Read in
शनिवार 26 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 26 फेब्रुवारी चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 10.31 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा.
शनिवार 26 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
शनिवार 26 फेब्रुवारी चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 10.31 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज विजया स्मार्त एकादशी.
मेष :– प्रौढ नोकरदारांना स्वेच्छा निवृत्ती घेण्याचे वेध लागतील. सिनियर अधिकार्यांना त्यांच्या हातातील अधिकारात कपात केल्याचे कळवले जाईल.
वृषभ :–उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचे स्वप्न पहायला हरकत नाही तरी त्या दृष्टीने प्रयत्न करा. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी.
मिथुन. :–महिलांना ओटीपोट दुखण्याचा त्रास संभवतो. लहान मुलांना तसेच गर्भवती महिलांना युरीन इन्फेक्शनचा त्रास संभवतो. आजच्या दिवशी सर्वानीच पाणी भरपूर प्यावे.
कर्क :–द्वितीय संततीकडून अत्युच्च आनंदाची बातमी कळेल. नोकरीतील कामकाजाचा आढावा घेऊन आपल्या कामाची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडाल.
सिंह :–आज तुमच्या स्वभावातील लहरीपणा इतका वाढेल की त्यांवर कोणताही उपाय चालणार नाही.
कन्या :–महिलांकडून घरातील फर्निचर बदलण्याचे विचार सुरू होतील. पतीपत्नीमधे द्वितीय संततीबाबत विचार सुरू होईल.
तूळ :–उच्च बौद्धिक पातळी असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाच्या विषयात चांगली प्रगती झाल्याचे जाणवेल व महत्वाकांक्षेतही वाढ होईल.
वृश्र्चिक :–बातमीदार, संपादक यांच्याकडून कांही विषयावर अँग्रेसिव्हनेस दिसून येईल. नोकरीतील अधिकारी वर्गाला स्पेशल व्हिझीट करण्याचे अधिकार दिले जातील.
धनु :–जागेच्या, शेतजमिनीच्या, प्लँटस् च्या व्यवहारात मध्यस्थी तसेच दलाल यांचेकडून चांगली मदत होईल. घरापासून चार दिवस विश्रांतीसाठी दूर जावेसे वाटेल.
मकर :–लहान भावंडाच्या अडचणीसाठी मदत करण्यास धावून जाल. कोणत्याही प्रकारची केलेली पूर्वीची गुंतवणूक आज फायदेशीर ठरेल.
कुंभ :–(संततीच्या) तुमच्या व्यवसायातील गरजेपोटी आईवडिलांकडून चांगली आर्थिक मदत मिळेल. पत्नीकडून ही मोठी आर्थिक मदत मिळेल.
मीन :–बँकेचे क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड याविषयी आज तुम्हाला अतिशय जागरूक रहावे लागेल. आज फक्त स्वत:वरच विश्वास ठेवा इतरांवर नको.
|| शुभं-भवतु ||