Read in
शुक्रवार 11 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 11 मार्च चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 14.34 पर्यंत व नंतर आर्द्रा.
शुक्रवार 11 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
शुक्रवार 11 मार्च चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 14.34 पर्यंत व नंतर आर्द्रा. वरील राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–मानसिक शक्तीचा विचार करूनच कामाची जबाब दारी स्विकारा. आज तुम्हाला जवळच्या व्यक्तींसाठी कामाचा व्याप वाढणार आहे.
वृषभ :–तुमची शांत विचारसरणी विरोधकांना नामोहरम करोल. स्वत:च्या क्षमतांचा अंदाज न आल्याने मानसिक ताण वाढेल.
मिथुन :–अचानक मनात आलेले विचारांचे काहूर बाजूला ठेवून मन शांत करावे लागेल. स्थिर वृत्तीने काम करा.
कर्क :–कोर्टातील कामाबाबत वकिलांच्या सल्ल्याचा विचार करा. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते याचा स्वत:च्या बाबतीत अनुभव येईल.
सिंह :–आलेल्या अडचणींवर मात करण्याकरीता ज्येष्ठा, चा सल्ला घ्या. कलाकार मंडळीना आपल्या कलेचे जाहीर प्रदर्शन करता येणार आहे.
कन्या :–कलेवर उपजिवीका असलेल्यांना चांगली संधी चालून येईल. सामाजिक कार्यात भाग घेण्यासाठी सहजपणे विचारणा होईल.
तूळ :–कुटुंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. आज शेअर मार्केटमधील खरेदी विक्रीचे व्यवहार करू नका.
वृश्र्चिक :–आज मनात नसतानाही गोड बोलून वेळ मारून नेता येणार आहे. महत्वाच्या निर्णयापर्यंत येताना तडजोड स्विकारावी लागेल.
धनु :–आततायीपणा मुळे हातातील संधी जाणार नाही याची दखल घ्या. खुल्या मनाने इतरांची मदत घ्यावी लागेल.
मकर :–विवेकबुद्धीने विचार केल्यास हातातील मोठा प्रश्न उद्धार मार्गी लावाल. सहनशील वृत्तीने सर्व काही साध्य कराल.
कुंभ :–कौटुंबिक वातावरण क्षुल्लक कारणांमुळे बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. आजचा निर्णय अतिशय महत्वाचा असल्याने निर्णयात घाई करू नका.
मीन :–व्यावहारिक दृष्टीकोन बाळगल्यास पश्चाताप करावा लागणार नाही. प्रतिस्पर्ध्यांबरोबरही आदराने वागावे लागेल.
|| शुभं-भवतु ||