Read in
रविवार 27 मार्च 2022 ते शनिवार 02 एप्रिल 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.
रविवार 27 चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा षाढा 13.31 पर्यंत व नंतर श्रवण.
रविवार 27 मार्च 2022 ते शनिवार 02 एप्रिल 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
रविवार 27 चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा षाढा 13.31 पर्यंत व नंतर श्रवण. सोमवार 28 चंद्ररास मकर 23.54 पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र श्रवण 12.24 पर्यंत व नंतर धनिष्ठा. मंगळवार 29 चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र धनिष्ठा 11.27 पर्यंत व नंतर शततारका. बुधवार 30 चंद्ररास कुंभ 28.32 पर्यंत व नंतर मीन. चंद्रनक्षत्र शततारका 10.48 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा. गुरूवार 31 चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा 10. 30 पर्यंत व नंतर उत्तरा भाद्रपदा. शुक्रवार 01 एप्रिल चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 10.39 पर्यंत व नंतर रेवती. शनिवार 02 एप्रिल चंद्ररास मीन 11.20 पर्यंत व नंतर मेष. चंद्र नक्षत्र रेवती 11.20 पर्यंत व नंतर अश्र्विनी.
सोमवार 28, पापमोचिनी एकादशी.
मंगळवार 29, भौमप्रदोष.
बुधवार 30, शिवरात्री
गुरूवार 31, दर्श अमावास्या दुपारी 12.22 पासून सुरू.
शुक्रवार 01 एप्रिल अमावास्या सकाळी 11.53 पर्यंत. शनिवार 02 एप्रिल गुढीपाडवा. श्री शालिवाहन शके 1944 प्रारंभ.
या वर्षाचे नाव श्री शालिवाहन शके शुभकृतनाम संवत्सर.
सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आजपासून सुरू होणारे हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे व आरोग्याचे जावो.
मेष :–तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असाल त्या क्षेत्रातील कामातून तुम्हाला अतिशय आनंद मिळेल. बरोबरचे सहकारी, वरिष्ठ सर्वांचेच चांगले सहकार्य मिळेल. पेडींग राहिलेल्या कामाविषयी वरीष्ठांबरोबर चर्चा केल्यास त्यातील अडचणींवर उपाय सुचवला जाईल व कामही यशस्वी होण्यास मदत होईल. पतीपत्नीच्या एकविचाराने व्यवसायातील नवीन योजना सुरू करण्यास हा आठवडा किंवा 1 तारखेचा पाडव्याचा दिवस तुम्हाला लाभदायक राहील. विशेषत: मेष राशीतील अश्र्विनी नक्षत्राच्या मंडळीनी आपल्या नवीन योजनांचा शुभारंभ पाडव्याच्या दिवशी दुपारी 11.20 नंतर करावा.
वृषभ :–वयस्कर मंडळीनी आपल्या पायांची काळजी घ्यावी. पाण्यावरून पाय घसरून पडण्याचा धोका आहे तसेच व्यायाम, जीम करणार्यांनी मोठे ओझे उचलण्याचा प्रयत्न करू नये. घरातील देव्हार्याच्या प्रकारात बदल करावयाचा असल्यास पाडव्याचा दिवस तुम्हाला देव्हारा बदलण्यास चांगला दिवस आहे. नोकरी सोडण्याचा विचार करत असाल तर या सप्ताहात तरी अजिबात विचार करू नका. घरगुती व्यवसायाच्या बाबतीत नवनवीन प्रयोग करण्याकरीता खूपच चांगला सप्ताह आहे. सप्ताहाचा प्रत्येक दिवस तुम्हाला लाभदायक आहे. पाडव्या दिवशी दुपारी 11.20 नंतर महत्वाचे घाम करावे.
मिथुन :–न्यायालयातील रेंगाळलेल्या कामाच्या गोष्टीत मित्राची मदत मिळेल. पण वकिलबुवाना विचारल्याशिवाय कांहीही कारभार करू नका. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला महत्व दिले जाईल. तुमच्या सल्ल्याचा विचार केला जाणार आहे. सासुरवाडीकडील अडचणींसाठी तुम्हाला बोलावले जाईल किंवा तुमचा सल्ला विचारला जाईल. वयस्कर मंडळीना पायाचे , मांड्यांचे स्नायु दुखण्याचा त्रास होईल. संशोधन क्षेत्रातील व्यक्तीना 27, 28 रोजी महत्वाच्या, जबाबदारीच्या कामात सामावून घेतले जाईल. बर्याच दिवसापासून भेट न झालेल्या मित्रमंडळींची भेट होईल.
