Read in
शनिवार 09 एप्रिल 2022 चे दैनंदिन राशी भविष्य.
शनिवार 09 एप्रिल चंद्ररास मिथुन 21.49 पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु 28.29 पर्यंत व नंतर पुष्य. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून आजच्या पहाटेच्या वेळेनुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज दुर्गाष्टमी आहे.
आज भवानीदेवी उत्पत्तीचा दिवस आहे. अशोककलिका प्राशन करण्याचा दिवस 25.23 पर्यंत आहे.
मेष :–बरेच दिवस भेट न झालेल्या गावातल्या गावातील मित्राची भेट घडेल किवा किमान बोलणे तरी होईल. आज अचानक धनप्राप्तीचा योग आहे.
वृषभ :–मनोरंजनासाठी वेळ द्यावासा वाटेल. मित्रमैत्रिणी तसेच जवळच्या नातेवाईकांच्या मदतीने घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा वाढदिवस करण्याचे ठरेल.
मिथुन :–आर्थिक व्यवहारात विचार न करता कांहीही करू नका. अचानक वाहनावर खर्च करावा लागेल. आज मानसिक ताण वाढेल.
कर्क :– घरातील ज्येष्ठांनी त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारीकरीता दवाखान्यात न्यावे लागेल. सध्याच्या परिस्थितीत विशिष्ट व्यक्तीकडून मनापासून मदत मिळेल.
सिंह :–घरगुती वादांना तोंड देणे अवघड जाईल. सामाजिक कार्यात मनात नसले तरी भाग घ्यावा लागेल.
कन्या :–आजचा दिवस बँकेची अडकलेली कामे मार्गी लावणारा आहे. खाजगी नोकरीतील मंडळीना प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल.
तूळ :–आज तुम्हाला आँन लाईन वेबिनारमधे सहभागी करून घेतले जाईल. तुमच्या कावातील अनुभवाने सर्वांना आश्चर्यचकीत कराल.
वृश्चिक :–कुटुंबात आनंदी वातावरण राहिल्याने वयस्कर मंडळी खूष होतील. घरात मंगलकार्याबाबतची बोलणी पुढे शकतील.
धनु :–विद्यार्थ्यांना कष्टाचे व प्रयत्नाचे महत्व पटेल. खाजगी नोकरीतील कर्मचार्यांना सहकार्यांकडून चांगली मदत मिळेल.
मकर :–नवीन वाहन खरेदीचे विचार सध्यातरी पुढे ढकला. कामातील अतिउत्साहामुळे कामाचे समाधान मिळेल.
कुंभ :- आज तुमच्या मानसन्मानात वाढ होऊन सुखद अनुभव मिळेल. नोकरीतील तुमच्यावर असलेली जबाबदारी तुम्ही व्यवस्थितपणे निभावाल.
मीन :–महत्वाच्या कामास तुमच्याकडून उशीर झाल्याने त्यातील आनंद निघून जाईल. महिलांना त्यांच्या इच्छा पूर्ण होणार असल्याची सूचना मिळेल.
|| शुभं-भवतु ||
ReplyForward
|