daily horoscope

शनिवार 26 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.

Read in

शनिवार 26 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.

शनिवार 26 मार्च चंद्ररास धनु 20.27 पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 14.47 पर्यंत व नंतर उत्तराषाढा.

शनिवार 26 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

शनिवार 26 मार्च चंद्ररास धनु 20.27 पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 14.47 पर्यंत व नंतर उत्तराषाढा. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

 

मेष :–व्यावसायिकांना मोठ्या आँर्डर्स मिळणार आहेत त्यातून आनंद मिळेल. व्यवसायात भागिदाराचे मदत मिळणार आहे.

 

वृषभ :–नोकरदार वर्गाला कार्यालयात सहकार्यांकडून अडचणीत आणले जाईल. कुटुंबातील कुरबुरी तुमच्या हस्तक्षेपाने सुटतील.

 

मिथुन :–विवाहेच्छूना जोडीदार निवडण्यासाठी आईवडीलांची मदत मिळेल. नोकरदारांना अतिशय कष्टामुळेदमायला होईल.

 

कर्क :–नवीन ओळखीतून मित्र मिळणार आहेत. अध्यात्मिक उपासकांना आज मिळणारे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.

 

सिंह :–गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध होतील. पण ती संधी घ्यावयाची असेल तर स्वत:च्या विचाराने आर्थिक गुंतवणूक करू नये. तज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

कन्या :–परदेशातून स्वदेशात आलेल्यांना मिळणारे समाधान स्वर्गसुखासारखे वाटेल. नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रवास घडेल.

 

तूळ :–व्यावसायिकांनी मार्केटचा कल पाहून आपल्या योजनाना संधी द्यावी. नोकरदारांना अचानक नवीन नोकरीची संधी कळेल.

 

वृश्र्चिक :–वैवाहिक जीवनात दुसर्यांच्या मताने वागल्याने मनस्ताप सोसावा लागेल. वयस्कर मंडळींना आपल्या जुन्या मित्रमंडळींबरोबर संपर्क साधता येणार आहे.

 

धनु :–नात्यातील मुलांच्या सवयींवर जाहीर वाच्यता करण्याचा मोह टाळा.  आईसाठी आवडत्या वस्तूची खरेदी कराल.

 

मकर :–सणासाठी केली तयारी सर्वांकडून कौतुकाची ठरेल.  वयस्कर मंडळी सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने सर्वत्र कौतुक होईल.

 

कुंभ :–आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच आनंदाचा व समाधानाचा राहणार आहे. आईवडीलांच्या सल्ल्याने मोठ्या खर्चाबाबतचा निर्णय घ्या म्हणजे नुकसान होणार नाही.

 

मीन :–भिडस्तपणाने मित्रांना दिलेल्या पैशात फसगत झाल्याचे लक्षांत  येईल. वातावरणातील बदलामुळे प्रकृती अस्वास्थ्याचा त्रास होईल.

|| शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *