Read in
रविवार 03 एप्रिल 2022 ते शनिवार. 09 एप्रिल 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.
रविवार 03 एप्रिल चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 12.36 पर्यंत व नंतर भरणी.
रविवार 03 एप्रिल 2022 ते शनिवार. 09 एप्रिल 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
रविवार 03 एप्रिल चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 12.36 पर्यंत व नंतर भरणी. सोमवार चंद्ररास मेष 21.00 पर्यंत व नंतर वृषभ व चंद्रनक्षत्र भरणी 14. 27 पर्यंत व नंतर कृत्तिका. मंगळवार चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र कृतिका 16.50 पर्यंत व नंतर रोहिणी. बुधवार चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र रोहिणी 19.38 पर्यंत व नंतर मृगशीर्ष. गुरूवार चंद्ररास वृषभ 09.08 पर्यंत व नंतर मिथुन. चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 22.40 पर्यंत व नंतर आर्द्रा. शुक्रवार चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा 25.42 पर्यंत व नंतर पुनर्वसु. शनिवार चंद्ररास मिथुन 21.49 पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु 28.29 पर्यंत व नंतर पुष्य.
रविवार मस्यजयंती. शंकर पार्वतीला दवणा वाहणे. मुस्लिम रमजान महिन्याचा आरंभ.
सोमवार गौरी तृतीया, श्री राम दोलोत्सव, सौभाग्य शयन व्रत, मन्वादी.
मंगळवार विनायक चतुर्थी ( अंगारक योग) गणपतीला दवणा वाहणे.
बुधवार विष्णूचा दोलोत्सव, कल्पादि.
गुरूवार कार्तिक स्वामींना दवणा वाहणे,
शुक्रवार सूर्याला दवणा वाहणे, अशोककलिका प्राशन 25.42 पासून
शनिवार दुर्गाष्टमी, श्री भवानीदेवी उत्पत्ती. अशोककलिका प्राशन 25.23 पर्यंत.
मेष :–कुटुंबातील मोठ्या व अनुभवी व्यक्तींचा सहवास लाभेल. अचानक जवळच्या नातेवाईकांची भेट होईल. तुमच्या महत्वाच्या कौटुंबिक प्रश्नांची मोकळेपणाने चर्चा केल्यास बर्याच गोष्टी मोकळ्या होतील. गायक मंडळीना आपल्या कलेसाठी घरातून चांगले प्रोत्साहन मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी जावयाचे आहे त्यांनी पूर्वी तज्ञांचा सल्ला घेतला असला तरी पुन्हा सल्ला घ्यावा. आर्थिक बाबींचा ताण कमी होईल व बरीच गणितेही सुटतील. वैवाहिक जीवनात मनासारखे सुख व आनंद मिळेल. तरूणांच्या मनातील स्वत:वरचा विश्वास वाढेल व काम करण्यास हुरूप येईल. तुं्हाला सुरेयाची उपासना फलदायी ठरेल तरी तसे व्रत करावे.
वृषभ :– या सप्ताहात तुमच्या आत्मविश्वासात बरीच वाढ झाल्याने सद्ध परिस्थितीतून मार्ग काढण्याकडे मनाचा कल राहील. नोकरीमध्ये सहकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल व मनोबल वाढेल. युनियनचे काम करणारे, किंवा चळवळीत भाग घेणार्या नी इतरांच्या सल्ल्याने वागू नये पण दिलेल्या सल्ल्याचा विचार करावा. स्वत:चे म्हणणे इतरांवर लादू नये. व इतरांच्या कामात हस्तक्षेपही करू नये. कौटुंबिक कामास महत्व देण्याच्या तुमच्या वृत्तीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष कराल. पण असे करू नका. पेंटींग्ज, ड्राँइंग करणार्यांना चांगली संधी मिळेल.
तरूणांना घरापासून दूर जाण्याचे योग आहेत तरी निदान तुमचे आवडते ठिकाण निवडून ठेवा.
मिथुन :–नोकरीतील तुमच्यावर असलेल्या जबाबदारीचे योग्य नियोजन करूनच कामाला सुरूवात करा. सरकारी कामे, न्यायालयातील कामे किंवा बँकांची थटलेली कामे यांनाच या सप्ताहात प्राधान्य दिल्यास कामात गडबड होणार नाही. घर, जागा, बँक खाते येथील नाँमिनेशनबाबतची अपुरी कामे पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. परगावी असलेल्या तरूणांना आपल्या आईवडलांना भेटण्याची फारच ओढ लागेल. घरातील वयस्कर मंडळींसाठी एखाद्या तिर्थयात्रेच्या ठिकाणी जाण्याचा बेत आखाल नोकरीत नव्याने रुजू झालेल्यांना एखाद्या प्रशिक्षणास पाठवले जाण्याची शक्यता आहे. मित्रमंडळींबरोबर बोलताना कठोर शब्द टाळावे म्हणजे वाद निर्माण होणार नाहीत.
कर्क :– नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना ओळखीच्या माध्यामातून तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील नोकरीची माहिती मिळेल. प्रत्येक कामात डोळसपणाने काम केल्यास कामात गडबड न होता काम केल्याही समाधान मिळेल. या सप्ताहात गुंतवणूक करण्याकडे विशेष लक्ष दिल्यास चांगले लाभ होतील. प्रेमसंबंध एकमेकांचे विचार चांगले जुळतील त्यामुळे पुढील विचार करण्यास हरकत नाही. संपत्तीसाठी प्रयत्न करणार्यांनी डाँक्टरांची सल्ला मानावा पण स्वत:चे विचार पक्के ठरवावे, धरसोड वृत्तीने विचार करू नये. गरजवंताला तुमच्याकडून मोठी मदत दिली जाईल.
सिंह :– कुटुंबातील एकोपा जपण्याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावे लागेल. मित्रमंडळींच्या संगतीमुळे या सप्ताहात फार मोठा खर्च करावा लागेल. व्यावसायिकांनी बँकेकडे केलेल्या मागणीबाबतच्या निर्माण झालेल्या प्रश्नाबाबत योग्य तो खुलासा द्यावा लागेल. न्यायालयातील रेंगाळलेल्या कामाबाबतचे तुमच्या प्रयत्नांचा उपयोग होणार नाही. कोणताही वशिला किंवा ओळख लावण्याचा प्रयत्न करू नका. नोकरीत कामाची जबाबदारी स्विकारताना अविचाराने आश्वासन देऊ नका प्रथम आपल्या क्षमतांचा विचार करणे फायद्याचे राहिल.
कन्या :–नोकरीत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा व बुद्धीचा प्रभाव पाडाल व अचानक तुमचे महत्व वाढेल. तुमच्या मनातील सर्वच गोष्टींची जाहीर वाच्यता करू नका. संयमाने व प्रयत्नाने अशक्य असलेले काम करून दाखवाल. राजकीय क्षेत्रातील मंडळीना प्रतिस्पर्ध्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागेल. घरातील वयस्कर मंडळींसाठी एखाद्या गेट टुगेदरचे आयोजन करण्याचे ठरेल. स्वकर्तृत्वावरच्या विश्वासात झालेली वाढ तुमची प्रतिष्ठा वाढवेल. कुटुंबातील लहान भावंडांबरोबर मिळते जुळते धोरण ठेवल्यास बर्याच गोष्टी सुसह्य होतील. घरात अचानक नवीन महागड्या वस्तूची खरेदी कराल.
तूळ :–तुमच्या क्रांतिकारक विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी वरिष्ठांची मदत मिळेल. सामाजिक क्षेत्रातील तुमच्या कार्याला लोकांकडून विशेष प्रतिसाद मिळेल. नोकरीतील तुमच्यावर असलेली जबाबदारी पार पाडताना तुम्हाला तुमच्या पूर्ण क्षमतांचा वापर करावा लागेल. व्यावसायिकांनी बँकेकडे मागितलेले लोन मंजूर होणार असल्याचे कळवले जाईल. पतीपत्नीच्या व्यवसायातील अडचणींवर चांगला तोडगा मिळेल. आईच्या नावावर असलेल्या व्यवसायाच्याबाबतची जबाबदारी तुम्हाला स्विकारावे लागणार आहे. पूर्वी प्रवासात झालेल्या ओळखीची पुनर्भेट होईल.
