Read in
सोमवार 28 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 28 फेब्रुवारी चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तराषाढा 07.01 पर्यंत व नंतर श्रवण.
सोमवार 28 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
सोमवार 28 फेब्रुवारी चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तराषाढा 07.01 पर्यंत व नंतर श्रवण. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज सोमप्रदोष आहे. तरी शिवभक्तांनी श्री महादेवाची उपासना करावी.
मेष :– पाळीव प्राण्यांपासून त्रास संभवतो. वयस्कर मंडळींनी रस्त्यावरून चालताना कुत्र्यांपासून सुद्धा सावध राहावे. विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करावा.
वृषभ:– नव्याने ओळख झालेल्या व्यक्तींच्या सल्ल्याचा अति विचार करू नका. परिस्थितीचे भान ठेवून काय व कसे वागावे याचा विचार करा.
मिथुन:– इतरांच्या प्रभावामुळे एखादे धाडस किंवा साहस करण्याचा प्रयत्न करू नये. बोलण्यातील चातुर्याचा इतरांवर प्रभाव पडेल.
कर्क :– परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल. मित्रमंडळींच्या बरोबर अचानक कोणतीही कोणतीही कामे ठरवू नका. तुमच्या बोलण्याने दुखावले जाणार नाहीत याची खात्री करा.
सिंह:– आज मोठेपणाच्या खोट्या विचारांच्या मागे धावण्याची वेळ येईल. समोर आलेल्या परिस्थितीमुळे हात पाय गाळून चालणार नाही. खात्रीशीर विचार मदत करणाऱ्यांचीच मदत घ्या.
कन्या:– नुकत्याच घडलेल्या घटनेवर कोणतेही भाष्य केल्यास ते तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. स्वतःच्या मनावर संयम ठेवून वागावे लागेल. भावनेच्या आहारी जाऊ नका.
तूळ:– योग्य नियोजन केल्यास अवघड वाटणाऱ्या कामाला मार्गी लावता येईल. जमीन व घर यातील व्यवहार कायद्याच्या चौकटीत अडकून पडतील.
वृश्चिक:– कुटुंबात एकमेकांच्या विचाराने वागल्यास संघर्ष कळेल. घरातील प्रश्न सोडवताना भावनेला अती महत्त्व देऊ नका.
धनु:– मनातील ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल. महत्त्वाच्या असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडताना अडचणींचा डोंगर समोर उभा राहील.
मकर:– सरकारी अधिकारी वर्गास समाजासमोर उभे राहताना राहून आपल्या योजना व्यवस्थितपणे इतरांना पटवून देता येतील. नाते संबंधाबाबत कोणत्याही गोष्टी अती ताणू नका.
कुंभ:– आज खरेदी करावयाची यादी अचानक वाढतच जाणार आहे. आर्थिक बाबींचा विचार करून मगच मुलांना शब्द द्या. स्वतःच्या गोष्टींना महत्त्व द्यावे लागेल.
मीन:–मनावरील दडपण कमी करण्याकरता जोडीदाराची किंवा जवळच्या मित्राची मदत घ्यावी लागेल. अतिशय दक्षतेने व व्यवहारीकपणे वागल्यास प्रश्नातील गोंधळ सुटेल.
||शुभं-भवतु ||