daily horoscope

शनिवार 19 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.

Read in

शनिवार 19  मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.

शनिवार 19 मार्च चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र हस्त 23.37 पर्यंत व नंतर चित्रा.

शनिवार 19  मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

शनिवार 19 मार्च चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र हस्त 23.37 पर्यंत व नंतर चित्रा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–नोकरीत हाताखालील कर्मचार्‍यांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. मित्रमंडळीमधे तुमच्याविषयी आदर निर्माण करणार्या घटना घडतील.

 

वृषभ :–अँनिमेशन व ग्राफिक्स च्या क्षेत्रातील मंडळीना नवीन प्रोजेक्टची संधी मिळण्याची बातमी कळेल. आज प्रथम संततीकडून मानसिक त्रास होणार्या घटना घडतील.

 

मिथुन :–तरूणांचा  जुन्या  घरात राहण्याचा  निर्णय  महत्वाचा ठरेल. पातळ  पदार्थांच्या घरगुती व्यवसायातील  अडचणींवर अचानक तोडगा निघेल.

 

कर्क :–कोणताही वाद किंवा मतभेद जास्त ताणले जाणार नाहीत याची काळजी घ्या. मनातील अचानकपणे बदलणार्‍या वृतींवर संयम ठेवावा लागेल.

 

सिंह :–संततीच्या चुकांबाबतचा लगेच कडक धोरण स्विकारून नका. तरूणांना आपल्या ठरलेल्या कार्यक्रमातून कुटुंबातील कामाकडे पहायला जराही वेळ मिळणार नाही.

 

कन्या :–कुटुंबातील महत्वाच्या जबाबदार्या सांभाळण्याची तयारी दाखवावी लागणार आहे. नियोजित कामात अचानक बदल करावा लागेल.

 

तूळ :–पैशाच्या जोरावर नव्याने करण्यात आलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल. मिटींगमधील चर्चेमध्ये समोरील व्यक्तीचा तुमच्यावर दबाव निर्माण होईल.

 

वृश्र्चिक :–आजारी असलेल्या मंडळीना त्यांच्या मनातील विचारांत  गुंतागुंत निर्माण झाल्याचे जाणवेल. कोर्ट कचेरीचा कामांची जबाबदारी तरूणांवर सोपवली जाईल.

 

धनु :–मैदानी खेळाच्या खेळाडूना आपल्या कार्यशक्ती वाढ झाल्याचे जाणवेल. लहानशा का होईना पण प्रवास  करावा लागणार आहे.

 

मकर :–नोकरीच्या ठिकाणी पदाधिकार्यांना मनस्ताप देणार्‍या घटना घडतील. प्रसंगावधान राखून नक्की काय करावे याची अचूक सूचना मिळेल.

 

कुंभ :–कोणतेही अचानक धाडस करताना परिस्थितीचा विचार करूनच ठरवा. वाहन चालवताना बेजबाबदारपणाने वागल्यास दुखापत होण्याची शक्यता आहे.

 

मीन :–स्वत:च्या चुकीचे खापर दुसर्यांवर फोडू नका. राजकीय मंडळीनी गुप्तशत्रूं पासून अतिशय सावध राहण्याची गरज आहे. स्वकर्तृत्वावर चांगला वाव मिळेल.

 

|| शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *