Read in
शुक्रवार 18 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.
शुक्रवार 18 मार्च चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी 24.17 पर्यंत व नंतर हस्त.
शुक्रवार 18 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
शुक्रवार 18 मार्च चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी 24.17 पर्यंत व नंतर हस्त. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज धूलिवंदन. हुताशनी पौर्णिमेचा करिदिन.
मेष :– मातुल घरान्याकडील मंडळींविषयी आपुलकी निर्माण होऊन भेटण्याची ओढ लागेल. आर्थिक व्यवहारातील उलाढालीत अपेक्षित मार्गदर्शन मिळेल.
वृषभ :–ब्युटी पार्लर व हस्तकला, शिल्पकलेच्या क्षेत्रातील मंडळीना नवीन कामाच्या भक्कम आँर्डर्स मिळतील. शेअर्स मार्केटमधील नव्याने उलाढाली करू नका.
मिथुन :–गर्भवती महिलांना सिझरीनची शक्यता आहे. कुटुंबातील न ऐकणार्या मुलांबाबतचा प्रश्न सोडवण्यासाठी मिटींगमधे चर्चा होईल.
कर्क :–तरूण मंडळीना आपली मानसिक शक्ती वाढल्याने कामातील उत्साह वाढणार आहे. लहान मुले झोपाळ्यावरून किंवा तत्सम उंचावरून वा घसरगुंडीवरून पडण्याचा धोका आहे.
सिंह :–वयस्कर मंडळीना किंवा उच्चबीपीचा त्रास असलेल्यांना हातांना मुंग्या येण्याचा त्रास जाणवेल. साहित्यिकांना आपल्या लेखनाविषयीचा वाचकांचा दृष्टिकोन कळेल.
कन्या :–बातमीदार, पत्रकार यांनी आपल्या हातातील कामाविषयी बेफिकीर न राहता कामे पडताळून पहावीत.मुलांच्या उच्च शिक्षणासाठी दूरच्या प्रवासाचे बेत आखले जातील.
तूळ :–पुस्तकाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात मोठे काम केले जाईल. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात जराही घाईगडबड न करता शिक्षकांच्या सल्ल्याने अभ्यास करावा.
वृश्र्चिक :–नवीन घरी रहावयास जाणार्याना जुन्या घराचा ताबा सोडण्यासाठी अचानक घाई केली जाईल. वातावरणातील बदलामुळे लहान मुलांची प्रकृती बिघडेल.
धनु :–लहाम मुलांच्या हातातील अणकुचीदार वस्तूकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. मोबाईल हरवण्याचा धोका ाहे तरी काळजीपूर्वक सांभाळा
मकर :–जुन्या वाहनाच्या विक्री बाबतचे विचार बदलले जातील. नोकरीतील तुमच्या हातातील प्रोजेक्टला वरिष्ठांकडून ग्रीन सिग्नल मिळेल.
कुंभ :–लेखनाची आवड असलेल्यांना त्यांच्या लेखनकलेबद्धल लोकांकडून आदर व्यक्त केला जाईल. मित्राच्या आर्थिक अडचणीसाठी मदत करावी लागेल.
मीन :–आयुर्वेदिक क्षेत्राच्या डाँक्टर्सना त्याच्या उत्तम कार्यासाठी लोकांकडून कौतुक होईल. आध्यात्मिक साधकांना गुरूतुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल.
|| शुभं-भवतु ||