Read in
बुधवार 30 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.
बुधवार 30 मार्च चंद्ररास कुंभ 28.32 पर्यंत व नंतर मीन. चंद्रनक्षत्र शततारका 10.48 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा.
बुधवार 30 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
बुधवार 30 मार्च चंद्ररास कुंभ 28.32 पर्यंत व नंतर मीन. चंद्रनक्षत्र शततारका 10.48 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–सामाजिक व्यवहारात कांही प्रमाणात नाराजी निर्माण होईल. स्वत:च्या चुकीमुळे आर्थिक नुकसान संभवते.
वृषभ :–ज्येष्ठ नातेवाईकांकडून तुमच्या व्यावहारिक अडचणींवर उपाय सापडेल. नोकरीत सेवाज्येष्ठतेनुसार तुमच्यावर लवकरच जबाबदारी सोपवण्यात येणार आहे तरी मानसिक तयारी ठेवा.
मिथुन :–मित्रमंडळींबरोबरच्या सहवासात आज व्यसनाकडे वळाल. स्वत:चा उद्धोग सुरू करण्यासाठीची धडपड कामाशी येईल.
कर्क :–प्रवासातील अडचणींमुळे त्रासून जाल. अचानक नातेवाईकांबरोबरच्या गप्पानंतर एखादी जबाबदारी स्विकारावी लागेल.
सिंह :–साथीच्या आजाराचा त्रास होऊन आजारी पडाल. वैवाहिक जीवनातील अडचणी व संघर्ष सोडवण्यासाठी फक्तनातेवाईकांचीच मदत घ्या.
कन्या :–आवडत्या मित्राची बर्याच दिनसानंतर भेट झाल्यामुळे दिवस आनंदात जाईल. नातेसंबंधात व्यावसायिक दृष्टीकोनातून विचार केल्याने संबंध कांही प्रमाणात बिघडतील.
तूळ :– मित्राच्या व्यवसायातील अडचणींसाठी आर्थिक मदत करावी लागेल. नोकरीत सहकारी वर्गाकडून अनपेक्षितपणे चांगले सहकार्य मिळेल.
वृश्र्चिक :-प्राँपर्टीच्या व्यवहारात तुमच्या हस्तक्षेपामुळे तडजोड होईल. विवाहिताना नवीन घर घेण्याची संधी मिळेल.
धनु:–कुटुंबातील एकमेकांबरोबर चे वाद मिटवण्याच्या बाबतीत तुमच्याकडून पुढाकार घेतला जाईल. नोकरीत न विचारलेल्या प्रश्नात सहभाग घेऊ नये.
मकर :–सामाजिक व्यवहारात अचानक गैरसमजाच्या वार्यामुळे मानसिक ताण येईल.नोकरीत वरिष्ठांच्या दबावाला बळी पडाल.
कुंभ :–जवळच्या व प्रिय व्यक्तीकडून मन दुखावले जाईल. पाहुण्यांसाठी मोठा खर्च करावा लागेल.
मीन :–नोकरीत परदेशी जाण्यासाठी विचारले जाईल. मित्रांच्या मदतीने विद्यार्थ्यांना अवघड वाटणार्या विषयातील अडचणी कळतील.
|| शुभं-भवतु ||