वृश्चिक :–महिलांनी प्रथम आपल्या क्षमतांचा विचार करूनच कामाचा भार स्विकारावा. कोणत्याही कामात घाई करू नये. महिलांना हा सप्ताह लाभदायक राहील. मानसिक समाधान मिळेल. तरूण वर्ग परिस्थितीवर आलेल्या प्रसंगावर मात करतील. ज्यांना प्रवास करावा लागणार आहे त्यांना प्रवासात अतिशय आनंद निर्माण होईल. कुटुंबात नातेवाईक आल्यामुळे पंचपक्वान्नांची रेलचेल होईल. बहिणींना भावाकडून मौल्यवान भेट मिळेल. वयस्कर मंडळीना मागिल अनुभवांची शेखी मिरवण्याची हौस येईल. सामाजिक कार्यातील व्यक्तींना सल्लागार म्हणून नेमणूक होईल.
धनु :–तरूणांना नोकरी निमीत्ताने प्रवास करावा लागेल. प्रवासात स्वत:ची अडचण सोसून दुसर्यांना मदत कराल. विद्यार्थ्यांना आपले छंद जोपासण्यासाठी नवीनच संधी मिळेल. व आवडता विषय शिकण्यासाठी घरातून आर्थिक मदत मिळेल. या सप्ताहाचे वापर तुम्हाला तुमच्या कामाचे, अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी करता येणार आहे. वयस्कर मंडळींच्या सल्ल्याने केलेली खरेदी फायदेशीर ठरेल. शिक्षक मंडळीना नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील पण पूर्ण विचारानेच पाऊल उचलावे लागेल. शेजारी पाहणार्यांबरोबर तात्विक मतभेद होतील ते प्रतिष्ठेचे न करता सहजपणे विचार केल्यास संबंध बिघडणार माहीत.
मकर :–व्यवसायासाठी भाड्याची जागा पहात असाल तर या सप्ताहात तुमच्या अपेक्षेप्रमाणे तशी जागा कळेल. विवाहाच्या प्रतिक्षेत असलेल्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे स्थळ कळेल. तरी विचार करावा. व्यवसायातील बँकेकडे मागितलेले कर्ज मंजूर झाल्याने कामे मार्गी लागतील. तरूणांना चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. भरपूर खर्च करतील. महिलांना मानसिक स्वास्थ्य लाभणार्या घटना घडतील. वयस्कर मंडळीना आपल्या नातवंडाच मरण्याची, राहण्याची संधी मिळणार आहे. तरूणांना अति कामाच्या ताणामुळे आरामाची गरज भासेल.
कुंभ :–कौटुंबिक पातळीवर या सप्ताहात भरपूर सुख समाधान मिळणार आहे. कुटुंबात जवळच्या नातेवाईकांचे येणे होणार असल्याने घरात कामाची घाईगर्दीत राहील. तरूणांच्या विवाहाच्या प्रश्नावरअतिशय उलटसुलट चर्चा होईल. तरूणांना आपले विवाहाबाबतचे विचार सर्वांसमोर व्यक्त करावेत. येणार्या सुट्टीत प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी ट्रीपला जाण्याचे ठरेल व त्याचे नियोजन करण्याची जबाबदारी तुमच्यावर येईल. परदेशी असलेल्या संततीचे मायदेशी येण्याचे ठरेल. नोकरदार वर्गास अचानक गुप्तशत्रूंपासून त्रास संभवतो. तरी सावध रहावे लागेल. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्यांनी प्रथम तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
मीन :–या सप्ताहात व्यावसायिकांनी नवीन गुंतवणूक करणे टाळावे. शेअर बाजारातील जुन्या गुंतवणूकीवर चांगला लाभ संभवतो. नोकरदार वर्गास अतिश्रमामुळे उत्साह राहणार नाही. महिलांना अतिश्रमामुळे आरामाची गरज भासेल.तरूणांना नवीन ओळखीतून मैत्री होईल. स्वेच्छा निवृत्तीच्या मंडळीनी पुनर्विचार करण्याची वेळ आहे हे लक्षांत घ्यावे. नोकरीतील तुमच्या कामाचा परफाँरेमन्स उत्कृष्ट राहील्याने वरीष्ठ खूष होतील. राजकीय क्षेत्रातील मंडळीना एखादा महत्वाचा निर्णय घेणे अवघड जाईल तरी त्यानी पुन्हा विचार करावा व तज्ञांचा सल्लाही घ्यावा. व्यावसायिकांनी माल खरेदी करताना मागिल अनुभवावर विचार करावा.
|| शुभं-भवतु ||