Read in
सोमवार 21 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.
सोमवार 21 मार्च चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र स्वाती 21.30 पर्यंत व नंतर विशाखा.
सोमवार 21 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
सोमवार 21 मार्च चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र स्वाती 21.30 पर्यंत व नंतर विशाखा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय 21.50 मुंबई.
मेष :–विवाहेच्छूना, पुनर्विवाहाच्या इच्छूकांनी आज या विषयाला महत्व द्यावे. पती-पत्नीमधील मतभेदांवर आज नव्याने समझोता करायचा प्रयत्न जोडीदाराकडून होईल.
वृषभ :–तुमच्या दैनंदिन जीवनात मानसिक त्रास देणार्या घटनांबाबत तुम्ही जागरूक राहिल्यास तुमचा त्रास कमी होईल. पाठदुखीचा त्रास संभवतो.
मिथुन :–प्रस्तुती जवळ आलेल्या स्त्रियांनी आजचा दिवस काळजीचा आहे हे लक्षांत ठेवावे. कलाकारांना कलेच्याच क्षेत्रातील मान्यवराबरोबरबोलण्याची संधी मिळेल.
कर्क :–वडिलोपार्जित मालमत्तेबाबतचे प्रश्न पुन्हा नव्याने चिंता निर्माण करतील. घरात मुलांच्या आग्रहाखातर खाण्यापिण्याची रेलचैल होईल.
सिंह :–शाळकरी मुलांना नातेवाईकांच्या घरी येण्याने गिफ्ट वस्तू मिळेल. राहती वास्तु बदलण्याचे विचार मुलांकडून उचलून धरले जातील.
कन्या :–तरूणांना अचानक दातदुखीचा त्रास जाणवेल. संगित क्षेत्रातील मंडळीना नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी येईल.
तूळ :–मागिल प्रोजेक्टमधील यशापयशाचा विचार करून प्रोजेक्ट घ्यावे की नको याचा विचार करा. लहान भावंडाच्या बाबत त्याच्या आवडीचा विचार कराल.
वृश्र्चिक :– दैनंदिन कामाची सवय असूनही आज अचानक अंगात आळस निर्माण होईल. स्वार्थीपणाचा विचाराने तुमचे तुम्हालाच अवघड होईल.
धनु :–हाँस्पिटलमधील आजारी मंडळीना आजचा दिवस त्यांच्या आवडत्या विषयावर बोलायला मिळणार आहे. तरूणांना मित्रपरिवाराबरोबर खाण्यापिण्याची मजा करता येणार आहे.
मकर :–आज तुम्हाला तुमच्या हातातील अधिकार वापरताना मनाची तयारी होणार नाही. मुलांनी खरेदी केलेल्या घरातील वस्तुबांबत नाराजी व्यक्त करताना सौम्य शब्दात करा.
कुंभ :–तुमच्या उच्च शिक्षणाला विरोध करणार्याचे अचानक विचार बदलतील. तरूणांनी आलेल्या संधीचा फायदा कसा घ्यायचा याचा विचार करावा.
मीन :–प्रकृती अस्वास्थ्यामूळे आज तुमच्यामुळे घरातील सर्वानाच मानसिक ताण येईल. आजचा दिवस एअर मार्केटमधे नव्याने गुंतवणूक करण्यास चांगला राहील.
|| शुभं-भवतु ||