Read in
शुक्रवार 01 एप्रिल 2022 चे दैनिक राशीभविष्य.
शुक्रवार 01 एप्रिल चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 10.39 पर्यंत व नंतर रेवती.
शुक्रवार 01 एप्रिल 2022 चे दैनिक राशीभविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
शुक्रवार 01 एप्रिल चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 10.39 पर्यंत व नंतर रेवती. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–नोकरदारांना नोकरी सोडावयाची असल्यास जोडीदाराच्या सल्ल्याचाही विचार करावा. परगावी असलेल्या संततीचा सहवास आनंद देईल.
वृषभ :–कौटुंबिक समस्या सामंजस्याने सोडवल्या जातील. राजकीय मंडळीना तुमच्याकडून. िळालेले सहकार्य मोलाचे राहील.
मिथुन :–आज तुमच्या मनात सुरू असलेल्या विचारांना मोकळीक दिल्यास मानसिक ताण कमी होईल. महिलांना सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
कर्क :– पायाला दुखापत होणार असल्याने पायांची विशेष काळजी घ्या. संततीच्या काळजी मुळे मानसिक ताणतणाव वाढेल.
सिंह :–कुटुंबात कुलदेवतेच्या पुजेबाबतचे विचार पक्के ठरतील. लेखी सुना नातवंडांबरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा होतील.
कन्या :– नातेवाईकांना भेटण्यास जाण्यासाठी लहानसा प्रवास करावा लागेल. सरकारी क्षेत्रातील मंडळीना त्यांच्या हातातील अधिकारांवर बंधने आणणारा प्रसंग घडेल.
तूळ :–कुटुंबात जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबात लहान मुलांच्या हट्टापुढे तुमचे कांहीही चालणार नाही.
वृश्र्चिक :–नात्यातील मुलांच्या शुभकार्यासाठी आर्थिक व इतर प्रकारे मदत करावी लागणार आहे. आज तुमच्या माणसाप्रमाणे गोष्टी करता येणार आहेत.
धनु :–व्यवसायातून वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींची ओळख होणार आहे. आज चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल.
मकर :–कोणतीही खरेदी करताना वस्तूची प्रत तपासून घ्यावी अन्यथा आज तुमची फसगत होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या विचाराने घरातील महत्वाच्या प्रश्नावर चर्चा करून निर्णय घ्या.
कुंभ :–व्यवसायातील अडचणींवर उपाय काढण्यासाठी कुटुंबात एकत्र बसून चर्चा करा. अपत्यप्राप्तीच्या इच्छूकांना गोड बातमी लवकरच देता येणार असल्याचे कळेल.
मीन :–नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळण्याकरीता मुद्धामहून प्रयत्न करावे लागतील. आज मित्रमंडळींच्या संगतीने तुमच्या खिशावर मोठा खर्च पडणार आहे.
|| शुभं-भवतु ||