daily horoscope

सोमवार 07 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य

Read in

सोमवार  07 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार 07 मार्च चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र भरणी  29.53 पर्यंत व नंतर कृतिका.

सोमवार  07 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

सोमवार 07 मार्च चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र भरणी  29.53 पर्यंत व नंतर कृतिका. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–तुम्ही तुमच्या व्यवसायातील करत असलेल्या प्रयत्न बाबत यशाचा बरोबर मार्ग सापडेल. आज प्रत्येक काम धडाडीने कराल.

 

वृषभ :–पोलिस खात्यातील अधिकार्यांना नवीनच गुप्त बातम्यांचा सुगावा लागेल. फँक्टरी वर्कर्सना कामातील ताणतणाव जाणवू लागेल.

 

मिथुन :–बँकेतील कांही व्यवहारात चूक होत असल्याचे लक्षात येईल. लक्षात न आल्यास तुम्ही स्वत:हून लक्ष घाला. आर्थिक फसवणूकी पासून सावध रहावे लागेल.

 

कर्क :–तरूण वर्गातील पूरूषांना मित्रमंडळींच्या मदतीने अचानक नवीन खरेदीचे वेध लागतील. होणारा खर्च सुखावह राहील.

 

सिंह :– घरगुती लहानशा व्यवसायातील तुमची मेहनत  यशस्वी होत असल्याचे लक्षांत येईल. कुटुंबात जोडीदाराबरोबर मतभेदामुळे मोठे वाद निर्माण होतील.

 

कन्या :– आज तुमच्या मनातील कल्पनाना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी इतरांची चांगली मदत मिळेल. प्रत्येकाबरोबर मोकळेपणाने बोला.

 

तूळ :–लहान लहान गोष्टींचा मनावर ताण येईल. विद्यार्थी वर्गास यशाच्या दृष्टीने नवीन प्रयत्न करता येणार आहेत.

 

वृश्र्चिक :–तुमच्याकडून न घडलेल्या गोष्टी विषयीचे बालंट येण्याचा धोका आहे. आजचा दिवस अप्रिय घटनांचा असल्याने मानसिक शांतता टिकवावी लागेल

 

धनु :–व्यवसायातील अडचणींबाबतचे तुमचे अंदाज अचून निघतील. नात्यातील आवडत्या व्यक्तींबरोबर गप्पाटप्पा होतील

 

मकर :–कर्जफेडीबाबतची तुमचे अंदाज योग्य दिशेने मार्गी होतील. महिलांच्या घरगुती उद्धोगाची चांगली वाढ होत असल्याचे जाणवेल

 

कुंभ :– पायाच्या दुखण्यासाठी नवीन डाँक्टराचा शोध लागेल. आजारपणातून बरे वाटलेल्यांनी आपल्या आवडत्या माणसात राहील्यास प्रकृतीत वक्र सुधारणा होईल

 

मीन :–स्त्रियांच्या डाव्या डोळ्याला दुखापत होण्याचा धोका आहे. तुमच्या विरोधातील व्यक्तीना त्यांच्या चुकांची जाणीव होईल

 

|| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *