daily horoscope

गुरूवार 24 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.

Read in

गुरूवार 24  मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.

गुरूवार 24 मार्च चंद्ररास व वृश्र्चिक 17.29 पर्यंत व नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 17.29 पर्यंत व नंतर मूळ.

गुरूवार 24  मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.

गुरूवार 24 मार्च चंद्ररास व वृश्र्चिक 17.29 पर्यंत व नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 17.29 पर्यंत व नंतर मूळ. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–स्त्रीयांना युरीन इन्फेक्शनचा त्रास संभवतो. तर मुलींना मासिक पाळीचा खूपच त्रास होईल. तरूणांना आजच्या घटनेमुळे व्यायामाचे महत्व कळेल.

 

वृषभ :–नोकरीतील तुमच्यावर असलेल्या जबाबदारीसाठी प्रवास करावा लागणार आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबर आज ट्युनिंग चांगले ेजुळेल.

 

मिथुन :–तरूणांना अचानक दातदुखीचा त्रास जाणवेल पण दुर्लक्ष करू नका. दुध, दुधाच्या पदार्थांचा आज तुम्हाला त्रास होणार आहे तरी त्यापासून दूर रहा.

 

कर्क :– वरच्या मजल्यावर जाण्यासाठी प्रकर्षाने लिफ्टचा वापर करा. आज शक्यतो शारिरीक स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न करा.

 

सिंह :–विवाहेच्छू मुलांनी आपले नियम व अपेक्षा यावर तडजोड दाखवल्या खूपच फायदा होईल. वयस्कर मंडळीनी औषध घेताना त्याबाबत जागरूक रहावे कोणतीही चूक होत नसल्याची खात्री करावी.

 

कन्या :–झेराँक्सला मशीन चा व्यवसाय असलेल्यांना आज चांगला लाभ संभवतो. तुमचे महत्वाचे अडकलेले पार्सल आज किंवा उद्या दुपारी  4.00 पर्यंत मिळेल.

 

तूळ :–तुमच्या हातातील कमी झालेल्या कामात वरिष्ठांकडून पुन: भर पडेल. आजचा दिवस अतिशय घाईगडबडीचा जाणार आहे.

 

वृश्र्चिक :–आज तुमच्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. कोणतीही गोष्ट फार ताणू नका.

 

धनु :–मनाची अचानक बदलणार्‍या वृत्तीला तुम्हालाच आवर घालावा लागेल. कोणतेही निर्णय घेताना तडजोडीची तयारी ठेवा.

 

मकर ::- बुद्धीचातुर्याने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. मनात विचाराचे काहूर माजल्याने व मानसिक त्रास होईल.

 

कुंभ :–आज पूर्वीच्याच निर्णयावर ठाम राहण्याचा अट्टाहास सोडल्यास कामाला योग्य दिशा सापडेल. उगाच खोटे साहस करू नका.

 

मीन :–हातातील अडकलेले काम तुमच्या योग्य नियोजनामुळे मार्गी लावाल. स्वत:च्या कर्तव्याबाबत चोख रहावे लागेल.

||  शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *