :– नोकरीच्या ठिकाणी ताणतणाव वाढल्याने नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करावासा वाटेल. पतीपत्नीच्या
व्यवसायातील आर्थिक वाढ चांगली होईल व मोठ्या प्रमाणात आनंद साजरा कराल.

वृषभ :–तुमच्या बोलण्यातील पुढाकाराने कुटुंबियांच्या फायद्याची गोष्ट घडेल. विवाहेच्छूंना मनासारखा जोडीदार
मिळाल्याचा आनंद मिळेल. वडिलांच्या व्यवसायाची जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात येईल.

मिथुन :– आजचा दिवस सकाळपासूनच लाभदायक व आर्थिक व्यवहाराचा, कमाईचा राहील. ज्येष्ठांना आपल्या
ज्ञानाचा उपयोग तरूणांना मार्गदर्शन करण्याकरीता करावा लागेल. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची घाई करू नये.

कर्क :– दैनंदिन जीवनातील आनंदाचा सुखद अनुभव येईल. कामाचा व्याप वाढला तरीही मानसिक आनंद मिळेल.
वडिलांच्या, सासरच्या नात्यातील आलेला दुरावा तुमच्या पुढाकाराने कमी होईल व त्याबाबत तुमचे कौतुकही होईल.

सिंह :– नवोदित कवी, लेखक यांना आपली ओळख निर्माण करता येणार आहे. आँन लाईनच्या माध्यमातून तुम्हाला
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा कार्यक्रम हाती घेण्याचे ठरेल. कोणत्याही प्रकारची हुकमत न करता इतरांचा सहभाग
घ्याल.

कन्या :–व्यवसायातील नव्या मार्गाचा अवलंब करण्याचे सहविचाराने ठरेल. महिलांना अचानक पाय व पाठ दुखीचा
त्रास जाणवेल. नर्सिंग क्षेत्रातील महिला व पुरूष वर्गास समाजाकडून जाहीरपणे प्रशंसेचे व कौतुकाचे शब्द मिळतील.

तूळ :–चित्रकार, रांगोळी काढणारे, पेंटींग्ज करणार्यांना आँन लाईन प्रदर्शन भरवता येणार आहे. तसेच आँन
लाईनच्याच माध्यामातून मोठे वेबिनार घेण्याचे ठरेल. कोणत्याही प्रकारच्या गुप्त गोष्टींसाठी तिसर्‍या व्यक्तीची
मदत घेऊ नका.

वृश्र्चिक :–कुटुंबातील व्यक्तींच्या इच्छा एकाच वेळी पूर्ण करण्यासाठी तुम्ही जीवाचे रान कराल. कलाकारांना
सामाजिक पातळीवर आपली कला सादर करण्याची खूप मोठी संधी मिळेल. महत्वाच्या कामात काहीही कसूर
सोडणार नाही.

धनु :– हातात घेतलेले काम अत्यंत चिकाटीने पूर्ण कराल. नोकरीतील तुमचे यश उल्लेखनीय राहील.
राजकीयदृष्टय़ा आज तुमच्या अधिकारात करण्यात आलेल्या वाढीमुळे प्रतिष्ठा वाढेल व तुमची पण काम
करण्याची हीम्मत वाढणार आहे.

मकर :–सरकारी क्षेत्रातील पेडींग कामे करण्यासाठी तुम्हाला दिलेल्या वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल.
अजोळकडील नात्यातील मंडळींच्या भेटीतून नवीन उर्जा मिळेल. महिलांना अध्यात्मिक क्षेत्राविषयी कुतूहल
निर्माण होईल.

कुंभ :–विद्यार्थी वर्गास अभ्यासाची, नवीन शिक्षणक्रमाची जबरदस्त ओढ निर्माण होईल. प्रायव्हेट कोचिंग
क्लासच्या शिक्षकांना मोठे टार्गेट दिले जाणार आहे. नोकरीत प्रमोशनच्या बातम्या कानावर येथील.

मीन :– लहान मुलांच्या रूग्णालयातील डाँक्टर्सना अतिशय मानसीत ताण वाढेल. मानसोपचार तज्ञांना अतिशय
गुंतागुंतीच्या प्रकरणाचा अभ्यास करावा लागणार आहे. लोखंडाशी संबंधित व्यवहार असलेल्यांनी आज खरेदी,
विक्री कांहीही करू नका.

||शुभंभवतु ||

 

daily horoscope

सोमवार 14 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

सोमवार 14 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार 14 जून चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 20:35 पर्यंत व नंतर आश्लेषा.

