Read in
रविवार 27 फेब्रुवारी 2022 ते 05 मार्च 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.
रविवार 27 चंद्ररास धनु 14.22 पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 08.48 पर्यंत व नंतर उत्तराषाढा.
रविवार 27 फेब्रुवारी 2022 ते 05 मार्च 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
रविवार 27 चंद्ररास धनु 14.22 पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 08.48 पर्यंत व नंतर उत्तराषाढा. सोमवार चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा षाढा 07.01 पर्यंत व नंतर श्रवण. मंगळवार 01 मार्च चंद्ररास 16.31 पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र श्रवण (28 सोमवार) 29.18 पर्यंत व धनिष्ठा 27.47 पर्यंत व नंतर शततारका. बुधवार 02 मार्च चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र शततारका 26.37 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा. गुरूवार 03 मार्च चंद्ररास कुंभ 20.03 व नंतर मीन. चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा 25.55 पर्यंत व नंतर उत्तरा भाद्रपदा. शुक्रवार 04 मार्च चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 25.51 पर्यंत व नंतर रेवती. शनिवार 05 मार्च चंद्ररास मीन 26.28 पर्यंत व नंतर मेष. चंद्र नक्षत्र रेवती 26.28 पर्यंत व नंतर अश्र्विनी.
रविवार 27 भागवत एकादशी.
सोमवार 28 सोमप्रदोष.
मंगळवार 01 मार्च महाशिवरात्र
बुधवार 02 मार्च दर्श अमावास्या 23.04 पर्यंत.
मेष :-संशोधनात्मक कार्य करणार्यांना समोरील कामाचे आव्हान स्विकारावे लागणार आहे. ईश्र्वर सेवा, दैवी शक्ती, वेदशास्त्र यांच्या अभ्यासकांना आत्मशक्तीचा अनुभव येईल व इतरांसमोर मांडण्याची संधी मिळेल. मोठ्या प्रमाणातील जाहिराती, होर्डींग्ज या बाबतचे अधिकार असलेल्या मंडळीना त्यांच्या कामात गुंतागुंत निर्माण झाल्याचे जाणवेल. शिक्षकांना नवीन वर्षासाठीच्या केलेल्या नियोजनात कांही महत्वाच्या सुधारणा करण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल. कोर्टामधील कांही भावकीतील दाव्यामध्ये विचार विनिमय करून कोर्टाबाहेर केस संपवण्याचे प्रयत्न तुमच्या पुढाकाराने करता येणार आहेत.
वृषभ :–कुटुंबातील सहविचाराने देवघरातील मूर्तींसंबंधी एकवाक्यता होईल. कुळाचार, कुळधर्म याबाबतचे तुमचे विचार स्पष्ट होऊन गुरूजींकडून विधी करून घेण्याचे ठरेल. राजकीय क्षेत्रातील मंडळीनी आपण करत असलेल्या कार्याबद्दल अती जाहिरातबाजी किंवा गवगवा कपू नये. बर्याचशा गोष्टी अंगलट येण्याचा धोका आहे. नोकरीतील उच्च पदावरील अधिकारी वर्गाला एखाद्या चौकशी सत्राचे नियोजन करावे लागेल. मोठ्या भावंडाकडून तुम्हाला आवश्यक ती मदत मिळणार आहे. चोरीला गेलेल्या वस्तूचा अजूनही पाठपुरावा करावयास लागेल.
मिथुन :–सामाजिक स्तरावर कार्य करणार्यांना समाजाकडून प्रशंसा मिळेल व गौरव केला जाईल. नोकरीतील उच्चाधिकार समिती मधे तुमचा नंबर लागेल व आयुष्यातील एक मोठे पद मिळाल्याचा आनंद होईल. खूप जवळच्या व्यक्तीकडून तुमच्या बाबतची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल व त्याला प्रसिद्धी मिळेल. महिलांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास जाणवणार आहे. कामाच्या योग्य नियोजनाने कामे खूपच सोपी करता येण्याचा अनुभव मिळेल. संततीबरोबरची आजची चर्चा अतिशय आनंददायी व अपेक्षित रिझल्ट देणारी ठरेल.
कर्क :– चौकशी समितीमधील तुमचे पद व अधिकार यामुळे तुमच्या नावाला एक वेगळेच वलय प्राप्त होईल. सरकारी रखडलेल्या कामाना गती देण्याकरता तुम्हाला ओळखींचा उपयोग करावा लागेल. आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न करू नका. फँक्टरी, वर्कशाँप येथे या सप्ताहात तुम्हाला हुकमत गाजवता येणार आहे. कुटुंबात वाढदिवसाच्या निमीत्ताने गायन व संगीताचा कार्यक्रमाचे आयोजन होईल. नवीन गाडी खरेदी करण्याच्या इच्छेला सध्या आवर घाला. स्वभावात व आचरणात शांतता आणावी लागेल.
सिंह :–नव्याने दाखल झालेल्या नोकरीतील तुमच्या सर्व प्रश्र्नांना वरिष्ठांकडून उत्तरे व मार्गदर्शन मिळणार आहे पण कोणत्याही प्रकारची घाई करू नका. कुटुंबातील महत्वाच्या निर्णयात तुमच्या मताला महत्व मिळणार असल्याने पूर्ण विचाराने व अभ्यासाने निर्णय द्या. महिलांना उजवा पाय पोटर्या दुखण्याचे प्रमाण अचानक वाढेल तरी हाडांच्या डाँक्टरांची मदत घ्या. राजकीय मंडळीना आपल्या कार्यक्षेत्रात टिकाव लागण्यासाठी विचारपूर्वक डावपेचांचा आखणी करावी लागेल.
कन्या :–नोकरीच्या ठिकाणी शांत मनाने काम करून तेथील परिस्थिती काबूत ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारच्या देण्याघेण्याच्या प्रकारात अतिशय सावध राहण्याची गरज आहे. इतरांच्या मताप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केल्यास स्वत:ची मुल्ये हरवून बसाल तरी स्वविचारानेच निर्णय घ्या व कामे करा. अंगावर आलेली जबाबदारी तुम्हाला टाळता येणार नाही व ती पार पाडण्यासाठी झोकून देऊन काम करावे लागेल. सामाजिक कार्यात सहकार्यांकडून चांगली मदत होईल.
तूळ :–भिडस्त स्वभावाला चिकटून बसल्याने होणी कोंडी त्रासदायक ठरेल. व्यवहारात स्पष्टपणे बोलण्याने कोणताही गैरसमज वा गोंधळ होणार नाही. बँकेचे व्यवहार इतरांकडून करून घेण्याचा प्रयत्न करू नका. कुटुंबातील ज्येष्ठांच्या मताने चालल्या पुढील अडचणी टाळता येतील. वैयक्तिक जीवनात सांभाळून वागल्यास पश्चात्तापाची वेळ येणार नाही. शेअर मार्केटमधील व्यवहारात अधिक लालसेने काम करण्याचा मोह आवरावा लागेल. स्वत:मधे बदल केल्यास आजुबाजुचे वातावरणही बदलते याचा रोकडा अनुभव येईल.
वृश्र्चिक :–या सप्ताहात नोकरी व्यवसायात प्रत्येक पातळीवर अडकलेल्या कामात इतरांची मदत मिळेल. महिलांना आपल्या क्षमतेचा अंदाज आल्यामुळे पुढील कामाची आखणी करणे सोपे जाईल. कलाकार मंडळीना आपल्या कला सादर करण्यासाठी गुरूजनांचा आशिर्वाद मिळणार आहे. एखाद्या मोठ्या प्रमाणात ठरवलेल्या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन करण्याची जबाबदारी तुमच्यावर येणार आहे. लहान मुलांच्या संगोपनाचे कार्य करणार्या महिलांना शांत राहून परिस्थिती काबूत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल.
धनु :–राजकीय मंडळीनी विरोधकांना सामान्य समजून मोडीत काढू नये. पाठबळ पक्के असल्याशिवाय कोणत्याही मोठ्या कार्याचे नियोजन करू नका. कुटुंबातील शेत, जमीन यांच्या वादात पडल्याने तुमची इमेज खराब होईल. सरकारी स्तरावर मिळणार्या परवानगीसाठी चे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. मैदानी खेळाडूना आपली शक्ती व युक्ती दाखवण्याची संधी मिळेल. स्वभावात नम्रता आणल्यास सामाजिक स्तरावर काम करताना वाद किंवा मतभेद विकोपाला जाणार नाहीत.
मकर :–हितचिंतकांच्या सल्ल्याने घेतलेल्या निर्णयावर पुन्हा विचार करावा लागेल. वैयक्तिक जीवनातील विषयावर अती मोकळेपणाने चर्चा करत बसू नका.राजकीय क्षेत्रातील मंडळीनी फुशारकीने आपले व्यवहार चव्हाट्यावर मांडू नयेत समोरील व्यक्ती तुमच्याच बातम्यांचा गैरवापर करण्याचा धोका आहे. सामाजिक कार्यात सर्वच कामे शांततेने करावी लागतील. मित्रमंडळीमधील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कोणताही निर्णय घेताना भावनेच्या आहारी न जाता सखोल विचार करूनच घ्या. समोरील व्यक्ती दुखावणार नाही याची दखल घ्यावी लागेल.
कुंभ :–स्वत:च्या पूर्ण क्षमतेचा विचार करून मगच आश्वासने द्या. मनातील बर्याच अनुत्तरीत प्रश्नांना व्यवहारी गुरूकडून योग्य ते मार्गदर्शन मिळेल. लहान वयाच्या मुलांकडून मोठ्या अपेक्षा करू नका. विद्यार्थी वर्गाला परिक्षेच्या दृष्टीने नेमके काय करायचे याचा योग्य अंदाज येईल. इतरांच्या तुलनेने तुम्हाला तुमचा अभ्यास वाढवावा लागेल. स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण करण्यासाठी तुमची व्यवहारीक गणिते तुम्हालाच सोडावी लागतील. कोणत्याही विषयात डायरेक्ट हात घालू नका प्रथम त्यातील खाचाखोचा समजून घ्या. प्रवासात बर्याच अडचणी निर्माण होणार आहेत तरी या सप्ताहात प्रवास टाळावा हेच चांगले.
मीन :–कोणत्याही आवडत्या गोष्टीचा आनंद घेताना त्याचा अती एक करू नका. कुटुंबातील सर्वानीच एकत्र बसून सहविचाराने चर्चा करून निर्णयावर यावे लागेल. त्रासदायक व नकारात्मक विचारांच्या व्यक्तीपासून दूर व सावध रहा. आईकडील नात्यांच्या मंडळींकडून विशेष सल्ला मिळेल. नोकरी व्यवसायात अचानक कायदेशीर कटकटी निर्माण होणार आहेत. भूतकाळातील अनुभवांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या लहरी व हट्टी स्वभावाला मुरड घातल्यास बर्याच गोष्टी सुलभ होतील व व्यवहारात गुंतागुंत निर्माण होणार नाहीत.
|| शुभं-भवतु ||
.