daily horoscope

शुक्रवार 25 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शुक्रवार 25 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार 25 फेब्रुवारी चंद्ररास वृश्र्चिक 12.07 पर्यंत व नंतर धनु.

शुक्रवार 25 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे

शुक्रवार 25 फेब्रुवारी चंद्ररास वृश्र्चिक 12.07 पर्यंत व नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 12.07 पर्यंत व नंतर मूळ. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज श्री रामदास नवमी आहे.

मेष :– पूर्वजांच्या कृपेने आज मोठ्या अडचणीच्या प्रसंगात कोणतरी देवासारखे धावून येईल व मदत होईल. महिलांना मासिक पाळीचा त्रास संभवतो.

 

वृषभ :–पुरूषांना सासुरवाडीकडून अचानक धनलाभाचा योग आहे. निवृत्त कर्मचार्‍यांना आपले पी. एफ. चे पैसे लवकरच मिळणार असल्याचे कळेल.

 

मिथुन :–नोकरीच्या ठिकाणी अपेक्षित पगाराची इच्छा पूर्ण होथ असल्याचे कळेल. व्यवसायात नोकरवर्गाचे सहकार्य चांगले मिळेल.

 

कर्क :–पाळणाघरे, बालसंगोपन केंद्र येथील सेवाभावी मावशींना अचानक पगारवाढ मिळेल. संततीच्या आरोग्याच्या तक्रारी नाहीशा होतील.

 

सिंह :–शेती, बागायती असलेल्या ंना सरकारी नुकसान भरपाई मिळणार असल्याचे कळेल. वाहन घेऊ इच्छिणार्यांच्या कर्जाची सोय होईल.

 

कन्या :–जाहिरात यंत्रणेमध्ये काम करणारे, माहिती प्रसारण खात्यात काम करणारे यांना गुंतागुंतीच्या कामासाठी निवडले जाईल. सरकारी कामे पूर्ण करून आणण्याची जबाबदारी तुमच्यावर येईल.

 

तूळ :–नेहमीच्या वातावरणापासून बदल अनुभवण्यासाठी दूर जाण्याचे नियोजन कराल. बँकेकडे मागितलेले कर्ज मात्र सध्या मंजूर होत नसल्याचे कळेल.

 

वृश्र्चिक :–कौटुंबिक सुखात कांही गैरसमजूती मुळे वाद निर्माण होतील व त्यामुळे मनस्ताप होईल. मुलांचे वडिलांबरोबर मतभेद संभवतात.

 

धनु :–तुमच्या व्यक्तिमत्त्वाची इतरांवर छाप पडल्याने सर्वांचे कुतुहल वाढेल. संततीबाबतच्या कोणत्याही तक्रारी वर मार्ग सापडेल.

 

मकर :–आज अचानक तुम्हाला कांही गुढ गोष्टींविषयी ची भिती निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवून ज्येष्ठांचा सल्ला मानावा.

 

कुंभ :–पूर्वी हरवलेल्या महत्वाच्या वस्तू विषयी सुगावा लागेल. वयस्कर मंडळीना व आजार्यांना आज बरे वाटू लागेल

 

मीन :–शासकीय कागदपत्रांची पूर्तता करताना होणार्या ओळखी टिकवण्याचे काम करा. नोकरीत नव्याने विशेष जबाबदारी सोपवली जाईल

 

|| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *