daily horoscope

गुरूवार 24 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

Read in

गुरूवार 24 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

गुरूवार 24 फेब्रुवारी चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 13.30 पर्यंत व नंतर ज्येष्ठा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–नात्यातील मुलांच्या शुभकार्यासाठी आर्थिक मदत द्याल. तुमच्या आवडत्या वस्तूची चोरी होण्याची शक्यता आहे.

 

वृषभ :–ज्यांचा विवाह ठरला आहे त्यांची रजिस्टर विवाह करण्याची चर्चा होईल. परदेशात असलेल्या मुलामुलींना आपल्या व्हिसाबाबतची चिंता सतावेल.

 

मिथुन :–फुलझाडे, नर्सरीची आवड असणार्‍यांना व्यवसाय करण्याची इच्छा होईल. दुसर्‍यांच्या सांगण्यावरून कोणतेही निर्णय घेऊ नका.

 

कर्क :–लहान मुलांच्या संस्कारावरून त्यांच्या आईवडिलांचे कौतुक होईल. भाड्याने घर घ्यावयाचे असल्यास आज अनेक अडचणी निर्माण होतील.

 

सिंह :–दळणवळण खात्यात काम करणार्यांना अचानक कामाचा खूपच ताण जाणवेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना मुलाखतींचे बोलावणे येईल.

 

कन्या :–गायन केलेली आवड असणार्‍यांना लोकांसमोर आपली कला  सादर करण्याची संधी मिळेल. लेखक व कवी यांचे त्यांच्या साहित्याबद्दल कौतुक होईल.

 

तूळ :–अचानक तुम्हाला तुमच्या स्वभावात कशा प्रकारचा बदल करावयाचा आहे याची कल्पना येईल

आज अचानक डोळेदुखीचा त्रास जाणवेल.

 

वृश्र्चिक :–तुमच्या हातातील सुरू असलेल्या प्असलेल्यामध्ये अचानक अडचणी निर्माण होतील. स्वत:च्या व्यवसायात आज नुकसान संभवते.

 

धनु :–मित्रमैत्रिणींना आलेल्या अडचणींवर तुमच्याकडून सल्ला दिला जाईल. आज तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे लाभ होणार आहे.

 

मकर :–अचानक दोन दिवसापासून होणारा प्रकृतीचा त्रास वाढेल व आज आजारपण आल्याचे जाणवेल.. तळपायाची आग होईल व पाऊले दुखतील.

 

कुंभ :–मोठ्या भावंडाच्या मित्रपरिवाराबरोबर सहभोजन करण्याची संधी मिळेल. जोडीदाराच्या आईवडीलांचाही सहभाग असेल.

 

मीन :–जे काम करण्याची तुमची नेहमी इच्छा असते आज त्याच कामाचा कंटाळा येईल. तुमच्या हातात असलेल्या अधिकाराचा वापर करणे अडचणीचे ठरेल.

 

|| शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *