Read in
सोमवार 22 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.
सोमवार 22 मार्च चंद्ररास मकर 23.54 पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र श्रवण 12.24 पर्यंत व नंतर धनिष्ठा.
सोमवार 22 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
सोमवार 22 मार्च चंद्ररास मकर 23.54 पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र श्रवण 12.24 पर्यंत व नंतर धनिष्ठा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज पापमोचिनी एकादशी आहे
मेष :–नोकरीत काम करताना बसण्याच्या जागेत बदल होणार आहे तरी तुमच्या मनासारखी जागा आधीच शोधुन ठेवा. महत्वाच्या वस्तूची चोरी होईल किंवा हरवेल तरी काळजी पूर्वक सांभाळण्याचा प्रयत्न करा.
वृषभ :–नोकरीतील होणार्या त्रासाला स्वत:बरोबर जुळवून घेतल्यास डोकेदुखी व नाराजी कमी होईल. धर्मदाय संस्थेमधील कर्मचार्यांना नवीन वादाला तोंड द्यावे लागेल.
मिथुन :–संशोधन कार्यातील असिस्टंट मंडळींच्या कार्यात अचानक व्यत्यय येईल. आज कोणावरही विसंबून न राहता स्वत:च्या हिमतीवर कार्य करा.
कर्क :–तुमचे ज्यांच्याबरोबर कायदेशीर वाद आहेत त्यांचीच गाठ पडेल तरी त्यावेळी कसे वागायचे ते ठरवून ठेवा. आंतरजातीय विवाहाच्या प्रकरणात मदत कराल.
सिंह :–कनिष्ठ वर्ग किंवा नोकर वर्गाचा आपल्याशिवाय कांहीही होत नाही या विचाराने, भावनेने घमेंडीपणा वाढेल. राजकीय मंडळीना शत्रूवर मात करता येईल खां याबाबत खात्री वाटणार नाही.
कन्या :–सुगंधी वस्तूंच्या व्यवसायात अचानक मोठी आँर्डर मिळेल. शेअर बाजारातून चांगला लाभ होईल. कला क्षेत्रात काम करण्याची संधी चालून येईल.
तूळ :–वाहन भाड्याने देण्याचा विचार पक्का ठरला असल्यास पुढील नियोजन करण्यास हरकत नाही. प्रेम प्रकरणाबाबत अतिशय जागरूक रहावे लागेल अन्यथा संबंध बिघडण्याचा धोका आहे.
वृश्र्चिक :–आँन लाईन काम करणार्या मंडळीना इंटरनेट डिस्कनेक्ट होण्याचा त्रास होईल. पर्यायी व्यवस्था ठेवा. श्रवणयंत्र वापरणार्यांना त्यातील टेक्निक समजून घ्यावे लागेल.
धनु :–टाँन्सिल्सचा त्रास होणार्यांनी योग्य वेळेत डाक्टरी उपाय करावेत. आजचा दिवस तुमच्यासाठी कौटुंबिक आनंदाचा व सुखाचा आहे.
मकर :– आज तुमच्या मनाचा कल तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्याकडे झुकेल व ते साध्यही होईल. नोकरीत तुमच्या काम करण्याच्या उत्तम पद्धतीमुळे इतरांवर छाप पाडाल.
कुंभ :–विनाकारण भिती व चिंता वाढवणार्या घटना न घडण्याबाबत जागरूक रहावे लागेल. लहानाना पाण्याच्या ठिकाणापासून तर वयस्करांनी ओल्या फरशीवरून चालताना सुद्धा काळजी घ्यावी.
मीन :–ज्या नवनवीन गोष्टींची खरेदी करावयाचे बरेच दिवसापासून मनात आहे त्यांची खरेदी सहजपणे करता येणार आहे. फँक्टरी, वर्कशाँप मधील कर्मचार्यांच्या होणार्या गैरसोयी कडे लक्ष द्यावे लागेल.
|| शुभं-भवतु ||