वरील दोन्ही राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.

मेष :–आज आईला भेटण्याची, आईजवळ बसून बोलण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या
विचाराने मुलांच्या शिक्षणाबाबतचा निर्णय घ्या. तरूण मुलांना सुद्धा मार्गदर्शनाची गरज भासेल. महिलांनी
आपल्या कल्पना विचारात घ्याव्यात.

वृषभ :–नोकरीसाठी लांब गेलेल्यांना नवीन नोकरी निमीत्ताने आपल्या जिल्ह्यातच परत येण्याची संधी मिळेल.
लेखक व कवी मंडळीना आपल्या विषयावरील माहिती व प्रशिक्षण वेबिनारच्या माध्यमातून देता येणार आहे तरी
तसा प्रयत्न करावा.

मिथुन :–आईवडीलांच्या आनंदासाठी मुलांना आपल्या मतांना व इच्छेला ही मुरड घालावी लागेल. हातातील पैशांचा
उपयोग फक्त भविष्यासाठी न ठेवता वर्तमानातही वापरावा लागतो हे लक्षात घेतल्यास मनाला त्रास होणार नाही.

कर्क :–रसायनाच्या कारखान्यात काम करणार्या कामगारांनी आपली प्रकृती ठिक असल्याचे चेक करावे. किरकोळ
भाजी विक्रेत्यांना अचानक चांगला लाभ होईल व मोठ्या आँर्डरची खात्री मिळेल. घरगुती उद्योगात चांगली आवक
होईल.

सिंह:–आज तुमच्या स्वभावातील ताठपणा नुकसानीस कारणीभूत होईल. कुटुंबात जोडीदाराच्या आजारपणाची
चिंता वाढेल व मानसिक ताण वाढेल. बँकेच्या कर्ज प्रकरणाची वेळेत चौकशी केल्यास काम मार्गी लागेल.

कन्या :–कलाकारांना आपल्या कलेला जनतेने उचलून धरल्याचे जाणवेल. महत्वाच्या कागदपत्रांवर सह्या
करताना त्याविषयीची पूर्ण माहिती करून घ्या. महिलांना दैनंदिन कामातून आपल्या छंदासाठी वेळ काढता
आल्यामुळे मानसिक समाधान मिळेल.

तूळ :–अचानक कौटुंबिक कारणासाठी प्रवास करावा लागेल. सरकारी बँकेच्या कर्जाबाबतीत आजपर्यंतच्या तुमच्या
कल्पना फोल ठरतील. वकील मंडळीनी आता कामाची घाई केल्यास कामातील उरक वाढेल व तो तुमचा प्लस पाँईंट
राहील.

वृश्र्चिक :–प्रतिष्ठेच्या विचाराने मानभावीपणे वागू नका त्यामुळे तुमचेच नुकसान होणार आहे. सामाजिक कार्यात
सहभागी होण्यासाठी लोकांकडून प्रेशर येईल. तुमच्या आवडीच्या क्षेत्राविषयीची माहिती सादर करण्याची चांगली
संधी मिळेल.

धनु :–भागीदारीच्या व्यवसायातील नवीन जबाबदार्‍या स्विकाराव्या लागतील. पूर्वीच्या कामाच्या अनुभवावर
आधारित तुम्हाला मान दिला जाईल. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते याची जाणीव होईल.

मकर :–उच्च पदावरील मंडळीनी ताकही फुंकून प्यायचे दिवस आहेत हे लक्षांत ठेवावे. व्यवसायात भागीदाराच्या
मताचा आदर करून सहविचाराने योजना ठरवाव्यात. वरिष्ठांबरोबरचे मिटींग चांगली फलद्रूप होईल.

कुंभ :–नोकरीतील सध्या निर्माण झालेल्या अडचणींवर तुमच्याकडूनच उपाय सापडणार आहे. सर्वांची भिस्त
तुमच्यावरच राहील. आजारी कंपन्यांच्या कामावर चर्चा व अभ्यास करण्याच्या कमिटीत तुमचे नांव प्रथम दर्जाला
राहील.

मीन :–सध्याच्या अडचणींवर श्री गुरूमाऊलीकडून योग्य तो उपदेश मिळेल व उपासनेचे महत्व कळण्यासाठी हे
संकट होते याची प्रचिती येईल. कुटुंबात धार्मिक समारंभाचे आयोजन करण्यात येईल व त्याची जबाबदारी
तुमच्यावर राहील.

||शुभंभवतु ||