Read in
रविवार 20 मार्च 2022 ते 26 मार्च 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.
रविवार 20, चंद्ररास कन्या 11.10 पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र चित्रा 22.39 पर्यंत व नंतर स्वाती.
रविवार 20 मार्च 2022 ते 26 मार्च 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
रविवार 20, चंद्ररास कन्या 11.10 पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र चित्रा 22.39 पर्यंत व नंतर स्वाती. सोमवार 21 चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र स्वाती 21.30 पर्यंत व नंतर विशाखा. मंगळवार 22 चंद्ररास तूळ 2. 33 पर्यंत व नंतर वृश्चिक. चंद्रनक्षत्र विशाखा 20.13 पर्यंत व नंतर अनुराधा. बुधवार 23 चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 18.52 पर्यंत व नंतर ज्येष्ठा. गुरूवार 24 चंद्ररास वृश्र्चिक 17.29 पर्यंत व चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 17.29 पर्यंत व नंतर मूळ. शुक्रवार 25 चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 16.07 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा. शनिवार 26 चंद्ररास धनु 20.27 पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 14.47 पर्यंत व नंतर उत्तराषाढा.
रविवार तुकाराम बीज
सोमवार संकष्ट चतुर्थी चंद्रोदय मुंबई ( 21.50)
मंगळवार रंगपंचमी
बुधवार एकनाथ षष्ठी.
मेष :– व्यवसायातील कर्जप्रकरणावर या सप्ताहात तुमच्या बाजूने सकारात्मक उत्तर मिळेल. महिलांच्या पचनसंस्थेबाबत तक्रारी निर्माण होतील. पतीपत्नीच्या व्यावहारिक अडचणींवर तज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल. दलाली, कमिशन एजंट यांना त्यांच्या व्यवहारात अडचणी येत असल्याचे जाणवेल. विवाहाच्या प्रतिक्षेतील तरूण तरूणींना आपल्या मनासारख्या स्थळांची माहिती मिळेल. राजकारणातील मंडळीना प्रतिस्पर्ध्यांकडून होणार्या विरोधास सहन करावे लागेल. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात जराही घाईगडबड न करता ज्येष्ठांच्या सल्ल्याने अभ्यास करावा.
वृषभ :–शिक्षक व प्राध्यापकांना त्यांच्या वर्षभर केलेल्या कामाचे चीज झाल्याचे जाणवेल. शैक्षणिक संस्थेतील कर्मचार्यांना नवीन नियोजन करताना ज्येष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल पण त्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणे महत्वाचे आहे. संततीच्या प्रतिक्षेतील दांपत्यास डाँक्टरांचा सल्ला अतिशय उपयोगी पडेल. नाटक क्षेत्रातील कलाकारांना आपल्या उत्कृष्ट कलेबद्दल प्रेक्षकांकडून व लोकांकडून भरभरून दाद मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रातील महिलांना आपल्या करत असलेल्या कामाव्यतिरीक्त इतर कामातही लक्ष घालण्याची जबाबदारी स्विकारावी लागेल.
मिथुन :–सार्वजनिक कामातील तुमची जबाबदारी वाढणार आहे. लहान सहान कामाच्या जबाबदारी वरून सहकार्याबरोबर मतभेद निर्माण होतील. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणापुढे इतर गोष्टी गौण वाटतील त्यामुळे या सप्ताहात अभ्यासाचा चांगला जोर वाढणार आहे. एकत्र कुटुंबातील असलेले मतभेद तुमच्या पुढाकाराने सहजपणे मिटवता येणार आहेत. कुटुंबातील एखाद्या शुभकार्याकरीता तुम्हाला आर्थिक बाजूची जबाबदारी घ्यावी लागेल. विवाहेच्छूना आलेल्या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल.
कर्क :–पासपोर्ट, व्हिसा यांच्या कामाकरता इतरांच्या मदतीवर विसंबून राहू नका. राजकीय क्षेत्रातील मंडळीना अचानक मोठा प्रवास करावा लागेल. प्रवासात महत्वाची कागदपत्रे सांभाळावी लागतील. सरकारी क्षेत्रातील मंडळीना आपल्या स्वत:च्या जबाबदारीवर काम पूर्ण करावे लागेल. इतरांकडून जराही सहकार्य मिळणार नाही. मेडिकलच्या विद्यार्थ्यांना आपल्याला अवघड जात असलेल्या विषयांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. नवीन घर घेण्याच्या विचारात असलेल्यांनी सध्या विचार पुढे ढकलावा.
सिंह :–गायक मंडळीनी आपल्या घशाची अतिशय काळजी घ्यावी, हलगर्जीपणा करू नये. परगावी असलेल्या आईवडिलांच्या प्रकृतीबाबत काळजी वाढवणार्या गोष्टी घडतील. कदाचित गावी जावे लागेल. कुटुंबातील सर्वानीच सहविचाराने निर्णय घेऊन गावी जाण्याची जबाबदारी घ्यावी. ह्रदयविकाराचा त्रास असलेल्यांनी त्यांना होणारा कोणत्याही त्रास आकडे दुर्लक्ष करू नये. मोनोपाँजचा त्रास असलेल्या महिलांनी मानसिक शांती जपणे महत्वाचे आहे हे पटेल. तरूणांच्या पायाला दुखापत होण्याचा धोका आहे.
