daily horoscope

गुरूवार 10 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य

Read in

गुरूवार 10 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य

गुरूवार 10 मार्च चंद्ररास वृषभ 25.01 पर्यंत व नंतर मिथुन. चंद्रनक्षत्र रोहिणी 11.29 पर्यंत व नंतर मृगशीर्ष.

गुरूवार 10 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

गुरूवार 10 मार्च चंद्ररास वृषभ 25.01 पर्यंत व नंतर मिथुन. चंद्रनक्षत्र रोहिणी 11.29 पर्यंत व नंतर मृगशीर्ष. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज दुर्गाष्टमी आहे.

 

मेष :–बर्याच दिवसापासून रेंगाळलेले काम आज सुरू करता येणार आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून अपेक्षित फायदा होईल.

 

वृषभ :– घरगुती वातावरणात ज्येष्ठांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरेल. ज्येष्ठांच्या बोलण्यातील अस्पष्टतेमुळे संदर्भ लागणार नाहीत.

 

मिथुन. :–विद्यार्थ्यांनी केलेला निश्चय पूर्णत्वाकडे वाटचाल करेल. कुटुंबातील लहान मुलांच्या चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन दिले जाईल.

 

कर्क :–जवळच्या नात्यातील प्रकृतीच्या कारणास्तव अचानक जावे लागेल. महिलांना ठरवलेल्या कामात बदल करावा लागेल.

 

सिंह :–नवीन घराच्या प्रतिक्षेत असलेल्यांना नवीन घराची माहिती मिळेल. राजकारणातील मंडळीनी अती धाडसाने काम करू नये.

 

कन्या :–तुमच्या प्रेमाखातर नातेवाईक मंडळींकडून चौकशीचे फोन येथील. बाजारातून नुकतीच आणलेली वस्तू खराब निघाल्याचे जाणवेल.

 

तूळ :–प्रवासाची आवड असलेल्यांकडून मोठ्या प्रवासाचे बेत आखले जातील. तुमच्या अपेक्षेत बसणार्‍या नव्या नोकरीची माहिती कळेल

 

वृश्र्चिक :– आजचा दिवस तुमच्यासाठी खास तुमच्या  आवडत्या व्यक्तीच्या आठवणीने, फोनने सुरू होणार आहे. मित्रपरिवाराबरोबर जून्या आठवणीत गुंगून जाल.

 

धनु :– आईकडील नात्यातील मंडळींच्या कडून तुम्हाला आनंद देणार्‍या घटना घडतील. उच्चशिक्षित मंडळींचा  नोकरीच्या ठिकाणी मानसन्मान होईल.

 

मकर :–एखादी एजन्सी चालवणार्‍याना अचानक नवीन संधी मिळेल. दुसर्यांचे म्हणणे समजून व पटवून घ्यावे लागेल

 

कुंभ :–कायदेशीर बाबीत जरासुद्धा घाई करू नका. व्यावहारिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.

 

मीन :–नव्याने झालेल्या ओळखीबरोबर मोकळेपणाने विचार व्यक्त करा. अविवाहितांना आलेल्या स्थळांची बारकाईने चौकशी करावी लागेल.

|| शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *