Read in
मंगळवार 29 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.
मंगळवार 29 मार्च चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र धनिष्ठा 11.27 पर्यंत व नंतर शततारका.
मंगळवार 29 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मंगळवार 29 मार्च चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र धनिष्ठा 11.27 पर्यंत व नंतर शततारका. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज मंगळवारी प्रदोष आला आहे.
मेष :–तुमच्या मनात असलेल्या विचारांचे लेखन केल्यास ते इतरांना उपयोगी पडेल. साहित्याच्या क्षेत्रातील मंडळीना त्यांच्या लेखनाबद्दल वाचकांकडून चांगली पसंती मिळेल.
वृषभ :–आईच्या नावावर केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. तरूणांना एखादे धाडस करण्याच्या वृत्तीत वाढ होईल.
मिथुन. :–शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचार्यांना नवीन काँन्ट्रक्ट करण्याचे विचारले जाणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना अपेक्षित नोकर्यांची माहिती मिळेल.
कर्क :–विषारी प्राण्याच्या चावण्याचा धोका आहे. लहान मुलांना पडण्या धडपडण्यापासून सांडपाण्याच्या ठिकाणा पासून पडण्याचा धोका आहे.
सिंह :–सरकारी नियमांचे उल्लंघन होऊ देऊ नका एखादा दंड भरावा लागेल. आहारतज्ञांनांकडून महत्वाच्या सूचना मिळतील.
कन्या :–स्वत:च्या बाबतीत राग आळसामुळे चिडचिड निर्माण होईल. नोकरदार वर्गाच्या समोर आलेला घराचा प्रश्न सहकार्यांच्या मदतीने मार्गी लावता येणार आहे.
तूळ :–व्यावसायिकांनी सध्या आर्थिक गुंतवणूक टाळावी हे उत्तम. खाजगी नोकरीतील कर्मचार्यांना वरीष्ठांकडून त्यांच्या कामाची प्रशंसा केली जाईल.
वृश्र्चिक :–व्यवसायात अपेक्षित यश न मिळणार्याना आवश्यक त्या प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल. संततीच्या मनातील विचारांचा अंदाज लागणार नाही.
धनु :–नोकरीच्या ठिकाणी कांही ठराविक कालावधी करीता उच्च पदावर नेमणूक करण्याबाबतच्या बातम्या कळतील. कौटुंबिक खर्चामध्ये बरीच वाढ झाल्याने मानसिक ताण वाढेल.
मकर :–गरजेपेक्षा चैनीच्या खरेदीवर अचानक मोठा खर्च कराल. विवाहित महिलांना आर्थिक ताळमेळ घालताना अवघड जाणार आहे.
कुंभ :–व्यावसायिकांना नवीन भाड्याच्या जागेची माहिती मिळेल. राजकारणातील मंडळीना प्रतिस्पर्ध्यांकडून अपमानित व्हावे लागणार आहे तरी सावध रहावे.
मीन :–व्यवसायातील भांडवलाच्या गरजेसाठी भागिदार नव्याने करार करण्यास तयार होईल. फक्त तुमचे नियोजन परफेक्ट असण्याची गरज आहे.
|| शुभं-भवतु ||