Read in
गुरूवार 17 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.
गुरूवार 17 मार्च चंद्ररास सिंह 30.31 पर्यंत व नंतर कन्या. चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 24.33 पर्यंत व नंतर उत्तरा फाल्गुनी.
गुरूवार 17 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
गुरूवार 17 मार्च चंद्ररास सिंह 30.31 पर्यंत व नंतर कन्या. चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 24.33 पर्यंत व नंतर उत्तरा फाल्गुनी. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज हुताशनी म्हणजे होळी पौर्णिमा.
पौर्णिमा दुपारी 13.29 ला सुरू होत असून शुक्रवारी रात्री 12.47 पर्यंत आहे.
मेष :–मैदानी खेळाची आवड असलेल्यांनी आपली आवड जोपासण्याची मिळणारी संधी सोडू नये. चित्रपट निर्मिती, व त्यातील तंत्रज्ञानातील अपेक्षित कामे मार्गी लागतील.
वृषभ :–बांधकाम व्यवसायातील मंडळीना आपली कामे व्यवस्थित सुरू होत असल्याचे लक्षात येईल. वडिलोपार्जित मालमत्तेबाबतचे प्रश्न पुन्हा नव्याने चिंता निर्माण करतील.
मिथुन :–आज अचानक मातृसौख्यात उणीव निर्माण होत असल्याचे जाणवेल. कौटुंबिक महत्वाच्या कामासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
कर्क :–जेथे बोलण्याने प्रभाव पडणार आहे तेथे विचार करूनच बळावे लागेल. आर्थिक व्यवहारातील पारदर्शकपणा तुम्हाला दोषारोपातून मुक्त करेल.
सिंह :–वैचारिक पातळीवरील चर्चा अतिशय प्रभावी झाल्यामुळे तुम्हाला समाधान वाटेल. आज तुमच्या मनाचा कल तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्याकडे झुकेल.
कन्या :–नेहमीच्या ओळखीच्या व विश्वासार्ह व्यक्तींकडून आर्थिक फसवणूक होईल. आज तुमच्याकडून होणारा खर्च मानसिक त्रास देणारा ठरेल.
तूळ :–हाँस्पिटलमधील आजारी मंडळीना आजचा दिवस खूपच बरे वाटेल व मानसिक उत्साहात वाढ होईल. राजकीय मंडळींच्या प्रतिस्पर्ध्यांचे अचानक बळ वाढेल.
वृश्र्चिक :–नोकरीतून बडतर्फ झालेल्यांबाबत सहकार्यांकडून सहानुभूती निर्माण होईल. व्यवसायातील भागिदाराच्या सहाय्याने परिस्थितीवर मात करून दाखवाल.
धनु :–समाजातील मान्यवर मंडळींकडून उत्तम मार्गदर्शन मिळण्याचा योग आहे तरी संधी सोडू नका. विवाहित महिलांनी कुटुंबाकरता घेतलेल्या कष्टाची मुलांना जाणीव होईल.
मकर :–अध्यात्म्याच्या अभ्यासकांना अंतस्फूर्तीने कांही गोष्टींची चाहुल लागेल. प्रामाणिक विद्यार्थ्यांना आपल्या गुरूंकडूनच मिळालेला आशिर्वादाचे फलित मिळाल्याचे जाणवेल.
कुंभ :–शिक्षक व प्राध्यापकांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळणार आहे. शुद्ध मनाने केलेली उपासना फळास आल्याचे लक्षांत येईल.
मीन :–न्यायालयातील कर्मचार्यांना त्यांच्यावर असलेली जबाबदारी सांभाळताना अडचणी निर्माण होतील. पतीपत्नीच्या मनात एकच नकारात्मक विषय घोळत राहील.
|| शुभं-भवतु ||