Read in
बुधवार 02 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 02 मार्च चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र शततारका 26.37 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा.
बुधवार 02 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
बुधवार 02 मार्च चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र शततारका 26.37 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज अमावास्या 23.04 पर्यंत.
मेष :– आजचा दिवस मित्रमंडळींच्या बरोबर अतिशय आनंदात व उत्साहात जाणार आहे. जे काम हातात घेतले आहे त्याची धास्ती घेऊ नका.
वृषभ :–कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या मार्गदर्शनाने घरगुती आज कार्यक्रमाचे नियोजन कराल. आज तुम्हाला जवळच्या व्यक्तीला सल्ला देण्याची संधी मिळेल.
मिथुन :–हाती घेतलेल्या कामात प्रगती करण्यासाठी जीवाचे रान कराल. आजचा दिवस अतिशय दगदगीचा जाईल.
कर्क :–ज्येष्ठ व्यक्तीनी मनावर व आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे. गुंतवणूकीच्या बाबतीत कोणत्याच प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नका.
सिंह :–सकारात्मक मानसिकतेने काम केल्यास अपेक्षित यश मिळण्याची खात्री वाटेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास निष्फळ ठरणार आहे.
कन्या :–वयस्कर मंडळीनी प्रथम आपल्या क्षमतेचा विचार करूनच जबाबदारी स्विकारावी. नियोजनाशिवाय काम व्यवस्थित ६ोत नाही याची प्रचिती येईल.
तूळ :–मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यास हातभार लावाल. नि:संकोचपणे वागल्यास प्रश्नातील गांभिर्य कमी होईल.
वृश्र्चिक :–वयस्कर मंडळींचा आजचा दिवस अतिशय व्यग्र जाणार आहे. नोकरीतील कामाच्या बाबतीत चिकीत्सक रहावे लागेल.
धनु :– मित्रांच्या सहकार्यामुळे स्पर्धात्मक विषयांची आवड निर्माण होईल. तुम्ही आईवडीलांना दिलेला शब्द पाळावा लागेल.
मकर :–पायाचे दुखणे अचानक त्रास देऊ लागेल. जबाबदारीने काम करताना फायद्याचा विचार केल्यास तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होतील.
कुंभ :– स्वत: वाहन चालवून प्रवास करू नका. वैवाहिक जोडीदाराबरोबर एकवाक्यता झाल्याने आज कुटुंबात आनंदीआनंद होईल.
मीन :–नातेवाईकांबरोबर चर्चा करताना आपल्या विचारात स्पष्टता ठेवा. राजकीय मंडळीनी इतरांच्या भरवशावर राहून कोणतेही काम करू नये.
|| शुभं-भवतु ||