daily horoscope

मंगळवार 08 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य

Read in

मंगळवार 08 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य

मंगळवार 08 मार्च चंद्ररास मेष 12.29 पर्यंत व नंतर वृषभ.

मंगळवार 08 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मंगळवार 08 मार्च चंद्ररास मेष 12.29 पर्यंत व नंतर वृषभ. चंद्रनक्षत्र कृतिका अहोरात्र व सकाळी 0830 पर्यंत कृतिका असून नंतर रोहिणी. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–नोकरीतील राहिलेला पगार येत्या दोन दिवसात मिळणार असल्याचे कळेल. आजच्या दिवशी  स्वत:च्या आवडीनिवडीकडे विशेष लक्ष द्याल.

 

वृषभ :–दैनंदिन जीवनातील कर्तव्ये करताना आज तुमच्याकडून अतिशय महत्वाचे काम होईल. लहान भावंडाच्या फायद्याची गोष्ट कराल.

 

मिथुन :–गायनाची कला असलेल्या कलाकारांना आज चांगली संधी मिळणार असल्याचे कळेल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या मदतीने कार्यातील अडचण दूर होईल.

 

कर्क :–आज तुमच्याकडून दुसर्यांवर छाप पडणारे कृत्य घडेल व तुमचा मान वाढेल. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवर इतर लोक खूष होतील व कौतुकही करतील.

 

सिंह :–टँक्सीने, प्रायव्हेट वाहनाने प्रवास करणार असाल तर सामानाची विशेष काळजी घ्यावी लागेल महत्वाची वस्तू हरवण्याचा धोका आहे. नोकरीतील कामाकरता प्रवास करावा लागेल.

 

कन्या :–विद्यार्थ्यांचा विशिष्ट विषय शिकण्याच्या हट्टाला मंजूरी मिळणार आहे. वातावरणातील बदल सहन न झाल्याने वृद्धांनी प्रकृतीची काळजी घ्यावी.

 

तूळ :– सोन्याच्या किंवा इतर किंमती दागिन्यांच्या मोहापायी शारिरीक दुखापत संभवते. अचानक अती धाडस करू नका.

 

वृश्र्चिक ::- बँकेचे व्यवहार, लाँकरच्या किल्ल्याबाबत जागरूक रहावे लागेल. गर्भवती स्त्रीयांना विशेष काळजी घ्यावी लागेल.

 

धनु :– आज तुमच्या मनासारख्या गोष्टी घडणार असल्याने आजचा दिवस खूप आनंदात जाईल. कलाकार मंडळींचे समाजाकडून कौतूक.

 

मकर :– तुमच्या मनातील वादळ कमी होण्यासाठी जवळच्या नातेवाईकांची मदत घ्या. वयस्कर मंडळीना झालेला मानसिक त्रास तुमच्या समजावण्याचे कमी होईल

 

कुंभ :–तुमच्याकडून  झालेल्या आर्थिक नुकसानीचे खापर इतरांवर फोडू नका. परिस्थितीतून मार्ग काढण्याकरीता मित्रमंडळींची मदत मिळेल.

 

मीन :– गरज नसताना कोणाही बरोबर आज पैज लावू नका. आजचा दिवस तुमचा संघर्षमय व नुकसानीचा असणार आहे.

|| शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *