Read in
बुधवार 16 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.
बुधवार 16 मार्च चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 24.20 व नंतर पूर्वा फाल्गुनी.
बुधवार 16 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
बुधवार 16 मार्च चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 24.20 व नंतर पूर्वा फाल्गुनी. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
राहुचा वक्र गतीने मेष राशीत 29.26 या वेळेत प्रवेश होत आहे. हा राहू एकूण दीड वर्ष याच राशीत राहणार असल्याने याचा प्रत्येक राशीतील व्यक्तीच्या जिवनावर होणार्या सकारात्मक व नकारात्मक परिणामांबाबतचा यु ट्युब व्हिडीओ लवकरच करत आहे तरी आपण सर्वांनी ते जाणून घेण्यासाठी माझा यु ट्युब व्हिडीओ पहावा.
मेष :–वैयक्तिक जिवनात बर्याच बाबतीत सांभाळून रहावे लागेल. विरोधकांच्या विरोधाला फारसे महत्व न देता तुम्हाला तुमचे काम निष्ठेने करावे लागेल.
वृषभ :–प्रेमवीरांनी आपली विश्वासार्हता पडताळून पाहण्याची वेळ आहे. शेअर बाजारातील आजचे व्यवहार नुकसान करणारे ठरतील.
मिथुन :–कान, नाक, घसा तज्ञांना मोठ्या गुंतागुंतीच्या सर्जरीचे काम करावे लागेल. विद्यार्थ्यांनी आपल्या स्मरणशक्तीबाबत अतिशय जागरूक रहावे.
कर्क :–लहान मुलांच्या अफाट कल्पनाशक्तीचा अनुभव येईल. नोकरीत बदली नको वाटणार्यानी आपले विचार वरिष्ठांबरोबरचे व्यक्त करावेत.
सिंह :–दूर गावी राहणार्याना आपल्या घरी येण्याची ओढ अनावर होईल. पतीपत्नीमधील वादविवादात तुमचीच बाजू वरचढ ठरेल.
कन्या :–नोकरीतील तुमच्यावर असलेल्या जबाबदारी बाबत जागरूक न राहिल्याने आजचा दिवस त्रासदायक राहील. आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घ्यावी.
तूळ :–संततीच्या विवाहाबाबतच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा होईल. घरातील उंच ठिकाणचे काम करण्याकरीता स्टुलावर वगैरे चढू नका.
वृश्र्चिक :–कुटुंबातील जोडीदाराच्या आईवडिलांची भेट होणार आहे. राजकीय व्यवहार करताना अनवधानाने जोखीम घेऊ नका.
धनु :–वयस्कर मंडळींच्या मांड्यांचे स्नायु दुखण्याचा संभव आहे. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्यावर सोपवण्यात येणारे अधिकारांच्या निर्णयात अचानक बदल होईल.
मकर :–विद्यार्थ्यांना त्यांच्या रखडलेल्या शिष्यवृत्तीबाबतचे काम तातडीने पूर्ण करावे लागेल. तरूणांनी आजचा प्रवास काळजीपूर्वक करावा.
कुंभ :–आज स्टेशनवर, रस्यावर कोणाचीही वाट पाहण्यासाठी थांबू नका तुमची निराशा होईल. राजकीय मंडळीना गुप्तशत्रूं पासून त्रास होणार आहे.
मीन :–ज्यांच्या पचनसंस्थेच्या तक्रारी आहेत त्यांनी आहाराबाबत काळजी घ्यावी लागेल. वयोवृद्ध मंडळीनी अतिचिकित्सेने काळजी घ्यावी.
|| शुभं-भवतु ||