daily horoscope

शुक्रवार 08 एप्रिल 2022 चे दैनंदिन राशी भविष्य.

Read in

शुक्रवार 08 एप्रिल 2022 चे दैनंदिन राशी भविष्य.

शुक्रवार 08 एप्रिल 2022 चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा 25.42 पर्यंत व नंतर पुनर्वसु.

 

 

शुक्रवार 08 एप्रिल 2022 चे दैनंदिन राशी भविष्य. कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

शुक्रवार 08 एप्रिल 2022 चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा 25.42 पर्यंत व नंतर पुनर्वसु. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून आजच्या पहाटेच्या वेळेनुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

 

सूर्याला दवणा वाहण्याचा दिवस आहे. आज अशोककलिका प्राशन करण्याचा दिवस आहे. 25.42 पासून.

 

मेष :–आज सामाजिक कामाची जबाबदारी स्विकारावी लागणार आहे.  शांतपणाने कामाचा विचार करून सेवत:च्या क्षमतेचा अंदाज घेऊन मगच ठरवा.

 

वृषभ :–मुलांच्या प्रगतीच्या दिशेने तुमची वाटचाल चालेल तुम्ही घेतलेल्या निर्णयात इतरांच्या लुडबुडीचा विचार करू नका.

 

मिथुन :–लहान मुलांच्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. हातातील पैशांचा उपयोग योग्य ठिकाणी होत असल्याची खात्री करून घ्या.

 

कर्क :–मागिल महिन्यात उधार उसनवार दिलेले पैसे परत मिळतील. घरातील मोठ्या प्रमाणावरील खर्चाची कामे काढाल.

 

सिंह :–मानसिक ताणतणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. इतरांची कामे जबाबदार्‍या अंगावर ओढवून घेऊ नका.

 

कन्या :–आज तुमच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे. कौटुंबिक वादाच्या विषयात आपलेच म्हणणे खरे करण्याचा अट्टाहास करू नका.

 

तूळ :–मित्रमंडळींच्या सल्ल्याचा विचार करापण त्याच्या आहारी जाऊ नका. संयमाने व प्रयत्नाने अशक्य असलेले काम मार्गी लावून करून दाखवाल.

 

वृश्चिक :–तुमच्या विचारशक्ती र ताण पडणार्‍या टना घडणार आहेत. मागिल अनुभवांचा विचार करून मगच निर्णय घ्या.

 

धनु :–बँकेच्या कर्जप्रकरणाचा पाठपुरावा केल्यास खात्रीने काम पुढे सरकेल. महत्वाच्या कामात ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा लागेल.

 

मकर :–नोकरीत निर्माण झालेल्या अडचणींवर मार्ग काढताना तडजोड करावी लागेल. सेवत:चा अहंपणा जपण्यासाठी इतरांची नाराजी ओढवून घ्याल.

 

कुंभ :–व्यवसायातील व्यवहारात आज फारच जागरूक रहावे लागेलअन्यथा आतबट्ट्याचा व्यवहार होईल. मनातील विचारांना मोकळी वाट द्या.

 

मीन :– तुमच्याकडून झालेल्या चुकीबाबत कोणापुढे झुकण्यात कमीपणा मानू नका. कायदेशीर बाबी पूर्ण केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नका.

 

|| शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *