Read in
गुरूवार 07 एप्रिल 2022 चे दैनंदिन राशी भविष्य.
गुरूवार 07 एप्रिल चंद्ररास वृषभ 09.08 पर्यंत व नंतर मिथुन. चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 22.40 पर्यंत व नंतर आर्द्रा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून आजच्या पहाटेच्या वेळेनुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज श्री कार्तिक स्वामींना दवणा वाहणे.
मेष :–व्यवसायाच्या वृद्धीसाठी जाहिरातीसाठी आर्थिक खर्च करण्याची जबाबदारी तुमच्यावर येणार आहे. पूर्वी आलेल्या अनुभवावर कोणतेही अंदाज बाधू नका.
वृषभ :– नोकरदारांना आपल्या पगारातील रक्कम अचानक दानधर्म करण्यासाठी द्यावी लागेल. घरातील वयस्कर मंडळींच्या मतानुसार निर्णय घ्यावा लागेल.
मिथुन :–कुटुंबात नवीन पाहुण्यांचे आगमन होणार असल्याची बातमी मुलीकडून मिळेल. तरूणांना सार्वजनिक कामात भाग घेतल्याने त्यांच्या पेरतिष्ठेत वाढ होईल.
कर्क :–नोकरीत वरीष्ठांसमोर आपले मत व्यक्त करताना पूर्ण विचार करूच करावे लागेल. कुटुंबातील लहान भावंडांच्या आर्थिक गरजेसाठी मदत कराल.
सिंह :– अचानक नात्यातील अडचणीकरीता तुम्हाला प्रवास करावा लागणार आहे. वयस्कर मंडळीना तरूणपणातील मित्रमंडळींबरोबर संपर्काची संधी मिळेल.
कन्या :– कुटुंबात गृहसजावटीचे विचार मोठ्या मुलाकडून ठरवले जातील. व्यावसायिकांना पूर्वीच्या अनुभवाचा फायदा मिळेल. नोकरदारांना सरकारी नियम काटेकोरपणे पाळावेत.
तूळ :–आज मुलांनी कोणत्याही भिशी किंवा गुंतवणूकीच्या भानगडीत पडू नये. कौटुंबिक गरजांसाठी अचानक मोठा खर्च निघेल.
वृश्चिक :–नोकरदारांना वरीष्ठांच्या सल्ल्यानुसार काम करावे लागेल स्वत:च्या मनाने कांहीही करू नये. ज्येष्ठ मंडळीना मानसिक ताण जाणवेल.
धनु :–नोकरदार मंडळीना नोकरीतील नवीन जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे कळेल. तरूणांचे आज मित्रमैत्रिणींबरोबर मतभेद होणार आहेत तरी सांभाळून व्यक्त व्हावे.
मकर :–कुटुंबातील सर्वांनी कुलदेवीच्या दर्शनाला जाण्याचा बेत निश्चित होईल. व्यासयाीकांना नवीव जागेची गरज निर्माण होत असल्याचे जाणवेल.
कुंभ :–घरगुती लहान उद्योजकांनी आत मोठे धाडस करायला हरकत नाही तरी तशी मनाची तयारी करावी. आज भागिदाराबरोबरील बोलणी यशस्वी होतील.
मीन :–संपत्तीच्या बाबतीत तुम्हाला आज खूपच समाधान मिळणार आहे. छानछोकीसाठी व चैनीसाठी आज मोठा खर्च करावा लागेल.
|| शुभं-भवतु ||
ReplyForward
|