कर्क :–तरूण मंडळीना आपले विचार वयस्कर मंडळीना पटवून, समजावून सांगण्यात चांगले यश येईल. लहान मुलांच्या वर्गाला शिकवणार्या शिक्षकांना नवीन प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे त्यासाठीची चौकशी करा. नोकरीतील रखडलेल्या कामाना पुन: नव्याने सुरूवात करायला 1 एप्रिलचा दिवस चांगला आहे. जेथे तुम्हाला वडीलांच्या सल्ल्याची गरज आहे तेथे त्यांच्या सल्ल्याने वागल्यास लाभदायक राहील. वयस्कर मंडळीना तिर्थ क्षेत्री जाण्याची इच्छा असल्यास त्यासाठी तुम्हाला सोबत मिळणार आहे.
सिंह :–हा सप्ताह तुम्हाला व्यवसाय, नोकरी तुमचे इतर राजकीय क्षेत्र असले तरी त्या खूपच लाभदायक राहणार आहे. तुमच्या हातातील रेंगाळलेल्या कामाना सुरूवात करायची असल्यास तुम्ही या सप्ताहातील फक्त 29, 30 या तारखा सोडून करा नक्कीच कामे मार्गी लागतील. सरकारी नोकरदारानी अधिकारी वर्गाने 29,30 तारखांना कोणाच्याही कोणत्याही आर्थिक व्यवहारात पडू नये. मानहानी होण्याचा धोका आहे. राजकीय क्षेत्रातील मंडळीनी आपली प्रतिष्ठा क ीहोईल अशा कोणत्याही कामात सहभागी होऊ नये. वडीलांच्या आशिर्वादाने अचानक अडचणीत ही कोणाची तरी मदत होईल.
कन्या :–हा सप्ताह तुम्हाला गुंतवणूकीसाठी चांगला आहे. व्यवसायात किंवा शेअर मार्केटमधील खरेदी विक्रीचे व्यवहार करावयास चांगला आहे. व्यवसायात भागिदाराचेही चांगले सहकार्य मिळेल. पतीपत्नीमधील वाद मात्र कांही प्रमाणात वाढणार आहेत. पुरूष मंडळीनी पत्नीच्या माहेरील गोष्टींबाबत बोलणे टाळल्यास वादाला संधी मिळणार नाही. 01 तारखेला कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका. इंजिनीयर मंडळीना नवीन नोकरीची चांगली संधी मिळेल. पुरूषांनी सासुरवाडीला गेल्यावर सांभाळून बोलावे.
तूळ :–सर्व कुटुंबाची जबाबदारी घेताना स्वत:कडे कमी लक्ष दिले जाईल. कुटुंबातील वारसा हक्काने येणार्या गोष्टींबाबत कांही प्रमाणात वाद निर्माण होतील. लहान मुलांच्या बाबतीत स्कीनच्या तक्रारी वाढतील. नोकरीतील कामातील अडचणीच्या वेळी सहकार्यांची चांगली मदत होईल. बँकेतील आर्थिक व्यवहार करताना अतिशय जागरूक रहावे लागेल. उधार, उसनवारी बाबत त्रास व वाद निर्माण होतील. दैनंदिन व्यवहारातील विश्वासू नोकरांकडून प्रामाणिकपणा दिसून येईल. आईच्या बाबतीतील प्रकृतीबाबतचे तुमचे अंदाज खरे ठरतील.
