Read in
मंगळवार 15 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.
मंगळवार 15 मार्च चंद्ररास कर्क 23.32 पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 22.32 पर्यंत व नंतर मघा.
मंगळवार 15 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मंगळवार 15 मार्च चंद्ररास कर्क 23.32 पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 22.32 पर्यंत व नंतर मघा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज भौमप्रदोष आहे तरी श्री शिवउपासकांनी उपासना करावी.
मेष :–आज दैनंदिन कामातील कष्टात वाढ होऊन दमायला होईल. घराच्या विक्री किंवा खरेदी बाबतचे कोणतेही विचार पुढे सरकणार नाहीत.
वृषभ :–आज तुमच्या घरातील रिकाम्या जागेस नवीन भाडेकरू मिळणार असल्याचे कळेल. दत्तक पुत्राकडून व मानस पुत्राकडूनही आजचा दिवस मोठ्या लाभाचा व आनंदाचा राहणार आहे.
मिथुन. :–विवाहेच्छूना आलेले स्थळ फारच दूरचे असल्याने नाकारले जाईल. सरकारी कामाच्या परवानगीसाठी प्रयत्न निष्फळ ठरतील.
कर्क :–हरवलेल्या वस्तूचा अचानक ठावठिकाणा कळेल. नोकरीतील कामकाजाचा आढावा घेऊन आपल्या कामाची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडाल.
सिंह :–मनाच्या निश्चयाने आलेल्या परिस्थितीवर मात करता येणार आहे. कुटुंबात आजोळकडील मंडळींची ये जा राहील.
कन्या :–प्रसंगी अपमान सहन करावा लागला तरी मनावर न घेता वेळ निभावून न्या. मित्रमैत्रिणींच्या बरोबर बोलण्यामुळे मनाला हलके वाटेल.
तूळ :–मित्रांच्या ओळखीतून नवीन घर विकत घेण्याबाबत चर्चा होईल. व्यवसायातील अचानक न मागताही मागिल येणी वसूल होऊ लागतील.
वृश्र्चिक :–व्यवसायाच्या निमित्ताने लागणार्या वस्तूंची खरेदी करण्याकरीता किंवा इतर कामाकरता जिल्ह्याबाहेरचा प्रवास घडेल. वरिष्ठांच्या ओळखीमुळे कृपेने दगदग होणार नाही.
धनु :–मुलांच्या उच्चशिक्षणासाठी लागणारा खर्च पगारातून झेपणार नसल्याचे जाणवेल. सरकारी अधिकार्यांनी कोणत्याही आर्थिक व्यवहाराची जबाबदारी घेऊ नये.
मकर :–व्यवसायातील तीव्र इच्छांना भागिदाराकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. नोकरीच्या ठिकाणी आज सहकार्यांकडून मोलाची मदत मिळेल.
कुंभ :–वैवाहिक जीवनातील अडचणींवर कायदेशीर उपाय शोधण्यापूर्वी कुटुंबातील ज्येष्ठांबरोबर चर्चा करा. नोकरीतील बदलाच्या विचारात असाल तर नव्याने प्रयत्न करावा.
मीन :–मनातील तीव्र इच्छाशक्तीने अवघड कामही पूर्णत्वास न्याल. महिलांना माहेरील सुखदायक व आनंददायक घटनांची बातमी मिळेल.
|| शुभं-भवतु ||