daily horoscope

शनिवार 12 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शनिवार 12 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार 12 मार्च चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा 17.30 पर्यंत व नंतर पुनर्वसु.

शनिवार 12 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

शनिवार 12 मार्च चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा 17.30 पर्यंत व नंतर पुनर्वसु. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

 

मेष :–आज नवनवीन येणार्या अडचणींवर तातडीने मात करता येणार आहे. विचारपूर्वक व शांतपणाने व्यवहार करा.

 

वृषभ :–  लहान मुलांच्या मनाप्रमाणे वागताना इतरांकडून टीका सहन करावी लागेल. सरकारी बँकेच्या बाबतीत तुमचे कांही फार्म्स चुकले असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

 

मिथुन :– लहानशा प्रवास असला तरी बेफीकिरी नको. सोबत असलेल्यांची जबाबदारी ओळखून वागल्यास पश्चात्तापाची वेळ येणार नाही.

 

कर्क :–बोलण्यातील माधुर्याने आज सर्वांची मने जिंकाल. लहरी स्वभावाच्या सहकार्याचा त्रास जाणवेल.

 

सिंह :–कालच्या घडलेल्या घटनेबाबत आत्मपरिक्षण केल्यास चूक समजून येईल. शांतपणाने बोलल्यामुळे कार्यभाग साध्य होईल.

 

कन्या :–कुटुंबात तुमचे आईवडिलांबरोबर मतभेद होऊन त्याचे वादात रूपांतर होईल. मनाचा मोठेपणा दाखवून माफी मागाल.

 

तूळ :–तुमच्या स्पष्ट विचारसरणीमुळे समोरील व्यक्ती नाराज होईल.  व्यवहारातील हेतूत स्पष्टता ठेवा.

 

वृश्र्चिक :– पूर्वीचा डोकेदुखीचा आजार डोके वर काढेल. लहानशा प्रसंगातून तुमचे विचार व्यक्त कराल.

 

धनु :– आज अचानक तुमचा मूड अतिशय चैन करण्याचा होईल. अतीगोड बोलणार्‍या मित्रांपासून सावध रहावे लागेल.

 

मकर :– मुलांच्या आरोग्याच्या समस्यांवर तुमच्याकडून तातडीने उपाय होतील. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे लागेल. 

 

कुंभ :–महिलांच्या स्वभावातील चिडचिडेपणात वाढ होईल. तुमच्या कौटुंबिक मतभेदांवर जवळच्या मित्रमंडळींकडून योग्य तो सल्ला मिळेल.

 

मीन :–आर्थिक उधार उसनवारीचे व्यवहार लेखी करावेत. नकारात्मक विचारांनी मनावर ताण येईल. पूर्ण विचारांती आपले मत व्यक्त करा

 

|| शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *