Read in
मंगळवार 01 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 01 मार्च चंद्ररास मकर 16. 31 पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र धनिष्ठा 27.47 पर्यंत व नंतर शततारका.
मंगळवार 01 मार्च 2022 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
मंगळवार 01 मार्च चंद्ररास मकर 16. 31 पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र धनिष्ठा 27.47 पर्यंत व नंतर शततारका. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज महाशिवरात्रीचा दिवस आहे. श्री महादेवाची उपासना करावी व उपवासही करावा.
मेष :– मनाच्या अचानकपणे बदलणार्या वृत्तीवर संयम घालावा लागेल. प्रेमसंबंधातील व्यक्तींनी एकमेकातील दुरावा घालवण्याकरता बसून चर्चा करावी व मन मोकळे करावे.
वृषभ :- मनाची चलबिचलता वाढल्याने हातातील कामाकडे लक्ष लागणार नाही. अनुभव हाच गुरू याचा अनुभव येईल.
मिथुन :–कोणतेही व्यावहारिक प्रश्न सोडवण्यासाठी मनापासून वेळ द्यावा लागेल. कोर्टाच्या कामाबाबत घाई करू नका.
कर्क :–विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीसाठी मान-अपमान सोडून तज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे. कणखरपणाने वागल्यास आज मानसिक त्रास होणार नाही.
सिंह :–आईकडील नात्यातील मंडळींच्या मदतीने एखाद्या गूढ गोष्टींचा उलगडा होईल. शिक्षणातील यशाच्या दृष्टीने मेहनत वाढवावी लागेल.
कन्या :–तरूणांनी शांत विचाराने आपल्या अडचणी वरीष्ठांना सांगाव्यात तरच त्यातून मार्ग निघेल. मनावरील दडपण दूर करण्याकरीता वरीष्ठांची मदत घ्या.
तूळ :–आज प्रमाणापेक्षा जास्त कामांची जबाबदारी अंगावर येईल. नोकरीतील अडचणींवर तुमच्याकडून मार्ग सापडेल.
वृश्र्चिक :–आज तुमच्या बाबतीत आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. राजकीय मंडळीनी विरोधकांना न जुमानता कामे करावीत.
धनु :–नात्यातील कोणतीही गुंतागुंत सहविचाराने सुटेल व मनावरील ताणही कमी होईल. स्पष्ट बोलण्याने इतरांची मने दुखावली जातील.
मकर :–आज कोणतीही जबाबदारी घेण्यापूर्वी बारकाईने विचार करा. आनंदी वृत्तीने आजचा दिवस यशस्वी कराल.
कुंभ :– आजचा दिवस लहान मुलांच्या अडचणी सोडवण्याकरीता वापराल. सरकारी परवानग्या च्या कामातील घोळ आज निस्तरता येणार नाही.
मीन :–डाँक्टरांकडून खाण्यापिण्यावर निर्बंध घातले जातील. विद्यार्थ्यांकडून नवीन प्रोजेक्टवरील माहितीची विचारणा होईल व सर्व स्पष्ट करावे लागेल.
|| शुभं-भवतु ||