Read in
शनिवार 05 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 05 मार्च चंद्ररास मीन 26.28 पर्यंत व नंतर मेष. चंद्र नक्षत्र रेवती 26.28 पर्यंत व नंतर अश्र्विनी.
शनिवार 05 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
शनिवार 05 मार्च चंद्ररास मीन 26.28 पर्यंत व नंतर मेष. चंद्र नक्षत्र रेवती 26.28 पर्यंत व नंतर अश्र्विनी. वरील दोन्ही राशी व नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–हातातून गेलेल्या तसेच हरवलेल्या वस्तू विषयी फार विचार करत बसू नका. मनमोकळेपणाने बोलून मनातील विचारांना मोकळे करा.
वृषभ :–मित्रमंडळी व नोकरीतील सहकार्यांच्या मदतीने आजच्या दिवसात महत्वाची कामे कराल. पतीपत्नीच्या व्यवसायात चांगली वृद्धी होईल.
मिथुन. :–व्यवसाय व्यापारी क्षेत्रात नव्याने गुंतवणूक करावी लागेल. सरकारी क्षेत्रातील मंडळीना त्यांच्या हातातील कामात बदल होत असल्याचे दिसून येईल.
कर्क :–कुटुंबातील कुळाचार व धार्मिक विधी करीता चे नियोजन करण्याची जबाबदारी तुमच्यावर येईल. स्वकष्टाच्या कमाईत वाढ होईल.
सिंह :–आजारी, दवाखान्यात अँडमिट असलेल्या व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी लागेल. साथीच्या व संसर्गजन्य रोगापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
कन्या :–कायदेशीर मार्गाने सुरू असलेल्या वादाविषयी मध्यस्थाकडून मांडवली करण्याकरीता निरोप येईल. पतीपत्नीमधील झालेला दुरावा मिटवण्याचे मार्ग सापडतील.
तूळ :–कँटरींग, खाणावळीच्या क्षेत्रातील व्यवसायात चांगली गती मिळेल. घरगुती खाद्य पदार्थांच्या व्यवसायात नवीन गणिते जुळवली जातील.
वृश्र्चिक :–प्रेमाच्या व्यवहारात गैरसमज होउ नयेत यासाठी अतिशय शांतपणाने वागावे लागणार आहे. मनातील शत्रुत्वाची भावना कमी कमी होऊ लागेल.
धनु :–शेअरमार्केटमधे अतिधाडसाने गुंतवणूक करू नका. बांधकाम साहित्याच्या व्यावसायिकांनी आज कोणालाही अँडव्हान्स पैसे देऊ नयेत.
मकर :–बातम्या, प्रसिद्धी माध्यमात काम करणार्यांनी बातम्या व अफवा यामधील गोंधळ तपासून घ्यावा. जागा, जमिन यांच्या दलालीतूनचांगला लाभ होईल.
कुंभ :–दळणवळण खात्यातील कर्मचार्यांना त्यांच्या कामात इतरांचा हस्तत्क्षेप होईल. नेहमीच्या वातावरणाचा उबग आल्याने बाहेर जावेसे वाटेल.
मीन :–साहित्यिकांना आपल्या अप्रकाशित साहित्याच्या प्रकाशनाबाबतची संधी चालून येईल. स्वत:चा हटवादीपणा सोडल्यास कोणत्याही क्षेक्त्रात नुकसान होणार नाही.
|| शुभं-भवतु ||