Read in
बुधवार 23 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.
बुधवार 23 मार्च चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 18.52 पर्यंत व नंतर ज्येष्ठा.
बुधवार 23 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
बुधवार 23 मार्च चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 18.52 पर्यंत व नंतर ज्येष्ठा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज एकनाथ षष्ठीचा दिवस आहे.
मेष :–व्यवसाय व्यवहारातील ज्या गोष्टी तुम्हाला उघड करावयाच्या नाहीत त्याबाबत जागरूक रहा. इंजिनीयर मुलांना नवीन नोकरीच्या दिशा सापडतील.
वृषभ :–द्वितीय संततीबाबत काळजीचा सूर राहील. बाजारात, गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर पर्स पाकीट सांभाळा आज तुमचे पैसे हरवण्याचा धोका आहे.
मिथुन :–कोणत्याही स्पर्धेबाबतचा विचार करत असाल तर प्रथम नियोजन करा व त्यानुसार कृती केल्यास योग्य दिशा सापडेल.
कर्क :–शब्दकोडी, सुडोकु सोडवणार्यांना त्यातील नवीन युक्त्या कळतील. अध्यात्मिक उपासकांना योग्य मार्गदर्शन मिळण्याची संधी मिळेल.
सिंह :–कौटुंबिक सौख्याबाबत आजचा दिवस अतिशय सुखसमाधानाचा राहिल. सार्वजनिक इमारतीत राहणार्यांना आपल्या अडचणी दूर होणार असल्याचे कळेल.
कन्या :–पुस्तक प्रकाशनाच्या कामासाठी तुम्हाला लहानशा प्रवास करावा लागेल. ज्यांना एकटे राहण्याची आवड आहे त्यांना माणसात राहण्याची इच्छा निर्माण होईल.
तूळ :–पोलीस खात्यातील अधिकार्यांना अचानक गुप्त गोष्टींचा सुगावा लागेल. फँक्टरी वर्कर्सना दैनंदिन कामाबरोबर नवीन कामाची जबाबदारी स्विकारावी लागेल.
वृश्र्चिक :–कुटुंबातील आजारी व्यक्तीची विशेष काळजी घ्यावी लागेल. तरूणांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणार आहे.
धनु :–नोकरीतील बदलाबाबतचे तुमचे प्रयत्न लवकरच यशस्वी होणार असल्याचे कळेल. वडिलांकडून तुम्हाला तुमची आवडती वस्तू गिफ्ट मिळेल.
मकर :–विद्यार्थ्यांना त्यांच्या हितचिंतकांकडून कानउघाडणी होण्याचा अनुभव येईल. अपत्यप्राप्तीच्या इच्छूकांनी डाँक्टरांच्या सल्ल्याचा विचार करूनच निर्णय घ्यावा.
कुंभ :–तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत असाल तेथे आज तुम्हाला हुकूमत गाजवता येणार आहे. मोठ्या भावंडाच्या मित्राबरोबर केलेल्या चर्चेतून अडचणी दूर होणार असल्याचा विश्वास मिळेल.
मीन :–परदेशी नोकरीला असलेल्यांना त्यांच्या नोकरीत अडचणी निर्माण झाल्याचे दिसेल. उच्च विचारसरणीच्या व्यक्तींची गाठभेट होईल.
|| शुभं-भवतु ||