कन्या :–खाजगी बँकेतील नोकरदारांना खातेदारांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे वरिष्ठांची बोलणी खावी लागतील. लहान मुलांना सर्दी व खोकल्याचा त्रास संभवतो फँक्टरी वर्कशाँप मधील कर्मचार्यांना कामाचा ताण जाणवेल. कामातील कौशल्य कमी झाल्याचे जाणवेल. नगरपालिकेतील कर्मचार्यांना नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची जबाबदारी स्विकारावी लागेल. सरकारी अधिकार्यांचा जबाबदारीत वाढ होईल. मुलांचे आईवडीलांचे झालेले मतभेद मिटवण्याचा उत्तम संधी चालून येईल.
तूळ :–राजकीय क्षेत्रातील मंडळीनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तरूणांना आपल्या व्यवसायात बदल करावयाचा असल्यास तज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये. अध्यात्मिक उपासकांना अंत:स्फूर्तीने काम करण्याची शक्ती मिळेल. वाहतूक कंपन्यांतील कर्मचार्यांना नवीन काँन्ट्रक्टचा विचार करावा लागेल. मोठ्या प्रमाणातील जाहिराती दिल्या असलेल्यांनी गेल्या वर्षभराच्या व्यवसायाच्या आढाव्यावर नवीन जाहिरातींबाबतचा विचार करावा. अचानक अंदाजाने निर्णय घेऊ नये. वडिलांबाबचा प्रकृतीचा प्रश्न काळजी वाढवेल.
वृश्र्चिक :–मित्रपरिवारातील घरगुती अडचणींला मदतीसाठी अचानक जावे लागले. कोर्टकेसमधील कामात वाढलेल्या अडचणींबाबत वकीलांना सल्ला मानावा तुमच्या मनाने कोणताही निर्णय घेऊ नये. तरूणांच्या मनातील दु:खद घटना ऐकून घेण्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागेल. सरकारी क्षेत्रातील मंडळीना त्यांच्या कामातील अडचणींवर वरीष्ठांकडून योग्य ते मार्गदर्शन मिळेल. महिलांना घरगुती प्रश्नांवर जवळच्या व्यक्तींकडून आवश्यक तो सल्ला मिळेल. अध्यात्मिक उपासनेची सुरूवात करणार्यांनी योग्य गुरूकडून मार्गदर्शन घ्यावे.
धनु :–आईवडिलांच्या प्रकृतीबाबत फँमिली डाँक्टरांबरोबर तुम्हाला बोलणे महत्वाचे आहे हे लक्षात घ्या. नुकतेच आजारपणातून बरे झालेल्यांनी डाँक्टरांच्या सल्यानेच वागावे. अन्यथा दुखणे पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील जवळच्या व्यक्तीबाबत काळजी निर्माण करणार्या घटना घडतील. तरूणांनी कोणत्याही परिस्थितीत जुन्या व्यवसायात तज्ञांच्या सल्ल्याशिवाय नव्याने गुंतवणूक करू नये. पूर्वी मिळालेल्या सरकारी नोटिशीला वेळेत उत्तर न दिल्याने दंड भरावा लागेल. दूर परगावी असलेल्या ंना घरी येण्याची ओढ जाणवेल.
मकर :–परदेशी जाऊ इच्छिणार्यांनी आता आपले लक्ष्य त्याच कामावर करावे. उच्च शिक्षणासाठी जाणार्या ना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागणार आहे. संशोधन संस्थेत काम करणार्यांना आपल्या जबाबदारीतील कामाचा बराच ताण जाणवणार आहे. राजकीय पदाधिकार्यांच्या एखाद्या कामाबाबत जनतेचा क्षोभ सहन करावा लागणार आहे. मानसिक शांतता जपण्याचा प्रयत्न करावा लागेल. व्यावसायिकांनी बर्याच काळापासून त्यांच्या रेंगाळलेल्या योजना सुरू करण्यासाठीचे आवश्यक ते नियोजन करावे अध्यात्मिक उपासकांना गुरूमाऊलीच्या अशिर्वादाने कार्यशील होत असल्याचे जाणवेल.
कुंभ :–नेहमीप्रमाणे अंत:स्फूर्तीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यातच यश येईल. या सप्ताहातील तुम्हाला अकारण प्रवास करावा लागेल. प्रवासासाठी लागणार्या वस्तूंची नव्याने खरेदी करावी लागेल. सरकारी बँकेच्या कर्जाबाबत तुमचे अंदाज खरे ठरतील. महिलांना अचानक युरीन इन्फेक्शनचा त्रास जाणवेल. किडनी स्टोनचा त्रास असलेल्यांनी दुर्लक्ष करू नये. कुटुंबात बाळाच्या आगमनाने आनंदी आनंद होईल. कुटुंबातील नव्याने आलेल्या पाहुण्याचे स्वागत करावे लागेल. मित्रमंडळीतील धर्मबाह्य वर्तन करणार्यावर झालेल्या कारवाईबाबत मदत करावी लागेल.
मीन :–देशांतर्गत अर्जंटली प्रवास करणार्यांना प्रवासात वेटींग रूममध्ये वेळ घालवावा लागेल. परदेशी जाऊ इछ्छिणार्यांनी तज्ञांचा सल्ला घ्यावा. स्वेच्छा निवृत्ती घेऊ इच्छिणार्यांनी योग्य नियोजनाचा विचार करावा व ठरवावे. या सप्ताहातील निर्णय चुकीचा ठरू शकतो. परोपकार करताना तुम्ही अडचणीत येणार नाही याची दखल घ्या. महिलांना अपत्य प्राप्तीच्या बाबतीत सुचक चाहूल लागेल. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांना अतिशय गोंधळात टाकणार्या घटनाना सामोरे जावे लागेल. संशोधन कार्यातील मान्यवरांचा सन्मान होण्याचे योग आहेत.
|| शुभं-भवतु ||