Read in
शनिवार 02 एप्रिल 2022 चे दैनिक राशिभविष्य.
शनिवार 02 एप्रिल चंद्ररास मिन 11.20 पर्यंत व नंतर मेष.
शनिवार 02 एप्रिल 2022 चे दैनिक राशिभविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
शनिवार 02 एप्रिल चंद्ररास मिन 11.20 पर्यंत व नंतर मेष. चंद्र नक्षत्र रेवती 11.20 पर्यंत व नन्तर अश्विनी वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 5.30 च्या कुंडली नुसार कृष्ण मूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
आज श्री शालिवाहन शके 1944 ला प्रारंभ होत असून चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदा असून चैत्र महिन्याचा प्रारंभ होत आहे असल्याने गुढी पाडव्याचा दिवस आहे. आज प्रत्येकाच्या घरापुढे गुढी उभी करण्याचा प्रघात आहे. पंचांगातील श्री गणेशाचे पूजन करून पंचांगाचे वाचन केले जाते. तसेच आज चैत्री नवरात्राला आरंभ होत आहे.
मेष :- आजचा गुढीपाडवा सकाळी 11.20 पासुन तुमच्या राशीत असून ज्या महत्त्वाच्या गोष्टी करावयाच्या आहेत त्याची सुरुवात करायला हरकत नाही. स्वकर्तुत्वाची कामे खात्रीने यशस्वी होतील.
वृषभ:– आजचा गुढीपाडवा हा तुमच्या लाभस्थानात असल्याने ज्या गोष्टीतून लाभ व्हावा अशी अपेक्षा आहे त्याच गोष्टी आज करा. त्यात नवीन औषध घेणे, डॉक्टरांची भेट घेणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे राहील.
मिथुन:– कामधंद्याच्या या क्षेत्रात ज्या नवीन योजना राबवायच्या आहेत त्यांची आज सुरुवात करा. ज्या क्षेत्रात आपला भाग्योदय होईल याची खात्री आहे त्या क्षेत्राचा विचार करा. कोणत्याही कामात वडिलांची मदत घेतल्यास खात्रीने योग्य मार्ग सापडेल.
कर्क:– वडिलांच्या मदतीशिवाय कोणतीही तुमच्या घराण्यातील पद्धती बाबतचे कामे करू नका. पूर्वजानी घालून दिलेले रितीरिवाज कटाक्षाने पाळा.
सिंह :–आजच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत मोठा किंवा लांबचा प्रवास करू नका. वडिलांना बरोबर घेऊन कोणतीही रिस्क घेऊ नका. पुरुष वर्गास सासुरवाडीकडून एखाद्या भेटवस्तूचा लाभ संभवतो.
कन्या :–व्यवसायातील अडचणींवर सापडलेला उपाय करण्याचा आज ठाम विचार करा. नवीन आखलेल्या योजना कामगार वर्गास समजावून सांगा. तुमच्या स्वतःच्या चुकीमुळे कामात कोणतीही अडचण निर्माण होऊ देऊ नका.
तूळ :–आजचा दिवस अतिशय धावपळीचा जाणार आहे. आजचा मुहूर्त विशेषत: तुमच्या नवीन व्यावसायिक कामास लाभदायक राहील. नोकरीतील अडकलेल्या कामांना मार्गी लावाल.
वृश्र्चिक :–पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून अपेक्षित फायदा होणार आहे. आजचा गुढीपाडवा तुमच्या गुतवणूकीबाबतचे विचार करायला लावणारा आहे.
धनु :–परदेशी कामाबाबत नव्याने कांही विघ्न निर्माण होईल. आजच्या गुढीपाडव्याला तुम्ही मातृसुखात न्हाऊन निघणार आहात. आईच्या प्रेमाने भारावून जाल.
मकर :–दळणवळण क्षेत्रातील उद्योजकांनी नवीन योजनांचा विचार करावा. लेखकांनी आजच्या मुहूर्तावर नवीन लेखन केल्यास त्याची विशेष जाहिरात न करताही प्रसिद्धी मिळेल.
कुंभ :–नोकरीतील जूने येणे मिळण्याचे संकेत मिळतील. कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने हा गुढीपाडवा तुम्हाला आश्चर्याचे गोड धक्के देणार आहे.
मीन :–मनातील कल्पनाना प्रत्यक्षात उतरवण्यास हाच मुहूर्त योग्य असल्याची खात्री पटेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीसाठी त्यांच्या आवडीच्या वस्त्रांची खरेदी कराल.
|| शुभं-भवतु ||