daily horoscope

बुधवार 09 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य

Read in

बुधवार 09 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य

बुधवार 09 मार्च चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र कृतिका 08.30 पर्यंत व नंतर रोहिणी.

बुधवार 09 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

बुधवार 09 मार्च चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र कृतिका 08.30 पर्यंत व नंतर रोहिणी. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–महत्वाची कागदपत्रे झेराँक्सला देणार असाल तर स्वत: जबाबदारीने परत घ्यावी लागतील. पूर्वनियोजित कार्यक्रमात जी आज नवीनच कामात अडकावे लागेल.

 

वृषभ :–महिलांच्या व्यवसायाबाबतचा ना हरकत दाखल्याच्या कामात अजूनही गोंधळ निर्माण होईल. विद्यार्थ्यांना आपल्या स्मरणशक्तीचा चांगला अनुभव येईल.

 

मिथुन :– इतरांना मदत करण्याच्या नादात स्वत:च्या कामाकडे आज चांगलेच दुर्लक्ष होणार आहे. समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या पुढाकाराने कुटुंबातील रखडलेले काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करा.

 

कर्क :–लहान मुलांच्या शिक्षणाविषयीच्या तुमच्या मताला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. नोकरीच्या ठिकाणी आलेली निराशा टाळून काम करण्याचा प्रयत्न करावा.

 

सिंह :–कुटुंबातील व्यक्तींच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्याने तुमच्या मनाला बोचणी लागेल. नोकरी मधील बदली करीता चा विषय पुढे रेटण्यास हरकत नाही.

 

कन्या :– कुटुंबातील दूर गेलेले नातेसंबंध पुन्हा जुळून येण्याचे मार्ग सापडतील. हाँटेल मँनेजमेंटचा कोर्स केलेल्यांना नवीन व्यवसायाच्या दिशा सापडतील.

 

तूळ :–लायब्ररीची जबाबदारी असलेल्यांना आज कामाचा ताण जाणवेल. वयस्कर मंडळीनी रस्त्यावरून चालताना लक्षपूर्वक चालावे दुखापत होण्याची शक्यता आहे.

 

वृश्र्चिक :–बहीण भावंडातील झालेले मतभेद मित्रांच्या हस्तक्षेपाने दूर करता येणार आहेत तरी तसा प्रयत्न करा. वयस्कर मंडळीना कानाचा कमी ऐकू येण्याचा त्रास जाणवेल.

 

धनु :–शाळकरी विद्यार्थ्यांनी आपल्या महत्वाकांक्षेनुसार पुढील नियोजन करावे. सरकारी क्षेत्रातील मंडळीनी कोणत्याही कामाची अती घाई करू नये.

 

मकर :–  आजचा दिवस शेअरमार्केटमधे नुकसान करणारा असल्याने शांत रहावे. आवश्यक नसल्यास आपली मते व्यक्त करू नयेत.

 

कुंभ :– सामाजिक स्तरावरील कार्यात तुम्हाला तुमच्या स्वभावानुसार काम करून चालणार नाही. नियम व शिस्त पाळावी लागेल.

 

मीन :–इतरांच्या विचाराने घरातील महत्वाचे प्रश्र्न सोडवण्याचा प्रयत्न करू नका. बौद्धीक क्षेत्रातील मान्यवरांना नवीन प्रोटेक्ट घेण्याचे सामावून घेण्याचे ठरेल.

 

|| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *