Read in
बुधवार 06 एप्रिल 2022 चे दैनंदिन राशी भविष्य.
बुधवार 06 एप्रिल 2022 चे दैनंदिन राशी भविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
बुधवार 06 एप्रिल 2022 चे दैनंदिन राशी भविष्य. बुधवार चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र रोहिणी 19.38 पर्यंत व नंतर मृगशीर्ष आहे. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून आजच्या पहाटेच्या वेळेनुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज श्री विष्णूचा दोलोत्सव आहे.
मेष :-आज प्रत्येक कामात अतिशय धावपळ होणार आहे. मित्रमंडळींच्या मदतीने न्यायालयातील रेंगाळलेल्या कामांना मार्गी लावण्याकरीता चर्चा कराल. विद्यार्थ्यांना आपले छंद जोपासण्याची चांगली संधी मिळणार आहे.
वृषभ :–अतिमहत्त्वाच्या कामातील झालेल्या गडबडीमुळे चांगलाच मनस्ताप होणार आहे. कुटुंबात बहीण भावंडांमधील चर्चेला उधाण येईल. घराचे थांबलेले बांधकाम पुन: सुरू करण्याविषयी चर्चा कराल.
मिथुन:–नोकरीतील कामाच्या दगदगीमुळे आजारी पडणार असल्याची भावना निर्माण होईल. विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतांचा अंदाज घेऊनच पुढील गोष्टी ठरवाव्यात.
कर्क :–घरातील व्यक्तींच्या एकोप्याने नवीन घर घेण्याचे बेत आखले जातील. विद्यार्थी स्वत:च्या प्रयत्नाने अभ्यासातील अवघड भाग समजून घेतील व यश खेचून आणतील.
सिंह :–नोकरीत तुमच्या कर्तृत्वामुळे तुमचा रूबाब वाढेल. कामाचे योग्य नियोजन करून सहकार्यांमधे सुसूत्रता आणाल. नेतृत्व गुण सिद्ध कराल.
कन्या :- लहान बहिणीच्या संसारातील अडचणींसाठी धावून जावे लागेल. घरातील वयस्कर मंडळींसाठी एखाद्या धार्मिक पूजेचे नियोजन कराल. स्वत:हून मदत करून समाधान मिळवाल.
तूळ :– मैदानावरील खेळांची आवड असल्याने अडचणींचा विचार न करता सहभाग घ्याल. नोकरीत बदलीच्या बातम्या कानावर येथील.
वृश्चिक :– महत्वाच्या कामात विघ्न आल्यामुळे कामे वेळेवर होणार नाहीत. अतिउत्साहामुळेही कामात बिघाड निर्माण होईल.
धनु :–परगावी असलेल्या मुलांच्या काळजीने जीव धास्तावणार आहे. कठीण प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी बरेच पैसे खर्च करावे लागतील.
मकर :–नोकरी व्यवसायात अचानक प्रगतीचे मार्ग सापडतील. कुटुंबात जवळच्या नातेवाईकांच्या हस्तक्षेपामुळे संघर्ष निर्माण होईल.
कुंभ :–नोकरीत उद्भवलेल्या कठीण प्रसंगावर मित्रांच्या मदतीने मार्ग काढाल. कुटुंबात मंगलकार्याची बोलणी करण्याकरता नातेवाईकांचे येणे होईल.
मीन :–उत्साहाच्या भरात स्वत:ची मौल्यवान वस्तू दुसर्यांना देऊन टाकाल. तुमच्या मुठभर यशाची बातमी लोकांकडून डोंगराएवढी केली जाईल.
|| शुभं-भवतु ||
ReplyForward
|