Read in
सोमवार 14 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.
सोमवार 14 मार्च चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 22.06 पर्यंत व नंतर आश्लेषा.
सोमवार 14 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
सोमवार 14 मार्च चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 22.06 पर्यंत व नंतर आश्लेषा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज आमलकी एकादशी आहे.
मेष :–महिलांना माहेरील सुखदायक व आनंददायक घटनांची बातमी मिळेल. व्यवसाय उद्योगातील रखडलेली कामे आजचा दिवसही रखडणार आहेत तरी घाई करू नका.
वृषभ :– पोस्टाने किंवा कुरियरने येणार्या वस्तू आज तुमच्या अपेक्षित वेळेत येणार नाहीत. सेवाधर्माने कर्तव्य बजावणार्यांना आपण करत असलेल्या कामातून आनंद मिळेल.
मिथुन. :–आज तुमच्या तत्त्वनिष्ठ विचारांमुळे तुमच्या समोर अचानक पेचप्रसंग निर्माण होईल. विद्यार्थ्यांना आपल्याला अवघड जाणार्या विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल.
कर्क :–ज्या गोष्टींची तुम्हाला भिती वाटते त्याच गोष्टी तुमच्यासमोर उभ्या राहणार आहेत. पुनर्विवाहाच्या प्रतिक्षेतील मंडळीना नकारात्मक प्रतिसादाला सामोरे जावे लागेल.
सिंह :–नोकरीच्या ठिकाणी आज मनस्ताप देणार्या घटना घडतील. आजारी व वयस्कर मंडळीना त्यांच्या आजारांवरील उपचाराकरीता मोठ्या दवाखान्यात जावे लागेल.
कन्या :–संतती व जवळचे मित्रमंडळीं यांच्या मदतीने रेंगाळलेल्या कामाला सुरूवात केल्यास कामे मार्गी लागतील. मुलांच्या सोयीकरीता पूर्वनियोजित कार्यक्रमात अचानक बदल करावा लागतील.
तूळ :–वाहनाच्या विक्री किंवा खरेदीच्या कामात मातोश्रींचा सल्ला उपयोगी पडेल. सेवानिवृत्ती घेऊ इच्छिणार्यांनी इतरांच्या नादाने निर्णय घेऊ नये.
वृश्र्चिक :– देशातच पण परगावी शिक्षणासाठी जाऊ इछ्छिणार्यांना योग्य मार्ग सापडेल. सकारात्मक विचारांच्या प्रभावाने कामांना अपेक्षित गती मिळेल.
धनु :–घरासाठी किंवा रिकाम्या जमिनीसाठी कर्ज काढू इछ्छिणार्यांना नोकरीतून कर्जाला परवानगी मिळत असल्याचे कळेल. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
मकर :–संततीच्या प्रतिक्षेतील मंडळीना डाँक्टरांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. जुन्या गुंतवणूकीतून अपेक्षित लाभ होईल.
कुंभ :–नोकरीतून परदेशी जाण्याची लवकरच आँर्डर निघणार असल्याचे कळेल. पतीपत्नीमधील वाद वाढण्याची चिन्हे आहेत तरी काळजी घ्यावी.
मीन :–आज तुमच्या मनात सुरू असलेल्या विचारांना मोकळीक दिल्यास मानसिक ताण कमी होईल. घराच्या बांधकामाबाबत तुमचे निर्णय अचूक ठरतील.
|| शुभं-भवतु ||