वृश्र्चिक :–व्यावसायिकांना व्यवसायाच्या जागेच्या बाबतीतील अडचण दूर करण्याकरीता ठोस निर्णय घ्यावा लागेल. दुसर्यांच्या आर्थिक अडचणी सोडवताना तुम्ही स्वत: आर्थिक अडचणीत येणार आहात तरी व्यवहार जागरूकतेने करा. या सप्ताहात
मुलांच्या मनासारखे न वागल्यामुळे मुले कटकट करतील व त्यांची
नाराजी अंगावर ओढवून घ्याल. मानसिक ताणतणावामुळे प्रकृती बिघडण्याचा धोका आहे. अडकलेली कामे पूर्ण होण्यासाठी तुम्हाला स्वत:हून इतरांकडे मदत मागावी लागेल. वयोवृद्ध मंडळीना अचानक डोकेदुखीचा व पित्ताचा त्रास होईल. तसेच उलट्या जुलाबाचा ही त्रास संभवतो.
धनु :–नोकरीच्या शोधात असलेल्यांना स्वप्रयत्नाने नोकरीची संधी मिळेल. मात्र ही नोकरी घरापासून दूर असण्याची जास्त शक्यता आहे. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या विचाराने घरातील महत्वाचे प्रश्र्न सोडवता येतील व त्यात तुमचा मोठा सहभाग राहील. आईच्या पायाचे आँपरेशन करण्याच्या विचारात अनेकवेळा बदल होईल. परगावी असलेल्या मुलांना त्यांच्या हातातील कामात अडचणी येत असल्याचे जाणवेल. तुमच्या मनातील आनंदाच्या गोष्टी तुम्हाला इतरांना कधी सांगतो याची घाई होईल. प्रत्येक कामातील सत्यता पडताळून पाहण्याच्या तुमच्या प्रवृत्तीचे इतरांकडून हसे होईल.
मकर :–व्यवसायात तुम्ही पूर्वीच आखलेल्या नवीन योजना अंमलात आणता येणार आहेत. नाना शंका कुशंका काढून त्यात बदल करू नका. लहान मुलांचे डोळे दुखण्याची तक्रार वाढेल. व्यवसायातील त्रुटीवर तोडगा काढण्यासाठी एखाद्या तज्ञांची मदत मिळेल. नातेवाईक, ज्येष्ठ मित्र यांच्या मदतीने नवीन प्रोजेक्टमधील काम सुरू करण्याची संधी मिळेल. पुरूषांना आपल्या आवडत्या छंदाबाबत अभ्यास वाढवण्याची इच्छा होईल. कौटुंबिक वादविवाद टाळल्यास कुटुंबातील मतभेद कमी होतील. स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज भासेल तरी जी संधी मिळेल ती सोडू नये.
कुंभ :–शारिरीक अस्वास्थ्यामूळे मानसिक ताण वाढेल. आवश्यक तेथे डाँक्टरांचा सल्ला घ्यावा हलगर्जीपणा करू नये. व्यवसायात कष्टाचे प्रमाण खूपच वाढणार आहे. विद्यार्थ्यांच्या अंगातील आळशीपणात वाढ होईल. पुजारी व भिक्षुक मंडळीना या सप्ताहात आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीतील बदलाकरीता प्रयत्न करता असाल तर हा सप्ताह जराही लाभदायक राहणार नाही. कोणत्याही परिस्थितीत लाच देण्याघेण्याच्या व्यवहारापासून दूर रहा. न्यायालयातील रखडलेले काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करताना कोणत्याही ओळखीचा उपयोग केल्यास नवीन अडचणी येण्याचा धोका आहे.
मीन :–हाँस्पिटल संबंधीत असलेल्या व्यवसायातील उधारी या सप्ताहात वसूल होऊ लागेल. कोणत्याही व्यवहारात कमिशन, दलाली यांना थारा देऊ नका. कुटुंबातील लहान मुलांच्या प्रकृतीबाबत काळजी निर्माण करणार्या गोष्टी घडतील. संपूर्ण सप्ताहात कोठेही बाहेरच्या प्रवासाचे बेत ठरवू नका प्रवासात अतिशय त्रास तर होईलच पण त्याचबरोबर नुकसान होण्याचाही धोका आहे. घरगुती व्यवसायातील अडचणींवर मात करून व्यवसाय वृद्धीच्या योजना सुरू करण्याची संधी मिळेल. अतिउत्साही मित्रमैत्रिणींच्या नादाने तुमच्या वैयक्तिक रेंगाळलेल्या कामांना गती येईल. फक्त धरसोड वृत्तीने वागू नका.
|| शुभं-भवतु ||